घरात या ठिकाणी लपवून ठेवा १ लवंग; पैशाची कधीच कमी भासणार नाही, सर्व अडचणी रात्रीच संपतील.!

अध्यात्म

लवंगाचे आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत, त्या उपायांमुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहेत. लवंगाला उर्जेचे वाहक असे मानले जाते म्हणूनच ऊर्जेला एका ठिकाणी वरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंग आपल्याला मदत करते. तंत्र शास्त्रामध्ये अनेक विधी साठी अनेक उपायांसाठी या लवंगा चा उपयोग केला जातो. चला तर मग जाणून घेऊया महत्त्वाच्या अशा काही उपायाबद्दल..

जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल परंतु आता हे ओळखायचे कसे तर घरात गेल्यावर उत्साहीत वाटत नसेल, आपल्या घरामध्ये आपल्याला परकेपणाची भावना निर्माण होत असेल तर लक्षात ठेवा काही लोक आपल्या घरांमध्येे लोक येत असतात ते लोक आपल्या सोबत वेगवेगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा सुद्धा घेऊन येत असतात. हे लोक निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या सोबत असलेली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तशीच राहते.

आपल्या घरात अशाही काही वस्तू असतात ,ज्या वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या असतात त्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. या नकारात्मक उर्जेमुळे आपल्या घराची प्रगती होत नसते आणि अशा वेळी ह्या नकारात्मक ऊर्जेला घराच्या बाहेर काढणे खूपच महत्त्वाचे असते म्हणूनच याकरिता लवंग खूपच महत्त्वाची ठरू शकते. हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे.  हा उपाय तुम्ही रविवार किंवा शनिवारी या कोणत्याही दिवशी करू शकता.

हा उपाय आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत, तीन-चार कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तीन मोठ्या विलायची घ्यायचे आहेत. ही सगळी सामग्री आता एकत्र घेऊन एका वाटीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये घेऊन आपल्याला जाळायची आहे. त्यानंतर त्याचा जो धूर निघेल तो आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये पसरवायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक खोलीमध्ये हा धूर असलेली वाटी फिरवायची आहे.

हे वाचा:   पतीचा वाईट काळ येण्याआधी पत्नी करतात ही काही वाईट कामे; कडू आहे पण सत्य आहे.!

हा छोटासा उपाय आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. याची जी राख शिल्लक राहील ती राख आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर शिंपडायचे आहे आणि याकरिता तुम्ही या राख मध्ये थोडेसे पाणीसुद्धा मिसळू शकता. जर उपाय दर शनिवारी व रविवारी केल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण होईल.अनेकांच्या जीवनामध्ये राहू-केतू दोष असतो. कुटुंबावर सातत्याने अपघात व अनेक समस्या येत राहतात.

जर तुम्हाला राहू केतूच्या दोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर शनिवारी तुम्हाला लवंगाचे दान करायचे आहे. कोणताही गरिबाला व गरजवंताला हे लवंग दान करायचे आहे. अनेकदा कोणीही दान स्वीकारणार नाही जर असे झाल्यास तर चिंता न करता कोणत्याही महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवर दोन लवंग वाहा. जर तुम्ही लगातार ४० शनिवार हा उपाय केल्यास राहू केतूच्या दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळते आणि घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडू लागतात.

अनेकदा आपण आपल्या मित्र व आप्तेष्टांना उधार पैसे देत असतो. ते उधार पैसे जर आपल्याला वेळेवर मिळत नसेल तर अशावेळी वादविवाद न करता अमावस्या किंवा पौर्णिमेच्या तिथीला हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय रात्रीच्या वेळी करायचा आहे आणि या उपाय साठी आपण एक पात्र घेऊन त्यामध्ये कापूर जळवून २१ लवंगाचा होम करत असताना माता महालक्ष्मी चे नामस्मरण करायचे आहे.

एक लवंग पात्रामध्ये टाकत ओम श्रीम श्रीम नमः असे म्हणायचे आहे आणि हे झाल्यानंतर हात जोडून माता महालक्ष्मीला आपले जे पण धन परत मिळत नाही आहे व पैसे घेतलेले उधार पुन्हा मिळत नाही ते मिळण्याकरिता प्रार्थना करायची आहे. अनेकांना आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या त्रास देत असते. मेहनत करून सुद्धा पैसा टिकत नाही. अनेकदा डोक्यावर कर्ज होऊन जाते त्यामुळे मनुष्य मानसिक त्रासांमध्ये जाऊ लागतो. मंगळवारी दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता.

हे वाचा:   अंगावर शहारे येईल असा बाळंतपणाचा अनुभव..बघा स्वामींनी कसे संकटातून बाहेर काढले..एक सत्य घटना..

भगवान हनुमान चा फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय तुम्हाला घरीसुद्धा करता येईल त्याचबरोबर जर तुम्ही मंदिरात जाऊ इच्छितात तर मंदिर सुद्धा हा हा उपाय करू शकता. हा मोहरी चा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये तुम्हाला दोन साबुत लवंग टाकायचे आहेत आणि हनुमान चालीसा चे चे पाठ करायचे आहे तसेच २१ मंगळवार हा उपाय आपल्याला करायचा आहे.

अशा पद्धतीने जर सातत्याने २१ मंगळवार हा उपाय केल्यानंतर आपल्याला हात जोडून भगवान हनुमान यांच्यासमोर आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायचे आहे असे केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि भगवान श्री हनुमानाचे तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद टिकून राहील.

अनेक जणांना त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायांमध्ये, कार्यामध्ये हवे तसे यश मिळत नाही तर अशावेळी घरातून बाहेर पडताना जर आपण एखादे महत्त्वाचे काम करणार आहोत त्यावेळी दोन साबुत लवंगा आपल्या तोंडामध्ये ठेवून बाहेर पडायचे आहे. ज्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे कार्य करायचे आहे अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला लवंग फेकायचे आहे आणि आपल्या इष्ट देवतेचे म्हणजे कूल देवाचे स्मरण करून ते काम करायचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.