स्वयंपाक घरातून या गोष्टी कधीही संपू देऊ नका; परिणाम जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

अध्यात्म

स्वयंपाक घर ही घरातली अशी एक जागा आहे त्या जागेतून सर्व सदस्यांचे पोषण होते म्हणून तर स्वयंपाक गृहांमध्ये काही दोष असतील तर त्याचा विपरीत परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक गृहांमध्ये काही वस्तू कधीही संपू देऊ नये.

या वस्तू नेहमी थोड्या जास्त प्रमाणात आणल्या पाहिजेत किंवा संपण्यापूर्वीच आणायला हव्यात.जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या वस्तू कधीही संपू द्यायच्या नसतात. आपल्या आहारामध्ये मीठ हा सर्वात महत्वाचा घटक पदार्थ आहे.

परंतु मीठ हे प्रत्येक घरांमध्ये उपलब्ध असते परंतु कधीकधी थोडेसे मीठ शिल्लक राहते तेव्हा आपण विचार करतो की, हे मीठ आपण उद्या आणू आणि आपण संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे कधीही संपू देऊ नये. मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरात आणून ठेवायला हवे. घरातील मीठ संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण ठरते यामुळे यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करते.

यामुळे वास्तू दोष देखील होतो त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रिया वर पडतो तसेच घरात पैशासंदर्भात समस्या सुद्धा निर्माण होतात. हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवतो. हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो. भगवान विष्णू यांना सुद्धा हळद प्रिय आहे. घरात हळद संपणे म्हणजे गुरू ग्रहाचा दोष लागतो म्हणून घरात हळद कधीही संपू देऊ नये.

हे वाचा:   “या” पाच नावाचे पुरुष जन्मापासूनच मालक बनण्याचे भाग्य घेऊन येतात.!

एक तर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच नवीन हळद आणा. घरात पूर्णपणे हळद संपली तर मुलांकडे व त्यांच्या अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष देता येत नाही. शुभ कृतीमध्ये अडथळे येत राहतात. आपल्या घरात शुभता येण्यासाठी हळद कधीही कमी पडू देऊ नका. पीठ अशी एक वस्तू आहे ती सर्वांसाठी महत्त्वाची ठरते म्हणूनच पिठ संपायच्या आधीच आपल्या घरात पीठ हजर असते परंतु कधीकधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कमी होते, अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यामध्ये पीठ ठेवतात त्या भांड्यांमध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या.

हे भांडे पूर्णपणे रिकामी करू नका आणि त्यात पीठ आणून लवकर भरा. जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मानाबद्दल हानी निर्माण होऊ शकते. तांदूळ याचा उपयोग अन्नधान्य मध्ये करतातच पण कर्मकांडं मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. अक्षता नसणे म्हणजे पुजा अपूर्ण मानले जाते. घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो.

हे वाचा:   बायकोच्या या ५ चुका नवऱ्याला भिकारी बनवून सोडतात; तुमची बायको या चुका तर करत नाहीय ना.?

शुक्र ग्रह भौतिक सुख संपत्ती साठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होऊ लागतात म्हणून घरात तांदूळ कधीच संपू देऊ नका. घरात तांदूळ असल्यामुळे नेहमी पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाक गुहांमध्ये वरील काही महत्त्वाच्या वस्तू नेहमी भरलेल्या असू द्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडचण निर्माण होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.