घरात ठेवा या 5 पैकी कोणतीही 1 चांदीची वस्तू; माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील.!

अध्यात्म

चांदीच्या वस्तू स्वतःकडे धनदौलत पैसा खेचून आणतात असे पुराणांमध्ये सांगितलेले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पाच वस्तू बद्दल लेखात सांगणार आहोत की ज्या पाच पैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरा मध्ये किंवा दुकानात जरी ठेवली तरी तुमचे भाग्य चमकन्याची क्षमता या वस्तूंमध्ये आहे. तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणण्याचे काम या चांदीच्या वस्तू करतात.धन दौलतीचे मालक बनण्याची क्षमता या वस्तूंमध्ये असते.

त्या बरोबरच कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेपासून तुमचे संरक्षण या वस्तू करतात तसेच घरामध्ये गृह क्लेश म्हणजे घरात वादविवाद, भांडणे होऊ देत नाहीत तसेच तुमच्या कुंडलीमध्ये जर काही राहू दोष असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात. या चांदीच्या वस्तू कोणत्या आहेत, त्या कोणत्या प्रकारे खरेदी करायच्या आणि आपल्या घरामध्ये कोणत्या ठिकाणी व्यवस्थीत ठेवायला हव्यात याबद्दल आता आपण जाणून घेऊया
पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा.

तुम्ही कोणत्याही सोनाराकडे जा त्या ठिकाणी तुम्हाला हा चांदीचा चौकनी तुकडा नक्की मिळेल, त्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे ,व्यापार वाढावा, मोठा धनलाभ व्हावा असे ज्यांना वाटते त्यांनी असा चांदीचा चौकोनी तुकडा आपल्या लॉकरमध्ये नक्की ठेवावा. तुम्ही तुमच्या लिविंग रूम मध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा तुकडा लावू शकता.

हा तुकडा लक्ष्मीची पाऊले आपल्या घराकडे खेचून आणतो.दुसरी वस्तू म्हणजेच चांदीची चैन. ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाही,विवाह होण्यामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी सकाळी ही चांदीची चैन आपल्या गळ्यामध्ये घालावी आणि चैनमध्ये एक भरीव अशी गोल गोळी नक्की बसवून घ्यावी. असे केल्याने विवाह लवकर होतात तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रथम राहू आहे अशा लोकांनी सुद्धा अशी चांदीची चैन नक्की करावी.

हे वाचा:   सकाळी दरवाजा उघडताच करा सर्वात आगोदर हे काम; पैसे येण्याचे सर्व मार्ग होतील खुले.!

तिसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा हत्ती. आपला उद्योग वेगाने व्हावा ,त्यात प्रगती व्हावी असे जर वाटत असेल तर अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर आपल्या घरामध्ये ठेवावा. हा हत्ती ठेवल्याने व्यापारामध्ये एका वेगळ्या उंचीवर तुम्ही पोहचाल. हा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो पण त्याचबरोबर प्रथमेश म्हणजेच देवांचे देव श्री गणेश यांची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून समाजामध्ये मोठा मान सन्मान मिळवून देण्याचे काम हा चांदीचा हत्ती करत असतो. चौथी वस्तू म्हणजे चांदीची डबी.

या डबी मध्ये जर आपण पाणी भरून ठेवले तर तुम्हाला जाणवेल की माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये पाणी भरत आहे आणि यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी पैसा, धन वेगवेगळ्या मार्गाने येऊ लागेल. लक्ष्मीची पावले तुमच्या घराकडे येत आहेत की ज्यामुळे तुम्ही मालक व्हाल. पैसा तुमच्या घरामध्ये येऊ लागेल.

ज्या लोकांच्या चतुर्थ स्थानी राहू असतो अशा लोकांनी तिजोरी मध्ये पाण्याची डबी ठेवू नये.अशा लोकांनी या चांदीच्या डबीत पाण्याऐवजी मध ठेवावा आणि अशी ही चांदीची डबी आपल्या तिजोरी बाहेर कुठेही अशा ठिकाणी किंवा या ठिकाणी लोक ये-जा करणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवावी. याचा लोकांना सुद्धा याचा मोठा फायदा मिळेल आणि पाचवी ची गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा ग्लास. आपल्या घरामध्ये आपण एक चांदीचा ग्लास नक्की ठेवा कारण चांदीच्या ग्लास मधून पाणी पिणे खूप शुभ मानले जाते.

हे वाचा:   ज्यांना सकाळी ३ ते ५ यावेळेस जाग येते त्यांनी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

आपण आणि आपल्या घरातील सदस्य नेहमी ते पाणी पीत असाल तर त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते आणि ही सकारात्मक उर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरात दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते आणि सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी माता लक्ष्मी असे समीकरण पुराणांमध्ये सांगितले आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये या वस्तू नक्की ठेवा आणि त्याचा वापर सुद्धा करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.