आपल्या सर्वांच्या घरातील एक चमचाभर मीठ आणि एक लिंबू याचा या पद्धतीने वापर करा. घरातील कोणत्याही प्रकारच्या मुंग्या काळ्या,लाल, तांबड्या मुंग्या तसेच माशा व डास लवकरच दूर होतील त्यानंतर तुम्हाला हे डास माशा व मुंग्या घरामध्ये कधीच दिसणार नाहीत. घरामध्ये लाल मुंग्या झाल्यास अनेकदा आपल्याला समस्या निर्माण होत राहते.
सर्व खाण्याच्या पदार्थामध्ये या मुंग्या मिसळत असतात मग पाण्यामध्ये ,जेवणामध्ये ,अन्नधान्याच्या वस्तूंमध्ये या मुंग्या चटकन मिसळत असतात.या मुंग्या चावतात सुद्धा त्याचप्रमाणे डोळ्याला ,कानाला आणि शरीरात वरील कोणत्याही भागाला या मुंग्या चावल्यास खूप मोठ्या प्रमाणावर सूज येऊ लागते व अंगावरील प्रभावित भाग लालसर रंगाचा होऊन जळजळ करायला लागतो.
त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घरामध्ये डास व माशा फिरू लागतात. त्या सर्वांचा त्रास सुद्धा आपल्याला जाणवू लागतो. अशावेळी कळत-नकळत घरामध्ये आजारपण येत राहते.ही समस्या आपल्याला सर्वांच्या घरामध्ये नित्याची जाणवत असते म्हणूनच ही सर्वसाधारण पण महत्त्वाची अशी समस्या दूर करण्यासाठी आज आपण आपल्या लेखामध्ये महत्त्वाचे असे काही उपाय जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे आपल्या घरातील डास माश्या व मुंग्या पळून जाण्यास मदत होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे. ती सामग्री म्हणजे एक चमचाभर मीठ व एक लिंबू आपल्याला घ्यायचा आहे.हा उपाय केल्यामुळे घरातील डास माशा मुंग्या दूर पळतील त्याचबरोबर घरामध्ये सुंदर सुवासिक असा सुगंध पसरू लागेल त्यामुळे तुम्हाला घरामध्ये नेहमी प्रसन्नता जाणवेल.
यासाठी तुम्हाला कोणतेही घातक रासायनिक द्रव्य वापरण्याची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा मीठ यासोबतच आपल्याला एक हिरवा लिंबू विकत घ्यायचा आहे आणि त्या लिंबू वरील साल आपल्याला किसनी च्या साह्याने बारीक किसून घ्यायची आहे तसेच ह्या उपायासाठी आपल्याला लवंग हा पदार्थ सुद्धा द्यायचा आहे. लवंग हा पदार्थ आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असतो त्यानंतर आपल्याला हे तिन्ही पदार्थ एकत्र बारीक वाटून घ्यायचे आहेत.
या मिश्रणाचे वाटप करताना तुम्हाला एक सुंदर असा सुगंध येऊ लागेल. या वासामुळे घरातील मुंग्या टिकत नाही व त्या घराच्या बाहेर परत जातात. फरशी पुसण्यासाठी जे पाणी तुम्ही वापरणार आहात, त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मिश्रण थोडेसे टाकायचे आहे आणि यांनी या मिश्रणाने तुम्हाला तुमच्या घराची फरशी पुसायची आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरातील मुंग्या माशा संपूर्णपणे नष्ट होतील. हा अतिशय घरगुती आणि साधा असा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला कोणताही दुष्परिणाम जाणवणार नाही.
बहुतेक वेळा आपण रासायनिक द्रव्य असलेले पदार्थ वापरल्यामुळे मुंग्या काही प्रमाणातच बाहेर जातात परंतु त्या पुन्हा येऊ लागतात आणि अनेकदा त्रास आणि रासायनिक द्रव्य युक्त उपाय केल्यामुळे आपल्याला शारीरिक समस्या सुद्धा जाणवू लागतात परंतु आजच्या या लेखामध्ये सांगितलेला उपाय हा अगदी साधा आणि घरगुती असल्या कारणामुळे तुम्हाला आरोग्य संबंधित कोणते दुष्परिणाम जाणवणार नाही म्हणून तुमच्या घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असतील तर हा उपाय जरूर करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.