वाईट काळ चांगल्या काळामध्ये बदलेल; फक्त हे दोन नियम नक्की पाळा.!

अध्यात्म

हिंदूधर्म घरामध्ये प्रत्येकाच्या घरात देवघर असते. आपल्या घरात कितीतरी देवी देवतांच्या मूर्त्या व फोटो स्थापित केलेल्या असतात आणि आपण त्यांचे पूजन करतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण देवी देवतांच्या मूर्त्या बद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अशा दोन देवी देवतांच्या मूर्त्या आहेत ,ज्या आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे राज योग घडून येतो याचाच अर्थ असा की जे तुम्ही इच्छा स्वप्न सुख पाहिले होते ते खरे होते.

भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. विविध प्रकारची पूजा आराधना करत असतो.अनेक व्रत, उपवास करत असतो त्याच बरोबर या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्या देवघरात ठेवल्याने आपल्याला खूप लाभ होतो व आपले भाग्य चमकते चला तर मग जाणून घेऊया त्या नेमक्या कोणत्या दोन मुर्त्या आहेत ज्यामुळे आपल्याला राजयोग प्राप्त होणार आहेत. आपल्या प्रत्येकाच्या देवघरात कृष्णाची म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती असतेपरंतु ही मुर्ती आपल्या देवघरात एकटी ठेवू नका.

या मूर्ती सोबतच राधा राणी ची मूर्ती सुद्धा देवघरात ठेवा किंवा जर तुमच्याकडे श्रीकृष्णाचा फोटो असेल तर राधा राणी सोबत असलेला श्रीकृष्णाचा फोटो तुमच्या देव घरामध्ये ठेवा.ज्या घरामध्ये श्री कृष्ण व राधा राणी यांचा एकत्रित असलेला फोटो किंवा मूर्ती असते त्या घरामध्ये कधीच वाद भांडण होत नाही.

पती-पत्नी व कुटुंबामध्ये प्रेम टिकून राहते व घर नेहमी अन्न धान्य ने भरलेले राहते त्याचबरोबर प्रत्येकाला धनाची पैशाची वैभवाची अपेक्षा असते.त्यासाठी प्रत्येक जण आपल्या देवघरामध्ये माता महालक्ष्मीची आवर्जून पूजा करत असतात.परंतु ही पूजा करत असताना अनेक जण श्रीहरी यांची पूजा करत नाही परंतु एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवली पाहिजे तेथे श्रीहरी असतात तेथेच माता महालक्ष्मी वास करत असते म्हणून जर तुम्हाला तुमच्यावर कृपादृष्टी व्हावी असे वाटत असेल तर माता महालक्ष्मी सोबतच श्रीहरी यांची सुद्धा पूजा करायला हवी,असे केल्याने माता महालक्ष्मी चा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.

हे वाचा:   वास्तुशास्त्रातील या शुल्लक चुकीमुळे घरातील स्त्री सारखी आ'जारी पडते...घरातील या 5 गोष्टी त्वरित बदला..नाहीतर परिणाम वाईट होतात..

तसेच माता महालक्ष्मी च्या उजव्या बाजूला श्री गणपती व श्री कुबेर यांची सुद्धा पूजा करावी. यामुळे आपल्याला नक्कीच धनलाभ होईल आणि आपले दारिद्र्य नष्ट होईल. धनप्राप्तीसाठी माता महालक्ष्मी व श्री गणपती यांची एकत्रित पूजा करावी. माता महालक्ष्मी धनाचे भांडार आहे तर श्री गणपती रिद्धी सिद्धी यांचे भांडार आहेत.अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी असतो की आपल्या घरामध्ये बजरंगबली यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायचं का तर अशावेळी जर तुमची श्रद्धा बजरंगबली यांच्यावर असेल तर आपल्या देवघरामध्ये बजरंग बली यांची मूर्ती अवश्य ठेवा.

तसेच जर तुमच्याकडे श्री रामाची मूर्ती असल्यास तरी उत्तम आहे कारण की जेव्हा आपण श्रीरामांची पूजा करतो तेव्हा आपल्याला बजरंग बली यांची पूजा केल्याची सुद्धा प्राप्ती होत राहते म्हणून जर तुमच्या घरामध्ये राज्य दरबाराचा फोटो असेल तर तो घरामध्ये जरूर लावा. या फोटोमुळे घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेम, एकमेकांविषयी आदर इत्यादी भावना निर्माण होतात.

हे वाचा:   नवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला हि माहिती एकदा नक्की वाचा; तुम्हालाही वाचून धक्का बसेल.!

त्यानंतर आपण जाणून घेऊया की देवघरामध्ये नेमक्या कोणत्या मुर्त्या ठेवू नये ज्यामुळे आपल्याला अनेक समस्या तसेच देवी-देवतांचा क्रोध यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्याविषयी.. घरामध्ये मोठ्या प्रमाणावर मुर्त्या ठेवू नये त्याचबरोबर देवघरामध्ये प्रत्येक देवी-देवता यांचे एक यांचे एक एकच फोटो किंवा एकच मूर्ती असावी.

त्याचबरोबर देवघरामध्ये अंगठ्या च्या आकारापेक्षा मोठी शंकराची पिंड ठेवू नये यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर आपल्या देवघरामध्ये जास्त मुर्त्या असल्या तर त्यांची ही विशेष असे नियम असतात. अशा मूर्तींची आपल्याला सकाळ-दुपार-संध्याकाळ पूजा करावी लागते त्याचबरोबर आरती धूप आराधना सुद्धा करावी लागते म्हणूनच देवघरामध्ये शक्यतो जास्त फोटो व मुर्त्या ठेवू नये अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना संकटांना सामोरे जावे लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.