मिठाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू सात दिवसांमध्ये चमत्कार दिसू लागेल आणि माता महालक्ष्मी तुमचे घर शोधत येऊ लागेल. भूत बाधा करणे,करणी, जादुटोना, नजर दोष पासून तुमची व तुमच्या घराची कायमची सुटका होईल. ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाला खूप मोठे महत्त्व दिले गेलेले आहे त्याचबरोबर तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये सुद्धा मिठाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे.
तंत्र-मंत्र शास्त्रातील कोणताही उपाय जर आपण पाहिला तर उदाहरणार्थ नजर काढणे अशा वेळेस सुद्धा आपण मिठाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करत असतो, अशा सर्व गुण संपन्न असणाऱ्या मिठा बद्दल असा महत्त्वाचा उपाय आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तसेच तुम्हाला संतान सुख हवे असेल तर त्याच बरोबर तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळवून आणायचे असतील आणि तुम्हाला पैसा पाहिजे असेल , श्रीमंत व्हायचे असेल तर अशावेळी आपल्याला हा उपाय करणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ हे उपलब्ध असते.
आपल्या घरातील प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यामध्ये आपण मीठ ठेवलेले असेल तर त्या भांड्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून तुमच्यावर कोणी नजर दोष, बाधा, करणी इत्यादी काही गोष्टी केलेल्या असतील तर त्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल आणि ज्या व्यक्तीने तुमच्यावर आपल्यावर केलेला आहे तो प्रयोग त्या व्यक्तीवर पुन्हा उलटेल. बरेचदा असे होते की आपले शत्रू आपल्याला त्रास देत असतात आणि आपल्यावर वाईट शक्तीचा वापर करतात यापासून सुरक्षित राहण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
हा उपाय अतिशय साधा सोपा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी घरामध्ये मीठ ठेवतात त्या मिठाचे डब्यामध्ये आपल्याला तीन ते चार लाल मिरच्या ठेवायच्या आहेत. या सुकलेल्या लाल चार-पाच मिरच्या आपल्याला मिठाच्या डब्यामध्ये नेहमी ठेवायच्या आहेत नंतर तुम्ही काही काळानंतर त्या मिरच्यांचा उपयोग आपल्या जेवणामध्ये करू शकतात परंतु मिठाच्या डब्यामध्ये लाल सुकलेल्या मिरच्या आवश्यक ठेवायला हव्यात.
हा उपाय केल्याने तुम्ही व तुमच्या घरातील अन्य सदस्य कोणत्याही वाईट शक्ती पासून आपले संरक्षण करू शकाल. घरामध्ये सकारात्मक विचार,ऊर्जा नेहमी वास करेल आणि तुमच्या पैशा संबंधित ,नोकरी संबंधित, व्यवसाय संबंधित ज्या काही सर्व समस्या असतील त्या समस्या लवकरच दूर होतील म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.