उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्या सर्वांना एक समस्या प्रामुख्याने जाणवू लागते ती म्हणजे उन्हाळा लागणे. अनेकांना उन्हाळ्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ लागतो. ही उष्णता कधी कधी एवढी भयंकर असते की त्याच्या आपल्याला अनेकदा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होऊ लागतात.
खरेतर उष्णता येण्याचे वेगवेगळे कारण सुद्धा असू शकतात. अनेकांना आपल्या शरीरातील जे काही विटामिन्स ,खनिज ,पोषक तत्व आहे यांच्या कमतरतेमुळे सुद्धा उष्णतेचा त्रास होत असतो म्हणूनच या सर्व समस्येवर उपाय म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा पदार्थ अतिशय थंड आहे आणि आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे.
ताकामध्ये आपल्या घरातील एक पदार्थ अशा पद्धतीने मिक्स करून प्या, शरीरामध्ये किती प्रमाणात उष्णता असेल, आता पायाची आग होत असेल तर हातापायांना मुंग्या येत असतील, उष्णतेचा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल, तुम्हाला तोंड येत असेल त्याच बरोबर तुमचं वजन वाढत असेल , काही खाल्ले तरी पचन लवकर होते असे या सर्व समस्या वर हा उपाय रामबाण ठरणार आहे. हा उपाय अगदी साधा सोपा आणि सरळ आहे यावर उपाय साठी लागणारे पदार्थ सुद्धा घरातले आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास भर ताक लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा धने द्यायचे आहे. धन्या मध्ये शीतलता असते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी धन्यांचा उपयोग केला जातो त्याचबरोबर पित्त सुद्धा कमी होते त्यानंतर आपल्याला एक चमचा जिरा घ्यायचा आहे शरीरातील उष्णता कमी करतो म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आहारामध्ये जिराचा समावेश करणे अतिशय गरजेचे ठरते त्याचबरोबर यामध्ये असे काही महत्त्वाचे गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील अन्नपचन सुद्धा चांगले होते.
सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पुदिना. पुदिना हा आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे कार्य करतो आणि त्याच्या अंगी असणारे शीतल गुणधर्म आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाची ठरतात. या सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर एका पळी मध्ये तूप घ्यायचे आहे त्यानंतर बारीक वाटलेले हे मिश्रण आपल्याला थोडेसे गरम करायचे आहे एकदा का हे व्यवस्थित पळी गरम झाल्यानंतर आपल्याला त्या पळी मध्ये मिश्रण ताक मध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक दोन मिनिटे झाकण ठेवायचे आहे.
हे ताक थंड झाल्यानंतर आपल्याला आता ताक प्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्या तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे परंतु हे ताक आपल्याला रात्री झोपताना प्यायचे नाही. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे ताक पिऊ शकता. हा उपाय केल्याने आपल्या शरीरात उष्णता कमी होणारच आहे त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर अपचन खूप मोठ्या प्रमाणावर होत असेल तेसुद्धा हा उपाय केल्यामुळे कमी होणार आहे कारण की हा उपाय केल्यामुळे पचनसंस्था चांगली राहते.
पोट वेळेवर स्वच्छ होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपले वजन सुद्धा कमी होते. ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तीने हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे, असे केल्यामुळे तुमच्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन तुमचे वजन सुद्धा कमी होईल म्हणून हा अत्यंत साधा सरळ सोपा घरगुती उपाय असल्याने हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.