१०० वर्ष स्वस्थ जीवनाची चावी आहे भुईआवळा वनस्पती; कावीळ, डायबिटीज यासारखे प्रॉब्लेम करेल मुळापासून नष्ट.!

आरोग्य

ही वनस्पती फक्त आपली भूक वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरत नाही तर आपल्या शरीरातील कामभावना वाढविण्यासाठी सुद्धा मदत करत असते. ही वनस्पती आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे बरे करत असते. जर आपल्याला लिवर इन्फेक्शन झाले असेल, पोटामध्ये दुखत असेल, आपले हृदय व्यवस्थित कार्य करत नसेल, लघवी व्यवस्थित होत नसेल, लघवी करताना वारंवार जळत असेल, आग होत असेल, लघवी थांबून थांबून होत असेल, पोटामध्ये गॅस निर्माण झाला असेल.

या सर्व आजारांसाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्याचबरोबर महिलांच्या अनेक समस्या वर सुद्धा रामबाण औषध म्हणून या वनस्पती कडे पाहिले जाते. या वनस्पतीचे नाव आहे भूमी आवळा. वेगवेगळ्या प्रदेशानुसार ह्या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते.

जर तुमचे लिव्हर दुखत असेल, लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी या वनस्पतींच्या पानांचा काढा प्यायल्याने आपल्याला त्वरित आराम पडतो यासाठी आपल्याला या पानांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि चारशे मिली ग्रॅम पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि एकदाका हा काढा तयार झाल्यानंतर हा काढा आपल्याला सकाळी उपाशीपोटी व रात्री जेवणाच्या एक तास अगोदर प्यायचा आहे असे केल्याने लिव्हरमध्ये वेदना होत असेल तर ती वेदना पूर्णपणे बंद होणार आहे.

हे वाचा:   वाढलेले पोट कमी करण्याचे घरगुती उपाय..अगदी काही दिवसात पोट पूर्ण सपाट होईल..जाणून घ्या

त्याचबरोबर जर आपल्या शरीरामध्ये गाठ निर्माण होत असेल तर अशा वेळीसुद्धा ही वनस्पती अत्यंत लाभदायी ठरत असते. जर तुम्हाला डायबिटीस कमी करायची असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणामध्ये आणायचे असेल तर अशा वेळी या वनस्पतींच्या पानांची पावडर तसेच पंचांगाची पावडर एकत्र करून दिवसभरातून एकदा या चूर्ण चे सेवन करायचे आहे, असे केल्याने आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते परिणामी डायबिटीस सुद्धा नियंत्रणात राहते.

ज्या महिलांना स्तनाचा ठिकाणी गाठ येते अशा वेळी आवळ्याच्या पंचांगाचा चूर्ण बनवून आपल्याला स्तनाच्या ठिकाणी लावायचा आहे. अनेक महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान बहुतेक वेळा जास्त रक्तस्राव होत असतो अशावेळी या वेदना सुद्धा सहन न होणारे असतात या वेळी आपण आवळा चूर्ण दिवसभरातून दोन वेळा जरी सेवन केली तर आपल्या मासिक पाळीच्या दरम्यान वेदना कमी होतात.

हे वाचा:   गुळ खाणाऱ्या लोकांनी एकदा जरूर वाचाच ! दररोज गुळ खाल्ला तर काय होऊ शकते पहा.. बघा याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात..

जर तुम्हाला लघवी थांबून थांबून होत असेल, लघवी करताना जळजळ होत असेल तर अशा वेळी भुईआवळाच्या पानांचा रस त्यामध्ये जिरे व साखर मिक्स करून पायल्याने आपली लघवी व्यवस्थित होते. जर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर अशा वेळी आवळ्याच्या पानांची पेस्ट बनवून त्यामध्ये मीठ मिसळावे आणि प्रभावी जागेवर लावावे असे केल्याने आपल्या शरीरावरील खाज लवकर दूर होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.