वातावरणामध्ये थोडातरी बदल झाल्यास सर्वात आधी आपल्या घसा खवखव करू लागतो. सर्दी ,खोकला,ताप इत्यादी आजार तुम्हाला होऊ लागतात.सर्दी, खोकला झाल्यावर घसा खवखव करणे हा त्रास होऊ लागतो आणि हा त्रास भयंकर असतो. त्यामुळे तुम्हाला अनेकदा खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
घसा दुखत असल्यामुळे जेवण करायला सुद्धा त्रास होत असतो. घसा खवखव करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वायरल इन्फेक्शन असते. आपले शरीर हे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेनुसार प्रतिसाद देत असते. त्यामुळे सुद्धा आपला घसा खवखव करू लागतो. यामूळे घसा दुखतो,घशाला सूज येते, घसा लाल होतो, या सर्व गोष्टींमुळे आपल्याला काहीच खाता व पिता येत नाही.घशामध्ये सूज निर्माण होणे त्याचबरोबर स्वरयंत्राला त्रास सुद्धा होत असतो. हा उपाय केल्याने समस्या नष्ट होतील चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ज्येष्ठमध लागणार आहे. हे जेष्ठमध आपल्याला किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असते. ज्येष्ठमध हे घसा दुखणे, श्वसन रोग संबंधित आजारांवर रामबाण औषध आहे. आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सुद्धा ज्येष्ठमधाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हा उपाय करण्यासाठी जेष्ठमध च्या काड्या आहेत त्या वेगवेगळ्या करायचे आहेत आणि एक कपभर पाण्यामध्ये त्या ज्येष्ठमधाच्या काड्या आपल्याला भिजवत ठेवायचे आहेत.त्याचबरोबर या काड्या आपल्याला पाच ते दहा मिनिटं भिजवत ठेवायचे आहे.या काड्यामधील मधील जो काही अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल.
हे जे अर्क आहे ते आपल्याला उपयोगी ठरणार आहे. या अर्कामध्ये घशाला होणारी सूज दूर करण्याचे सामर्थ आहे.या पाण्याद्वारे आपल्याला गुळण्या करायचे आहेत. ५-६ गुळण्या केल्याने तुमच्या घशाची जी काही समस्या आहे ती लवकरच दूर होईल. या पाण्यामुळे घशाची सूज तसेच घशाला झालेले इन्फेक्शन सुद्धा लवकर दूर होते.तसेच दुसरा उपाय आहे तो म्हणजे लसुण.
लसूण हा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. लसूणमध्ये नैसर्गिक घटक असतात ते जिवाणू नष्ट करण्याची शक्ती लसूण मध्ये असते. सोबतच लसून मध्ये एलसीन सल्फर नावाचे घटक असते ,जे घशा संबंधित आजार दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारते. या उपायासाठी तुम्हाला लसणाची एक पाकळी चावून-चावून खायची आहे.
असे केल्याने घशामध्ये होणारा खव खव त्वरित दूर होईल. त्याचबरोबर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आंब्याची पाने. जर आंब्याची पाने चावून खाल्ल्याने व त्याचा अर्क पोटात गेल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर घशामध्ये होणारी खवखव सुद्धा कायमस्वरूपी नष्ट होते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.