सतत पादायला होतंय.? एकदा हा उपाय एकदा नक्की करा; काहीही खाल्ल्यावर लगेच सर्व पचून जाईल.!

आरोग्य

जेवणानंतर या पदार्थाचा वापर अर्धा चमचा घ्या पचन संस्था एवढी मजबूत होईल की काही खाल्ले तरी ते पचून जाईल. गॅस, एसिडिटी, वारंवार पाद येणे यासारख्या समस्या लवकर दूर होतील. अपुरी झोप, तणावपूर्ण जीवनशैली, अरबट चरबट खाणे, बाहेरचे पदार्थ ,मसालेदार, तेलकट ,तिखट इत्यादी सारे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेला आहे. यापासून अलिप्त राहणे हे सर्वांना शक्य होते असे नाही.

या सवयीमुळे अनेकदा पित्ताचे त्रास निर्माण होतात. पूर्ण डोकेदुखी, उलट्या, मळमळ ,छातीमध्ये दुखणे असे अनेक त्रास होऊ लागतात. या पित्तासाठी बाजारामध्ये उपलब्ध असणारे अंटासाईड वापरले जाते परंतु कधीकधी यांचा सुद्धा फरक आपल्याला होत नाही अशा वेळी आपले आपले घरगुती उपाय आपल्याला चमत्कार दाखवून देतात. चला तर मग जाणून घेऊया. हा उपाय कसा बनवायचा त्याबद्दल..

ॲसिडीटी बंद करणारा असा गुणकारी उपाय बनवण्यासाठी आपल्याला चार वस्तू लागणार आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे ओवा. अपचन , ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या उपायावर यासारख्या उपायावर उपचार म्हणून ओवा फार पूर्वीच्या काळापासून वापरला जात आहे. आपण आपल्या उपायासाठी एक चमचा ओवा घ्यायचा आहे या नंतर दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जिरे. आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीतपणे कार्य करण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणूनच जेवण बनवताना सुद्धा याचा वापर केला गेला पाहिजे. आपला उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा जिरा घ्यायचा आहे.

हे वाचा:   फणसाच्या बीयांचा असा वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; खूपच फायदेशीर आहेत या बिया.!

आता ओवा आणि जीरा मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, यांच्यातील तिखट पणा जाण्यासाठी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बसून काम करणाऱ्या व्यक्तींना अपचन ,ॲसिडिटी, गॅस यासारख्या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत असते. अशा व्यक्तीने जर डायबिटीस नसेल तर जेवण झाल्यानंतर एक पिकलेली केळी जरूर सेवन करावे. केळी मुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोटॅशियम ची मात्रा मिळत असते. पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते त्याचबरोबर शरीराला फायबरचा सुद्धा पुरवठा होतो आणि आपले पोट व्यवस्थित स्वच्छ होते. हे दोन्ही घटक व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला तिस-या पदार्थ लागणारं आहे तो म्हणजे बडीशोप घ्यायचा आहे.

बडीशेप खाल्ल्याने अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट सुद्धा साफ होते. या उपाय साठी आपल्याला कच्ची बडीशोप एक चमचा द्यायची आहे. आता या तिन्ही पदार्थांची आपल्याला पावडर बनवायची आहे यानंतर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी लागणार आहे. आपण बनवलेल्या पावडर पैकी अर्धा चमचा पावडर ग्लासमध्ये टाकायची आहे यानंतर शेवटचा पदार्थ म्हणजे सैंधव मीठ यालाच आपण काळेमीठ सुद्धा म्हणतो.

हे वाचा:   फक्त या बियांच्या वापराने ३ दिवसांतच मुतखडा पडेल; ऑपरेशन करण्याची गरजच भासणार नाही.!

आपल्या आवश्यकतेनुसार व चवीला लागणाऱ्या पद्धतीने हे मीठ आपल्याला ग्लास मध्ये मिसळायचे आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला सकाळ-संध्याकाळ जेवण झाल्यानंतर पंधरा मिनिटांचा अवधि देऊन प्यायचे आहे. अशा पद्धतीने २० ते ३० दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास तुमची कितीही जुनी पित्ताची समस्या असुद्या ती मुळापासून नष्ट होईल. या उपायाने शरीरातील अनावश्यक चरबी सुद्धा गळून जाते म्हणून आपल्या शरीरासाठी व आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.