टक्कल वर केस उगवतात या वनस्पतीच्या अशा वापराने; सोबत हे सात आजारही होतात फुकट बरे.!

आरोग्य

परिजातकाचे झाड अनेक जण आपल्या घरासमोर मोठ्या आवडीने लावत असतात. या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले आणि केशरी रंगाचा दांडा असणारे फुले पाहायला मिळतात. संध्याकाळी किंवा सकाळी आपल्याला या फुलांचा सडा या झाडाखाली पडलेला पाहायला मिळतो. या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.

सांधेदुखी सारख्या आजारावर पारिजातक रामबाण उपाय ठरतो एवढेच आपल्याला माहिती आहे परंतु यापेक्षाही असे अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून पारिजातकाचा वापर केला जातो तसेच छोट्या-मोठ्या शारीरिक वेदनांसाठी पारिजातकाचा वापर केला जातो अशाच काही समस्यांवर उपाय म्हणून आज आपण या लेखांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदानुसार पारिजातक ही वनस्पती कफनाशक आणि वातनाशक आहे म्हणूनच शरीरातील सांधेदुखीच्या वेदनांवर पारिजातकाची पाने फारच उपयुक्त ठरतात. गुडघे दुखी, कंबर दुखी, टाच दुखत असेल किंवा शरीरातील कोणत्याही प्रकारच्या सांधेदुखीवर पारिजातकच्या पानांचा काढा बनवून दिवसभरातून दोन वेळा प्यायल्याने तुमच्या वेदना नष्ट होतील. सायटिका नस दाबल्या गेल्यामुळे अनेकदा चालणे फिरणे अशक्य होऊन जाते व स्नायूंच्या वेदना जाणवू लागतात.

हे वाचा:   अशाप्रकारे वापरा आल्याचा लेप; सर्दी, पित्त, दम लागणे, भूक न लागणे यासारख्या समस्या होतील कायमच्या नष्ट.!

अशा वेळी देखील तुम्ही तुम्ही पारिजातकाच्या पानांचा काढा घेऊ शकता. पारिजातक हे पित्त शोषक असल्याने लिव्हरला आलेली सूज कमी करण्याचे कार्य सुद्धा करत असते. अग्नी मंदावल्यामुळे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर अशा वेळीसुद्धा पारिजातकाच्या पानांचा काढा प्यावा याशिवाय या पानांचा काढा प्यायल्याने पोटातील जंतू सुद्धा नष्ट होतात म्हणूनच ज्यांना जंता चा त्रास असेल पातळ संडास होत असेल, पोट दुखी नेहमी जाणवत असेल तसेच लहान मुलांना या समस्या आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात.

अशा वेळी जर तुम्ही पारिजातकाच्या पानांचा काढा औषध म्हणून उपयोग केला तर या सगळ्या समस्या पासून तुम्हाला मुक्तता मिळेल. केस गळती होऊन जर टक्कल पडले असेल किंवा केसांमध्ये कोंडा निर्माण झाला असेल तर या पारिजातकांचा बिया उगाळून टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास केस पुन्हा नव्याने येण्यास सुरुवात होते.

ज्या व्यक्तीला लघवी करण्यास समस्या निर्माण होते, लघवी करताना जळजळ तसेच थांबत थांबत लघवी होत असेल तर अशा व्यक्तिंनी पारिजातकाच्या सालींची पावडर एक ग्लास भर पाण्यामध्ये टाकून प्यायला हवी. ती पावडर तुम्हाला जवळच्या कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते.

हे वाचा:   रात्री झोपताना एक चमचा दुधातून घ्या; केसांची गळती त्वरित थांबेल, झटपट नवीन केस उगवतील.!

थंडी ताप आल्यावर या पारिजातकाच्या पानांचा काढा खूपच गुणकारी ठरतो म्हणूनच जर तुम्हाला थंडी ताप जाणवत असेल तर अशावेळी या पानांचा काढा सकाळ-संध्याकाळ अर्धा कप या प्रमाणात घ्या. रक्त शुद्धीकरणासाठी या पानांचा काढा सकाळ-संध्याकाळ घेतल्यामुळे रक्त शुद्ध होते त्याचबरोबर खाज, खरुज, नायटा यासारख्या त्वचेचे संबंधित असणाऱ्या समस्या सुद्धा लवकरच नष्ट होतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.