आजच्या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सध्याची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपले शरीर चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक महत्त्वाची वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत.या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम,मॅग्नेशिअम, सल्फर,सोडियम, फॉलिक ऍसिड व इत्यादी विटामिन्स उपलब्ध आहेत. या वनस्पतीचे नाव आहे गवती चहा.
गवती चहा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे त्याचबरोबर गवती चहाचा काढा प्यायल्याने आपल्या शरीराला खूप सारे पोषक तत्व शुद्ध मिळतात त्याच बरोबर गवती चहा मध्ये अक्सिडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पळून जाण्यास मदत होते.
गवती चहा मध्ये असणारे आयुर्वेदिक घटकांमुळे आपल्या शरीरातील जे काही वाईट पेशी आहेत त्या निघून जाण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर ज्या काही चांगल्या देशी आहे त्यांची वाढ होण्यास मदत होते गवती चहाचा काढा नियमितपणे केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होऊन जाते आणि त्यामुळे अनेकदा हृदयरोगाचा झटका सुद्धा येत नाही.
ज्या व्यक्तींना उच्च ब्लडप्रेशर आहे अशा व्यक्तीने जर नियमितपणे गवती चहाचा काढा प्यायला तर त्यांचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते तसेच अनेकदा आपल्याला सर्दी, खोकला, ताप यासारखे इन्फेक्शन होत असते यावर सुद्धा रामबाण औषध म्हणून गवती चहाचा काढा खूप मोठ्या प्रमाणावर वापरला गेलेला आहे.
गवती चहा मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी वाईट घटक आहेत ते घटक साफ होण्यासाठी व आपले शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत होते यामुळेच आपल्या शरीरातील इतर अवयव म्हणजेच लिव्हर, हार्ट, किडनी यासारखे अन्य अवयव सुद्धा सुरळीतपणे कार्य करू लागतात व त्यांची स्वच्छता होते आणि ते आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करतात त्याच बरोबर अनेक वेळा आपले पोट साफ होत नाही पोटामध्ये गॅस निर्माण होत असतो आणि त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो अशावेळी आपल्या पोटातील कीटक जंतू नष्ट करून आपले पोट स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा गवती चहाचा काढा महत्त्वाची भूमिका बजावतो.
अनेकदा वेगवेगळ्या आजारांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे कमी होऊन जाते, अशा वेळी आपल्या शरीराला नव्याने तरी निर्माण करण्यासाठी गवती चहा महत्त्वाची भूमिका बजावतो त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती वारंवार तणावात असेल तर अशा वेळी गवती चहा मध्ये असणारे अँटी डिप्रेशन या गुणधर्मामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होतो त्याचबरोबर अनेकांना तासन तास काम केल्यामुळे झोप लागत नाही. आपल्याला झोप न लागण्याचे समस्येवर सुद्धा गवती चहा महत्त्वाची भूमिका बजावतो.
नियमितपणे दिवसभरातून दोन वेळा त्याने आपले शरीर पूर्णपणे निरोगी बनते. हा काढा बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गवती चहा ची पाने टाकायचे आहेत हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळून झाल्यावर गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये चवीसाठी थोडेसे मध मिसळायचे आहे अशा पद्धतीने आपला हा काढा तयार झालेला आहे. हा उपाय आपण महिनाभर जरी सातत्याने केला तरी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढणार आहे त्याच बरोबर आपल्या शरीरातील इतर अवयव सुद्धा मजबूत राहणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.