मनुष्य आपले सौंदर्य टिकवण्यासाठी खूप वेगवेगळे प्रयत्न करत असतो.आपल्या शरीरावरील प्रत्येक अवयव आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडत असतो आणि हे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण त्यांचा खूप विचार सुद्धा करत असतो. प्रत्येक अवयवाची काळजी सुद्धा घेत असतो परंतु एवढे करून सुद्धा काहीना काही कमतरता आपल्या शरीरांमध्ये निर्माण होऊन जाते त्यापैकी एक म्हणजे केस.
केस हे आपल्या शरीराचे सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करत असते त्याचबरोबर केस मुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलून जाते परंतु अनेकदा आपल्यापैकी काहीजणांचे केस गळू लागतात. आपल्या शरीरातील कमतरतेमुळे किंवा काही क्षार विटामिन्स याची कमतरता असल्यामुळे सुद्धा केस गळू लागतात आणि परिणामी आपल्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होत असतो. कधीकधी केस गळण्याचे प्रमाण अधिक होऊन जाते तर यामुळे अनेकदा टक्कल सुद्धा पडत असते परंतु हे टक्कल फक्त आपल्याला पुरुषांमध्ये पाहायला मिळते.
महिलांमध्ये टक्कल पडलेले क्वचितच पाहायला मिळते म्हणून अनेकदा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. केस हे स्त्री आणि पुरुष या दोघांना असतात परंतु टक्कल हे फक्त पुरुषांना पडते ? जर असा प्रश्न सुद्धा तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत.
आपल्या शरीरावरील केस उगवण्याचे कारण म्हणजे हार्मोन्समधील बदल त्याचबरोबर केस गळण्याचे व टक्कल पडण्याचे एकमेव कारण सुद्धा हार्मोन्स यामध्ये बद्दलच कारणीभूत ठरतात. एका संशोधनानुसार केलेल्या अभ्यासात असे जाणवून आले आहे की केस गळणे व टक्कल पडणे यासाठी आपल्या शरीरातील टेस्टेस्टेरॉन कारणीभूत ठरते.
आपल्या शरीरातील असे काही घटक जे टेस्टेस्टेरॉन यांना कमकुवत बनतात आणि परिणामी आपले केस गळू लागतात, कालांतराने आपल्या डोक्यावर टक्कल पडू लागते. साधारणपणे मानवी शरीरामध्ये बदल करणारे इंजाईम हे टेस्टेस्टेरॉन जीन्स मध्ये लपलेली असतात. यामुळे अनेकदा टक्कल हे अनुवंशिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच अनेकदा आपल्याला पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचे केस गळताना कमी दिसते त्याचबरोबर महिलांचे शरीरामध्ये सुद्धा टेस्टेस्टेरॉन स्त्राव व एस्ट्रोजन स्त्राव सम प्रमाणामध्ये होत असतो म्हणूनच स्त्रियांमध्ये केस गळण्याचे प्रमाण कमी असते.
साधारणतः वयाच्या तिसाव्या वर्षापासून पुरुषांमध्ये केस गळण्याचे प्रमाण सुरू होऊ लागते आणि हळूहळू टक्कल पडू लागते. आणि वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत जास्तीत जास्त केळ गळून टक्कल झालेले असते. टेस्टेस्टेरॉन याचे डिटेस्टेस्टेरॉन होणे यासाठी खूप मोठी प्रक्रिया सुद्धा होत असते.
ही प्रक्रिया जो पर्यँत तुमच्यावर असर करत नाही तोपर्यंत तुम्ही वयोवृद्ध होत नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये अनेक जण कमी वयातच टक्कल होणे या समस्येला सामोरे जात आहे आणि हे कदाचित अनुवंशिकता किंवा त्वचेमध्ये असणारे वेगळेपण याकरता सुद्धा असू शकते त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये अनेक तरुण खूप मोठ्या समस्यांना ताण तणावाला सामोरे जात आहे यामुळे सुद्धा अनेकांचे केस गळणे सुरू होऊन होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.