स्वतः कृष्णा म्हणतात की या चूका मनुष्याला निर्धन बनवतात; अशी व्यक्ती कधीच श्रीमंत बनत नाही.!

अध्यात्म

एखाद्या माणसाकडे पैसा असणे किंवा एखाद्या माणसाकडे पैसा नाही यासाठी व्यक्ती स्वतः जबाबदार असतो परंतु बहुतेक वेळा पैसा कसा कमवावा व त्याचा योग्य ठिकाणी कशा पद्धतीने वापर करावा हे सुद्धा मनुष्याच्या हातामध्ये असते परंतु समुद्र शास्त्र मध्ये असे सांगण्यात आले आहे की, आपण अशा काही चुका दैनंदिन जीवनामध्ये करत असतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये पैसा लवकर येत नाही, असलेला पैसा टिकत नाही यासाठी अनेक अशा काही गोष्टी कारणीभूत असतात.

ज्याचा आपल्या भविष्यावर विपरीत परिणाम होत असतो. जर तुम्ही सुद्धा या चुका करत असाल तर वेळेवर स्वतःला सुधारावा अन्यथा तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे संकट येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे नेमके कोणते कार्य आहेत ज्या आपल्याला नाही करायला पाहिजे..

त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये नेहमी दान पुण्यकर्म करायला हवे त्याचबरोबर एखाद्याला दानधर्म करत असताना त्या व्यक्तीला निष्पक्ष भावनेने स्वच्छ मनाने दान करायला हवे.आपल्या मनामध्ये कोणतीही अट न ठेवता व कोणताही स्वार्थ न ठेवता दान करू नये.

हे वाचा:   केदारनाथ मंदिराचे रहस्य..आजपर्यंत वैज्ञानिकांना देखील समजले नाही ! अशा भयंकर पूरातून मंदिर कसे टिकले..काय आहे या धामचे रहस्य..

असे दान दान मानले जात नाही त्याचबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी असतात आई वडील असतात त्यांच्याशी नेहमी कमी स्वरांमध्ये बोलायला हवा. त्यांच्याशी नेहमी प्रेमपूर्वक चर्चा करायला हवी, त्यांच्या आत्मा कधीच दुखायला नाही पाहिजे. ज्या घरांमध्ये ज्येष्ठांचे सोबत चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जाते,अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच थांबत नाही .त्या घरावर माता महालक्ष्मी कधीच कृपा करत नाही.

त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण अन्नसाठी मेहनत करत असतो पण अन्न आपले जीवन आहे. या जीवनासाठी आपण खूप सारी मेहनत कष्ट करत असतो परंतु ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान केला जातो वारंवार उष्ट सोडले जाते त्या घरांमध्ये माता अन्नपूर्णा कधीच राहत नाही म्हणून आपल्याला अन्नाचा नेहमी आदर करायला हवा. अन्न उष्टं सोडायला नाही पाहिजे. आपल्या ताटामध्ये जे अन्नपदार्थ वाढलेले आहे ते अन्नपदार्थ गोड मानून त्यांचे सेवन करायला हवे.

हे वाचा:   घरात शि-वलिं’ग असेल तर हि १ चूक मुळीच करू नका; अन्यथा घर पूर्णपणे बरबाद होऊन जाईल.!

ज्या घरामध्ये नेहमी कचरा असतो, ज्या घरांमध्ये साफसफाई केली जात नाही ,ज्या घरांमध्ये सगळीकडे वारंवार कचरा इत्यादी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. उलट ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असते ज्या घरांमध्ये कचरा अजिबात दिसत नाही अशा घराघरांमध्ये माता महालक्ष्मी मोठ्या आवडीने प्रवेश करत असते आणि अशा घरांमध्ये माता महालक्ष्मीला राहण्यास आनंद वाटत असतो म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता साफसफाई अवश्य ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.