देवघरातील पितळेच्या मूर्ती काळ्या पडल्या आहेत..? तर अशा चमकवा मूर्ती 2 मिनिटात…पुन्हा कधी चमक कमी होणार नाही

सामान्य ज्ञान

नमस्कार मित्रांनो,

जर तुमच्याही घरात ठेवलेल्या पितळी मूर्ती आणि भांडी काळी पडू लागली आहेत, तर त्यामुळे तुम्ही त्यांना काही खास पद्धती वापरून स्वच्छ करून पुन्हा नव्या सारख्या चमकवू शकता. तूम्ही या पितळाच्या मूर्तींची किंवा भांड्यांची अशा प्रकारे साफसफाई केल्याने त्यांना एक नवीन चमक येईल आणि ते त्यांनतर कधीही खराब देखील होणार नाहीत. घरात ठेवलेल्या पितळी मूर्ती आणि भांडी ही जर कालांतराने काळी पडू लागली आहेत,

तर त्यामुळे तुम्ही त्यांना काही खास आणि अगदी सोप्या आणि साध्या पद्धती वापरून स्वच्छ करू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला त्यां मुर्त्या किंवा भांडे हे सामान्य वॉशिंग पावडर आणि डिश वॉश लिक्विडने स्वच्छ करायचे नाही आहेत. जर तुम्ही या गोष्टींनी पितळी गोष्टी स्वच्छ केल्या तर त्यांचा रंग हा मंदावायला लागतो म्हणजेच त्यांचा रंग हा हळूहळू उतरू लागतो, त्यांची चमक कमी होते आणि ते आधुसारखे दिसत देखील नाहीत.

लिंबू आणि बेकिंग सोडाचे मिश्रण :- पितळेच्या मूर्ती बेकिंग सोडा आणि लिंबूने देखील स्वच्छ केल्या जाऊ शकतात. लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळा आणि नंतर ही पेस्ट मूर्तींवर एखाद्या कापडाच्या मदतीने लावा. त्यानंतर काही काळ ते असेच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून घ्या.

हे वाचा:   तुम्ही सुद्धा या वस्तू वापरत असाल तर आत्ताच व्हा सावधान; अन्यथा भोगावे लागतील खूप मोठे परिणाम.!

व्हिनेगर :- जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही पितळेच्या मूर्ती गा व्हिनेगरने सुद्धा स्वच्छ करू शकता. यासाठी प्रथम पितळी वस्तूंवर व्हिनेगर लावा आणि त्यानंतर त्यावर मीठ चोळा आणि स्क्रबने स्वच्छ करा. आणि सगळ्यात शेवटी घा कोमट पाण्याने व्यवस्थित धुवा. लिंबू आणि मीठ :- लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मीठ मिसळा आणि हे मिश्रण पितळेची भांडी आणि मूर्तींवर घासून घ्या.

आता त्यांना कोमट पाण्याने धुवा. या सोप्या पद्धतीने, भांडी आणि मूर्ती नवीनप्रमाणे चमकतील. लिंबू आणि मीठ वापरून, एक लिंबू अर्धा कापून घ्या आणि काळी झालेली पितळी मूर्ती किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी अर्ध्या कापलेल्या लिंबू वर एक चमचे मीठ घाला. लिंबाच्या तुकड्याचा रस पिळून पितळेच्या घाणेरड्या भागावर चोळा. 5 मिनिटांनंतर मूर्ती कोमट पाण्याने नीट धुवा आणि कोरडी करा.

या रेसिपीमुळे, पितळेच्या काळ्या पडलेल्या मूर्ती देखील पूर्वीसारख्या चमकू लागतील. चिंच :- चिंच सुमारे १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर पितळी मूर्ती किंवा भांड्यांवरती या चिंचेचा लगदा घासून घ्या. आता स्क्रबने स्वच्छ करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

पीठ, मीठ आणि पांढरा व्हिनेगर :- काळ्या पडलेल्या पितळेच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी पीठ, मीठ आणि पांढरा व्हिनेगर हे तिन्ही घटक समान प्रमाणात मिसळून पेस्ट तयार करा.  त्या पेस्टचा पातळ थर काळ्या झालेल्या पितळेवर लावा आणि 1 तास राहू द्या. तासाभरानंतर कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवा. पांढरा व्हिनेगर मुख्य स्वच्छता एजंट म्हणून कार्य करते.

हे वाचा:   कानामध्ये गोम, किडा गेल्यास पटकन करा हा उपाय..किडा लगेच बाहेर येईल..घरगुती विना खर्चिक, विना त्रासाचा उपाय..जाणून घ्या

त्यामुळे त्याच्या वापरामुळे काळ्या झालेल्या पितळेच्या मूर्ती लगेच चमकतात. टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस वापरा :- टोमॅटोमध्ये एक आम्ल असते जे पितळ आणि इतर धातूंवरील काळे डाग काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे टोमॅटोवर आधारित उत्पादन लागू केल्यास तुमच्या पितळी भांड्यावर त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येऊ शकतात.

केचप, टोमॅटो पेस्ट आणि टोमॅटो सॉस हे सर्व पितळ घासण्यासाठी तितकेच चांगले काम करतात. ते वापरण्यासाठी, आपल्या गलिच्छ पितळी मूर्तींवर टोमॅटो केचपचा पातळ थर लावा आणि तासभर राहू द्या. नंतर गरम पाण्याने आणि डिश साबणाने चांगले धुवा. ते कोरडे होऊ द्या आणि मग त्याची चमक पहा.

वरील सर्व युक्त्या वापरून तुम्ही पितळेच्या मूर्ती किंवा भांडी स्वच्छ करू शकता. पण जर तुम्ही या टिप्सने मोठ्या मूर्ती साफ करत असाल तर आधी या मूर्तींची पॅच टेस्ट अवश्य करा