चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचा काय असतो अर्थ.? जाणाल तर व्हाल आश्चर्यचकित.!

सामान्य ज्ञान

चित्रपट म्हटला तर आपला जीव की प्राण.आपल्या सर्वांना चित्रपट पाहायला आवडत असतो.आपल्या आवडता हिरो किंवा हीरोइन चा चित्रपट असेल तर आपण आवर्जून सिनेमा घरामध्ये चित्रपट पाहायला जातो. आपल्यापैकी क्वचितच एखादा व्यक्ती असेल की तो चित्रपट पाहत नसेल त्याचबरोबर अनेक जण सिनेमा घरामध्ये चित्रपट पाहायला नाही गेले तरी आपल्या घरी जसे माध्यम उपलब्ध असेल त्या माध्यमांवर चित्रपट पाहत असतो.

परंतु आपल्यापैकी अनेकांना एक प्रश्न मनामध्ये नेहमी सतावत असेल की जेव्हा चित्रपट सुरू होतो तेव्हा चित्रपटाच्या सुरुवातीला एक प्रमाणपत्र आपल्या सर्वांना दाखविले जाते. ते चित्रपट दाखविताना प्रमाणपत्र का दाखवले जाते ?त्यामागे नेमका अर्थ काय असतो ?त्याच्यावर कोण कोणत्या गोष्टी लिहिलेल्या असतात ?याबद्दल अनेकांच्या मनामध्ये वेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही माहिती जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

चित्रपट सुरू होतो तेव्हा चित्रपटाच्या प्रक्षेपणाच्या वेळी एक प्रमाणपत्र आपल्याला पाहायला मिळते.हे प्रमाणपत्र चित्रपट सेन्सॉर बोर्ड द्वारे मिळते. सेन्सॉर बोर्ड चे पूर्ण नाव सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन असे आहे आणि हे एक सेंसोरशीप असलेलं मंडळ आहे. हे असे मंडळ आहे जे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असते. सेंसोर बोर्ड हे असे एक मंडळ आहे, जे चित्रपट मालिका किंवा अन्य असे काही माध्यम आहेत जे प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येत असते त्या सर्वांना एक प्रमाणपत्र प्रदान करत असते.

हे वाचा:   या पाच वस्तुंचा उपयोग एका विशिष्ट कालावधीनंतर चुकूनही करू नका; जाणून घ्या यांची एक्सपायरी डेट.!

सेन्सॉर बोर्ड द्वारे प्रमाणपत्र दिल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित केला जातो आणि त्यानंतरचा आपल्याला वेगवेगळ्या सिनेमागृहा मध्ये पाहायला मिळतो. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सेन्सॉर बोर्ड चे मुख्यालय मुंबई येथे आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला एक प्रमाणपत्र दाखवले जाते आणि त्यावर चित्रपट संबंधित सविस्तर माहिती दिलेली असते त्याचबरोबर यु, ए, एस सारखे असे अनेक प्रमाणपत्र सुद्धा असते. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेल्या प्रमाणपत्रामध्ये जर लिहिलेले असेल.

तर याचा अर्थ हा चित्रपट कोणीही पाहू शकतो म्हणजेच की कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास त्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या गेलेल्या प्रमाणपत्रा मध्ये यु असे लिहिलेले असेल तर याचा अर्थ बारा वर्षाखालील मुलं-मुली आपल्या आई वडिलांच्या सोबत हा चित्रपट पाहू शकतात.

म्हणजेच मुले एकट्या मध्ये अशा प्रकारचे चित्रपट अजिबात राहू शकत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेल्या प्रमाण पत्र मध्ये यू/ए लिहिलेले असेल तर याचा अर्थ चित्रपट फक्त 18 वर्षांवरील व्यक्ती पाहू शकतात म्हणजेच हा चित्रपट लोकांसाठीच पाहण्यास परवानगी आहे. ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षाखालील आहे अशा प्रकारच्या व्यक्ती हा चित्रपट पाहू शकणार नाही. जर चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेल्या प्रमाणपत्र मध्ये एस असा उल्लेख केलेला असेल तर याचा अर्थ असा होतो की हा चित्रपट विशिष्ट वर्गासाठी बनविण्यात आलेला आहे. जसे की डॉक्टर इंजिनियर सैनिक, वैज्ञानिक इत्यादी..

हे वाचा:   गाडी मध्ये कोणते पेट्रोल भरावे साधे किंवा प्रीमियम.? कोणते पेट्रोल असते गाडीसाठी जास्त फायदेशीर.!

त्याचबरोबर या प्रमाणपत्र मध्ये चित्रपटाशी संबंधित असणारी काही माहिती संक्षिप्त स्वरूपात लिहिलेल्या असतात म्हणजेच की चित्रपटाचे नाव, चित्रपट कोणी दिग्दर्शन केलेला आहे ,चित्रपटांमध्ये कोणकोणते अभीनेत्री, अभिनेता यांनी अभिनय केलेला आहे, चित्रपटाचा कालावधी किती आहे ,चित्रपटाचा प्रकार कोणता आहे ,चित्रपट टू डी मध्ये आहे की थ्रीडी मध्ये आहे अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या प्रमाणपत्र मध्ये समाविष्ट केली जाते आणि त्याचबरोबर चित्रपट मंडळ अधिकाऱ्यांची सही सुद्धा या चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर आवर्जून केलेली असते.

तर मित्रांनो तुम्हाला आता तर कल्पना आलीच असेल की या प्रमाणपत्राचे नेमके महत्त्व काय आहे यापुढे जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा हे प्रमाणपत्र पाहताना तुम्हाला नक्की कळेल की हा चित्रपट कोणत्या वर्गीकरणातला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.