अंगावर पाल पडण्याचे काय आहेत संकेत.? अंगावर पाल पडणे शुभ आहे कि अशुभ.?

अध्यात्म

ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या या धरतीवर अनेक छोटे-मोठे जीव राहतात व प्रत्येक जिवाचा एक वेगळा असा गुणधर्म आहे. त्याबरोबरच पुरातन काळापासूनच काही रिती- रिवाज चालत आल्या आहेत आणि या रिती-रिवाजांमागे काही वैद्यानिक कारणे ही आहेत उदाहरण द्यायचे झाले तर पाल अंगावर पडणे. पाल घरात असणे हे कोणालच आवडत नाही पण मित्रांनो ज्या पालीपासून आपण दूर पळत असतो तीच आपल्याला आपल्या भविष्याचा संकेत देते. म्हणूनच पाल अंगावर पडणे शुभ आहे की अशुभ हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शकुनशास्त्रा आधारे स्त्री आणि पुरुषांच्या शरीराच्या काही भागांंवर पाल पडलेली शुभ आणि काही भागांवर पडल्यास अशुभ असते. महिलांच्या शरीराच्या उजव्या बाजुवर पाल पडणे आणि पुरुषांच्या अगदी या उलट म्हणजे डाव्या बाजूस पाल पडणे अशुभ असते. परंतू जर पाल ही आपल्या नाभिवर पडली असेल तर मित्रांनो हा खूप मोठा शुभ संकेत आहे.

हे वाचा:   या 4 राशींचे लोक असतात खूपच शक्तिशाली, तुम्ही पण या 4 राशींपैकी असाल नक्की पहा !

यामुळे तुमच्या अनेक मनोकामना पुर्ण होतील. तसेच पाल जर पुरुषांच्या अंगाच्या डाव्या बाजूस पडली तर अनेक कामे मार्गी लागतील तथा व्यापारात ही नफा होवू लागेल. महिलांच्या डोक्यावर पाल पडणे हा सुद्धा एक शुभ संकेत आहे आणि यामुळे घरात धन- संपत्तीची वाढ होते. उजव्या कानावर पाल पडणे हा पण शुभ संकेत आहे आणि यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक रत्न-आभूषने मिळतील.

मात्र डाव्या कानावर पाल पडली तर तुमचे आयुष्य हे वाढलेच म्हणून समजा. पण पाल जर तुमच्या पायावर जर पडली तर मात्र अशुभ संकेत समजावा. जर पाल गालांवर पडली तर जुन्या मित्रांशी भेटीचा योग येवू शकतो.त्याच प्रमाणे जर तोंडावर पाल पडली तर समजावे की मधुर भोजनाच आस्वाद घेता येइल.

हे वाचा:   गुरुवार रात्री झोपण्याआधी 2 मिनिट काढून बोला 1 मंत्र; जीवनात येईल सुख आणि समृद्धी.!

जर पाली भांडताना दृष्टीत पडल्या तर समजून जा घरात भांडणे होणारच तथा प्रियजनांपासून आपली ताटातूट होणार. सोबतच पाल केसांवर पडणे म्हणजे त्या व्यक्तिचा मृत्यू होणार असे शास्त्र म्हणते. म्हणूनच मित्रांनो पाल जे संकेत देते त्या समजून घ्या आणि सावध व्हा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.