आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्व दिले जाते. गाईला माता मानले जाते कारण धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, गाय ही पूर्ण विश्वाची माता आहे कारण ते पूर्ण विश्वासाठी कल्याणकारी आहे. गाईच्या दुधापासून आपल्या शरीराला कितीतरी फायदे होत असतात. गाईचे शेण, गोमूत्र संपूर्ण मानवजातीसाठी उपयोगी आहे.
तसेच गाईचे वासरू जेव्हा मोठे होते तेव्हा त्यांनी शेतामध्ये मशागत करतात त्यामुळे आपल्याला अन्नधान्य सुद्धा मिळत असते. म्हणूनच गाय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासाठी फायदेशीर आहे. आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि जगाचे कल्याण करणारी गोमाता यावरून जर आपण आपला हात फिरवला आपल्याला कोण कोणते फायदे होतात ते.
जर एखाद्या व्यक्तीला लखवा असेल तर त्या व्यक्तीने गायीच्या अंगावरून हात फिरवल्यामुळे त्याचा त्रास लवकर बरा होतो. तो व्यक्ती ठणठणीत बरा होतो कारण गाईच्या प्रत्येक शरीरातील छिद्रांमध्ये भगवंताचे वास्तव्य आहे असे पुराणात वर्णन केलेले आहे. गायीमध्ये ३३ कोटी देवांचे वास्तव्य आहे असे सुद्धा मानले जाते.
गाईच्या शेणामध्ये मध्ये माता महालक्ष्मीचे वास्तव्य असते असे सुद्धा मानले जाते म्हणून आपण काहीच अंगावर जास्त वेळ आपण हात फिरवू तितका फायदा आपल्याला मिळेल. जेव्हा आपण गाईच्या अंगावर हात फिरवतो तेव्हा हीच गाय आपल्यासाठी कामधेनु बनते. यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा अपेक्षा असतात त्या गोमातेच्या कृपाशीर्वादाने पूर्ण होतात आणि या आशीर्वादामुळे आपण प्रगतीच्या वाटेकडे वाटचाल करू शकतो.
आपण घरात स्वयंपाक केला तर सर्वात आधी गाईला पोळी खायला द्यावी. असे केल्याने आपल्या घरातील अन्न दोष नाहीसा होतो. जर तुमच्या घरी गाय असेल तर चांगलेच आहे अशावेळी गायीची नेहमी सेवा करा व गाईला नियमितपणे पोळी खाऊ घाला. जर तुमच्याकडे गाय नसेल तर गोशाळा किंवा कोणाकडे पाळलेल्या गायी असतील तर त्यांना पोळी खाऊ घाला.
जर नियमितपणे गाईला पोळी खाऊ घालणे शक्य नसेल तर फळ व हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता.असे केल्याने पित्र दोष नाहीसा होतो व आपली पित्र आपल्यावर प्रसन्न होतात. आता आपण जाणून घेऊया की गायवर हात कशापद्धतीने फिरवावा व तसेच गाय वर हात फिरवताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील.
गाय हि संपूर्ण विश्वाची माता आहे म्हणूनच जर तुम्ही गायी समोर आपली इच्छा व अपेक्षा प्रकट केल्यास गाय आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी आपल्याला आपला उजवा हात गायीच्या पाठीवरून सलग फिरवायचा आहे. हा उपाय आपल्याला सलग चाळीस दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की या चाळीस दिवस मध्ये आपल्यामध्ये खूपच बदल झालेला आहे. आपल्या सोबत सगळ्या चांगल्या चांगल्या घटना घडत आहेत.
आपण गायीच्या अंगावर हात फिरवताना ज्या काही इच्छा मनामध्ये प्रकट केल्या होत्या त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत आहे,असे तुम्हाला जाणवू लागेल. तुम्ही ज्या चांगल्या गोष्टीची कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल त्या सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या समोर हात जोडून उभ्या असतील म्हणून हा उपाय आपल्याला सलग चाळीस दिवस करायचा आहे त्याचबरोबर गायीच्या पाठीवरून हात फिरवताना आपल्याला एक मंत्र सुद्धा म्हणायचं आहे. हा मंत्र पुढीलप्रमाणे आहे. धेनु त्वम कामधेनु सर्व पाप विनाशिनी मोक्ष फलन दायिनी मात्र देवी नमोस्तुते.
या मंत्राचा अर्थ असा आहे की , हे देवी तू धेनूच्या रूपात आहे परंतु तू कामधेनु आहेस कामधेनु सर्व इच्छांची पूर्तता करते सर्व पापांचा नाश करते तुला नमस्कार असो. हा मंत्र म्हणून किंवा जर मंत्र तुमच्या लक्षात राहत नसेल तर या मंत्राचा अर्थ म्हणून गायीवर हात फिरवा त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.