चप्पल किंवा बूट उलटे ठेवलेले असल्यास घरात काय घडते.? परिणाम जाणून हैराण व्हाल.!

अध्यात्म

चप्पल हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.चप्पल असो वा बूट असो या दोघांबद्दल ज्योतिष शास्त्र व वास्तुशास्त्र मध्ये काही महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. बरेचदा असे होते की, आपण आपल्या घरासमोर चप्पल काढतो किंवा आपल्याकडून चप्पल उलटी होते. अगदी अनपेक्षितपणे नकळत या गोष्टी घडतात. मात्र असे पालथे पडलेले बूट व पालथे पडलेली चप्पल सरळ करून ठेवावेत कारण तुमची चप्पल वारंवार उलटी पडत असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये विनाकारण वाद निर्माण होतात भांडणे चालू होतात.

जर तुम्ही एखादी चप्पल दीर्घ काळ उलटी ठेवत असाल आणि ती चप्पल सरळ करत नसाल तर यामुळे तुम्ही आजारी सुद्धा पडू शकाल. विश्वास ठेवा मात्र ज्योतिषशास्त्र व वास्तूशास्त्र याच गोष्टीकडे जास्त लक्ष देते. बऱ्याच वेळा आपली चप्पल तुटते व खराब होते त्यावेळी आपण म्हणतो की चप्पल दुरुस्त करून घेऊ म्हणून ती चप्पल आपण घरात तशीच ठेवतो. अगदी महिनो-महिने ती चप्पल घरात अशीच पडून राहते. असे तुटलेले चप्पल व बूट आपल्या घरामध्ये अशांती निर्माण करतात.

अत्यंत मोठ्या परिस्थितीमध्ये घरामध्ये अशांती चा वास निर्माण होतो म्हणून अशा चपला लगेच दुरुस्त करून घ्या किंवा त्या चपला फेकून द्या. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की चपला दरवाजा समोर उभ्या करून ठेवतात. बाहेरून आल्यावर चपला दरवाजा समोर उभ्या करून देतात. अशा प्रकारची चूक करू नका. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते. परिणामी अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करणे उचित मानत नाही.

हे वाचा:   ज्या दिवशी उशीखाली ही 1 वस्तू ठेवाल तेव्हा होईल असे काही; जाणून घेण्यासाठी एकदा नक्की वाचा.!

तुम्हाला सवय असेल की बाहेरून आल्यावर दारावर चप्पल सोडणे व घराच्या आत येणे ही सवय मुळे माता लक्ष्मीला घरात प्रवेश करू देत नाही. अशा घरांमध्ये कधीच प्रगती होत नाही व बरकत राहत नाही. नवीन पैसा घरामध्ये येत नाही. मित्राचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही चुकून सुद्धा चप्पल व बूट गिफ्ट म्हणून देऊ नका कारण अशा प्रकारच्या गिफ्ट दिल्याने समोरच्या व्यक्तीच्या करियर वर खूप मोठा परिणाम होतो.

त्या व्यक्तीचे करियर निर्माण होण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात म्हणून कोणालाही चप्पल किंवा बूट गिफ्ट म्हणून देऊ नका.जर तुम्ही फाट्यक्या तुटलेल्या चपला घालत असाल तर तुमच्या जवळ असलेला पैसा कमी होण्याची शक्यता असते. या प्रगतीच्या शिड्या तुम्ही चढत आहात त्यामध्ये सुद्धा घसरण निर्माण होऊ शकते म्हणूनच तुटलेल्या फाटलेल्या चपला व बूट कधीच घालू नये.जर तुमच्याकडे तुटलेले फाटलेले बूट चपला असतील तर ते लगेच दुरुस्त करून घ्यावेत व मगच घालावेत अन्यथा ते फेकून द्या.

आपल्या पायांमध्ये शनी देवाचा वास असतो म्हणून जर तुम्ही फाटक्या चपला घालत असाल तर तुमच्यावर शनी देवाचा प्रकोप होतो.जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या वर शनी देवाचा प्रकोप आहे प्रत्येक कार्यामध्ये शनिदेव अडथळा निर्माण करत आहेत तर तुम्ही चप्पल दान करू शकता. आणि हे दान तुम्ही शनिवारी सायंकाळी करू शकता. जर तुम्ही चामड्याचे बूट व चप्पल दान केल्यास शनिदेव तुमच्या पासून लांब जातात.

हे वाचा:   जो मनुष्य सकाळी उठून हि ४ कामे करतो तो आयुष्यभर गरीब राहतो.!

शनि देवाची वक्रदृष्टी आपल्या वरून लांब जाते असे मानले जाते म्हणून चामड्याच्या बूट व चपला यांचे दान करा. जर तुमची चप्पल व बूट हरवली तर ही अत्यंत शुभ घटना मानली जाते कारण अशा चपला हरवल्यामुळे आपले अशुभ ग्रह शुभ बनतात. परिणामी आपल्या जीवनावर त्याचा योग्य तो परिणाम होतो परंतु जर तुमच्या चपला वारंवार फाटत असतील तुटत असतील तर समजून घ्या की तुमच्यावर श्री शनिदेव यांचा कोप आहे.या सर्व गोष्टीमुळे तुमच्या लक्षात आलेच असेल कि चपलांचा वापर कसा करावा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही बाधा व समस्या निर्माण होणार नाहीत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.