सकाळी दरवाजा उघडताच करा सर्वात आगोदर हे काम; पैसे येण्याचे सर्व मार्ग होतील खुले.!

अध्यात्म

सकाळी उठल्यानंतर घरातील महिलांनी नेमकी काय काम करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी यांचे आगमन होऊ शकेल. सकाळी उठल्यानंतर दरवाजा उघडताच आपल्याला काय काय करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या घराचे मुख्य द्वार असे नेहमी स्वच्छ असायला हवे. मुख्य दारासमोर कधीच घाण व कचरा असायला नको. घरातील महिला ने सकाळी उठल्यानंतर स्नानविधि करून एका ताब्यामध्ये पाणी घेऊन उंबरठा जवळील थोडी-थोडी शिंपडावे.

जर यामध्ये गंगेचे पाणी असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर घरातील साधे पाणीसुद्धा चालू शकते. रात्री झोपतांना घरामध्ये एका भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर या भांड्यातील पाणी उंबरठा जवळ शिंपडावे. यामुळे रात्रभर उंबरठ्यावर जमा झाली नकारात्मक ऊर्जा सकाळी दरवाजा उघडताच आत मध्ये प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर जर आपल्यावर कोणी काळी जादू, करणी केली असेल तर अशावेळी आपले अंगण स्वच्छ धुवावे.

आपल्या घरातील लादी पुसताना पाण्यामध्ये मीठ टाकावे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल तसेच प्रत्येक सोमवारी आपल्या घराला आंब्याचे तोरण जरूर लावावा ,असे केल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होईल,असे केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्य चांगले राहतील.

जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यांचे आरोग्य सुद्धा चांगले होईल. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धन हवे असेल तर एक बुधवारी आपल्या घराला अशोकाची तोरण जरूर लावावा असे केल्याने तुमच्या घरा मध्ये धन नेहमी आकर्षित होऊ लागेल. घरात कधीच धनाची कमतरता निर्माण होणार नाही.

हे वाचा:   कुणी कितीही मागू द्या या 4 वस्तू कुणालाही देऊ नका; माता लक्ष्मी कायमची साथ सोडून जाईल.!

आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणपतीचा फोटो जरूर लावावा त्याचबरोबर असेसुद्धा म्हटले जाते की गणपती च्या पाठीमागे दारिद्रता लपलेली असते म्हणूनच घराच्या मुख्य दरवाजाजवळ वरती गणेशा फोटो लावा पण त्याच बरोबर घराच्या आतील बाजूला सुद्धा गणेशाचा फोटो लावा जेणेकरून तुमच्या घरा मध्ये दरिद्रता निर्माण होणार नाही. घरामध्ये सारखे भिंतीवर व इतर ठिकाणी देवाचे फोटो लावू नये कारण की देव ही काही शोभेची वस्तू नाही.

जर आपण देवांचेफोटो सोडवून आणले तर आपले सुद्धा शोधावे लागत नाही त्याचबरोबर देवघरामध्ये देवांच्या फोटोचे पूजन होते. घरात इतरत्र कुठेही ठेवले तर त्यांचे पूजन होत नाही त्याच बरोबर घरात कोठेही हिंसक प्राण्याचे फोटो लावू नये अशामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार व त्याचा चुकीचा परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होत असतो.

घरामध्ये वाहत्या झराचा फोटो असू नये अशा मुळे आपल्या घरातील पैसा पाण्यासारखा वाहतो तसेच दरवाजाला आजूबाजूला दोन स्वास्तिक असणे नेहमी चांगले ठरते व शुभ ठरते. थोडेसे तांदूळ एका वाटीमध्ये भिजवून त्याची पेस्ट केल्याने व त्यामध्ये हळद मिक्स करून आपल्या उंबरठ्याच्या मधोमध ओम लिहिल्याने आपल्या घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप जरूर लावावा यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागते.

हे वाचा:   वृश्चिक राशीं असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घ्या…तुमचे भविष्य कसे असेल, तुमचा स्वभाव, राजयोग, नोकरी, वै’वाहिक जी’वन आणि तुमची आर्थिक स्थिती कशी असेल वाचा

जर आपल्या घराच्या आजूबाजूला जर पिंपळाचे झाड असेल तर ते अलगद बाजूला काढून कुठेतरी मंदिराच्या आवारात लावावे. जर आपल्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड असेल तर आपल्याला शनि दोष लागतो. या घरांमध्ये मनी प्लांट असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास करते परंतु मनी प्लांट हे दक्षिण दिशेला असावे. मनी प्लांट हे नेहमी कुंडीमध्ये लावावे जमिनीवर लावू नये अन्यथा त्याची पाने खूप मोठी वाढतात त्यामुळे दोष निर्माण होतो तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण सगळ्यांनीच आपल्या पाहिजे जेणेकरून माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आपला धनसंपत्ती वर्षाव करील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.