आपण अनेकदा थंड पाणी पीत असतो, बर्फयुक्त पाणी पीत असतो. फ्रीजमध्ये थंड पाणी पिण्याकरता पाण्याच्या बाटल्या भरत असतो परंतु जेव्हा कधी आपण स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये पाणी ओतत असतो तेव्हा ग्लासच्या बाहेर काही पाण्याचे थेंब दिसू लागतात. हे थेंब कसे निर्माण होतात ?आणि का निर्माण होतात? याबद्दलची उत्सुकता अनेकदा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते.
जर तुमच्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न येत असतील तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. जर आपण कुणाला असा प्रश्न विचारला तर सहाजिकच सगळे जण आपल्याला उत्तर देतात की ग्लासमध्ये पाणी टाकल्यामुळे बाहेर थेंब तयार होते.
हे उत्तर काही प्रमाणामध्ये योग्य सुद्धा आहे पण वैज्ञानिक दृष्ट्या जाणून घेतले तर हे फारसे काही योग्य उत्तर नाही. आपणास सांगू इच्छितो की आपल्या वातावरणामध्ये चारही बाजूला पाणी वायू स्वरूपात उपलब्ध असते. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाणी वास करत असते. फक्त फरक एवढा आहे की त्याचे प्रमाण कमी जास्त स्वरुपामध्ये असते.
ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक प्रमाणात असतो म्हणजे नदी ,तलाव, विहीर, त्या ठिकाणी पाणीसाठा भरपूर प्रमाणात असतो आणि ज्या ठिकाणी पाण्याचा साठा कमी असतो अशा ठिकाणी पाण्याची स्थिती अत्यंत कमी पाहायला मिळते. तसे पाहायला गेले तर पाणी हे तीन स्थितीमध्ये उपलब्ध असते ,त्यातील पहिले द्रव स्थिती ,नंतर वायू स्थिती आणि त्यानंतर स्थायु स्थिती अशा तीन प्रकारांमध्ये पाणी उपलब्ध असते.
जेव्हा पाण्याचे तापमान वाढते तेव्हा पाणी वायु रूपांमध्ये परिवर्तन होत असते म्हणजेच की त्याची वाफ तयार होते. याचाच अर्थ असा की जेव्हा आपण एखाद्या ग्लासमध्ये पाणी ओतत असतो तेव्हा ग्लास च्या आजूबाजूला पाणी ही वाफ स्वरूपामध्ये निर्माण होते. जेव्हा वाफेला थंड केले जाते तेव्हा आपल्याला पाणी द्रव्य स्वरूपामध्ये ते थेंब दिसू लागतात.
जेव्हा आपण पाण्याला शून्य डिग्री सेल्सिअस मध्ये रुपांतरीत करत असतो तेव्हा पाण्याचे रूपांतर बर्फामध्ये होत असतो आणि जेव्हा आपण बर्फाला गरम करतो तेव्हा त्याचे रूपांतर पाण्यामध्ये होते आणि जेव्हा या पाण्याला गरम केले जाते तेव्हा हे पाणी वाफ स्वरूपामध्ये वातावरणामध्ये मिसळून जाते.जेव्हा आपण ग्लासमध्ये पाणी ओततो तेव्हा ग्लासच्या बाहेर हे पाणी वाफ स्वरूपामध्ये तयार होऊन त्याच्या आजूबाजूला थेंब निर्माण होऊ लागतात याच कारणामुळे आपल्याला ग्लास च्या आजूबाजूला पाण्याचे थेंब दिसू लागतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.