ही एक वस्तू गुपचूप घरी घेऊन या; तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमी भासणार नाही.!

अध्यात्म

आजच्या लेखामध्ये आपण अचानक धन प्राप्ति चा महत्वपूर्ण असा उपाय जाणून घेणार आहोत. अचानक झालेला म्हणजे कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना होणारा लाभ म्हणजेच धनलाभ होय. हा उपाय केल्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही मार्गाने पैसा नक्की येईल मग तो पैसा तुम्हाला नोकरी मध्ये बढती मिळेल, तुम्हाला लॉटरी लागू शकते किंवा तुम्ही जर सट्टा खेळत असाल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतील किंवा तुमच्या व्यवसाय उद्योग धंदा मध्ये अचानकपणे पैसा येऊ लागेल मग ते कारण कोणतेही असू दे तुमच्या आयुष्यात पैसा येणार म्हणजे येणारच.

हा उपाय लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही करू शकतो. जर तुम्हाला जॉब नसेल, काम धंदा नसेल तर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला अचानकपणे जॉब लागू शकतो. अचानक तुमच्याकडे पैसा येऊ लागेल परंतु हा उपाय करताना एकच अट आहे ती म्हणजे हा उपाय गुप्त पद्धतीने करा. या उपायाची वाचता कोणाकडेच कधी करू नका खरं तर हा एक टोटका आहे आणि हा उपाय आपल्याला कोणाला न सांगता करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच ग्रंथ शास्त्रांमध्ये अनेक असे काही उपाय सांगितले गेले आहेत ते अतिशय प्रभावी आहेत.

अनेक संप्रदाय मध्ये सुद्धा असे काही उपाय सांगितले गेले आहेत. जर हा उपाय आपण मनामध्ये शंका घेऊन करायला गेलो त्याचबरोबर या उपायाची चाचणी करण्याच्या हेतूने जर हा उपाय केला तर त्याचे योग्य ते फळ आपल्याला मिळणार नाही म्हणूनच हा उपाय करत असताना आपल्याला अगदी मनोभावे उपाय करायचा आहे त्याचे फळ आपल्याला नेहमीच सकारात्मक प्राप्त होईल. हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे .तुमच्या घराच्या आसपास जर कुठे रुईचे झाड असेल तर हे रुईचे चे झाड आपल्याला उपायासाठी लागणार आहेत. हे झाड दोन प्रकारचे असते. एक पांढरी आणि एक लालसर फुले येणारी रुई असते.

हे वाचा:   झोपण्यापूर्वी बायकांनी हे काम नक्की करा; घरात पैशाची कमी कधीच पडणार नाही.!

तंत्र शास्त्रामध्ये पांढऱ्या रूईचा म्हणजेच पांढरी फुले येणाऱ्या रुईच्या झाडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हणूनच आपल्याला या उपायासाठी पांढरे फूल असणाऱ्या रुईचे झाड निवडायचे आहे. यावेळी च्या झाडा मध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असे मानले गेलेले आहे. काही विशिष्ट वर्षानंतर या झाडाच्या मुळा मध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीची निर्मिती होते असे मानले गेले आहे. हे झाड खूप जुनी असेल तर हा उपाय करण्यासाठी सुयोग्य मानले जाते जुने झाड नसले तरी नवीन झाड आपण हा उपाय करण्यासाठी उपयोगात आणू शकतो. शुक्रवारी सकाळी स्नान विधी करून आपल्याला या झाडाजवळ जायचे आहे ,आपण संध्याकाळी सुद्धा या झाडाजवळ गेलो तरी चालेल.

या झाडाकडे जाताना आपल्याला एका तांब्याच्या भांड्यामध्ये जल घेऊन जायचे आहे सोबतच अगरबत्ती ,फुले ,हळद-कुंकू घेऊन जायचे आहे. मनोभावे या झाडाची पूजा करायची आहे. धनाची देवता श्री कुबेर यांना प्रार्थना करायची आहे की हे कुबेर देव आम्ही तुम्हाला उद्या शनिवारी आमच्या घरी घ्यायला येणार आहोत. तुमच्या कृपाशीर्वादाने आमच्या घरामध्ये सुख शांती वैभव धन येऊ द्या. आमचे घर वैभव आणि धनाने भरून काढा आणि तुम्ही आमच्यासोबत स्वखुशीने या अशी हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला घरी परत यायचे आहे.

हे वाचा:   घरात लाल मुंग्या झाल्या तर नेमके काय घडते.? काय आहेत यामागील संकेत.!

प्रार्थना करताना आपले तोंड उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्या कारण उत्तर दिशा ही कुबेर देवता ची दिशा आहे. शनिवारी सकाळी लवकर उठून आवरून स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर आपल्या देवघरात ती देवांना नमस्कार करायचा आहे सर्वांचे आशीर्वाद द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जे आज कार्य करणार आहोत ते बोलून दाखवायचे आहे त्यानंतर आपल्याला या झाडाजवळ पुन्हा जायचे आहे. या झाडाजवळ गेल्यानंतर अगदी आदरपूर्वक आपल्याला हे झाड उपटायचे आहे.

मग या झाडाची मुळे आपल्याला आपल्या घरी आणायचे आहे हे झाड उपटायच्या आधीच मनोभावे प्रार्थना करूनच मग हेच झाड उपटा. त्यानंतर हे मूळ घरी आल्यानंतर गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर लाल रंगाच्या कापडी वस्त्यांमध्ये हे मूळ बांधून आपण जेथे धन पैसा नोटांची परचूंडी ठेवतो अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की कोणत्याही कातडी किंवा चामड्याच्या वस्तू जवळ हे मूळ आपल्याला ठेवायचे नाही त्यानंतर आपल्याला हळदी-कुंकू वाहून या मुळांची पूजा करायची आहे असे केल्याने तुमच्या ध्यानामध्येदिवसेंदिवस वाढ होत राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.