अपचन, उलटी, भयंकर पोट दुखी कायमची बंद करण्यासाठी हा रामबाण उपाय एकदा नक्की करा.!

आरोग्य

अपचन,भयंकर उलटी, पोट दुखणे याच्यावर घरच्याघरी लगेचच उपाय करा. कोणत्याही प्रकारचा हा त्रास होत असेल तर या उपायाने नक्की आराम पडेल. बरेच वेळा असे होते की ,खाण्यामध्ये काही वेगळे आले तर आपल्याला अजीर्ण होते ,अपचन होते, मळमळते उलटी होते यापासून सुटका करण्यासाठी हा उपाय जर तुम्ही केला तर लगेचच तुमचे समस्या दूर होतील.

पोट दुखणे,पोटात कळ येणे, चमका मारणे या अनेक समस्या सहजतेने निघून जाण्यास मदत होते तसेच एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि लवंग घ्यायची आहे. लवंग हे मुखशुद्धी चे काम करत असते परंतु पोटाच्या समस्या य₹ यावर सुद्धा फायदेशीर ठरते. एक ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन लवंग घेऊन त्याचे पुढचे टोक काढून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक छोटासा तुकडा दालचिनी चा घ्यायचा आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे.

हे वाचा:   जर तुमच्याही कानाचा होल मोठा झाला असेल तर लगेचच करा हा चमत्कारी उपाय.!

साधारणपणे एक इंचाचा तुकडा घ्यायचा आहे. ते चांगले उकळून यायचे आहे आणि नंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचे आहे. लाहोरी मीठ टाकायचे आहे किंवा त्याऐवजी काळा मिठाचा देखील वापर करू शकता आणि हे तयार झालेले मिश्रण ज्या लोकांना उलटी होत असेल, अजीर्ण होत असेल, अपचन होत असेल अशा व्यक्तीने पिऊन घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला प्रवासाला जायचे असेल तर आणि उलटीचा त्रास होत असेल तर हे मिश्रण एका बॉटलमध्ये भरून घ्या.

जे थर्मास चे काम करत असेल जर हे तुम्ही घरून घेऊन गेला तर वेळोवेळी याचा वापर केला तर तुम्हाला प्रवासामध्ये उलटी होणार नाही. अपचनाची समस्यादेखील होणार नाही. ज्या व्यक्तींना त्रास होत असेल त्या व्यक्तीने अर्धा ग्लास लगेच पिवून घ्यायचे आहे यामुळे अपचनाचा त्रास तर निघून जातोच पण उलटीचा देखील त्रास कमी होतो आणि प्रवासाला जाताना थर्मास चाच वापर करावा कारण त्यामुळे ते कोमट राहील. साध्या बॉटल चा वापर करू नका.

हे वाचा:   कितीही संक्रमणाच्या लाटा आल्या तरी फुफ्फुस निरोगी राहतील; मुरलेला छातीतील मळ निघेल ३ दिवसातच बाहेर.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.