हे ३ घरघुती उपाय १ मिनिटांतच करतील तुमचे दात सुंदर व चमकदार..!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला ३ असे घरघुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे दात दुधासारखे पांढरे होतील. आणि हे जे ३ घरगुती उपाय आहेत हे चांगल्या पद्धतीने तुम्ही घरी वापरून तुम्ही तुमचे दात पांढरे करू शकता.

प्रत्येकाला वाटते आपले दात पांढरे असावे. कारण आपल्या दातांमुळे आपल्या सौंदर्यावर भर पडत असते. आपल्या शरीराचा तो एक अविभाज्य अंग असल्यामुळे दात पांढरे असतील, चमकदार असतील तर लोकं आपल्याकडे आकर्षित सुद्धा होतात. चला तर मग पाहूया सुंदर दिसण्यासाठी आपले दात पांढरे व चमकदार असणे किती गरजेचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील.

पांढरे दात आपले सौंदर्य अजून वाढवते परंतु आजकाल लोकं दातांची काळजी घेत नाहीत. तसेच गुटखा, तंबाखू, सिगरेट, यांच्या सेवनाने दात पिवळे पडतात. आजही खूप लोकं जेवणानंतर दात नीट साफ करत नाहीत. त्यामुळे जेवणातील कण दातांमध्ये अडकून राहतात आणि दाताला कीड लागण्यास सुरवात होते. आज आम्ही दातांचे पिवळेपण घालवण्यासाठी आणि त्यांना चमकदार कसे बनवायचे याकरता घरगुती उपाय सांगत आहे.

हे वाचा:   एक चमचा बडीशेप करू शकते या आजारांवर मात; बडीशेप खाणार्यांनी ही माहिती नक्की वाचा.!

पहिला उपाय तुम्ही करा ते तुळशीची पान घेऊन. तुळशीतील पोषक तत्व दातांचा पिवळेपणा कमी करतात. हा प्रयोग करण्यासाठी तुळशीची पाने उन्हात वाळवून घ्यावीत. आणि मग त्यांना कुटून बारीक पावडर बनवावी. या पावडरला दंतमंजनामध्ये मिसळून दात घासावेत. कारण आपण रोज दात घासतो आणि त्यामुळे आपण जर दंतमंजनामध्ये हि बारीक पावडर मिसळली तर त्याचा अवश्य फायदा होईल. अशामुळे दातांचे पिवळेपण जाऊन दात चमकदार होतील.

दुसरा उपाय म्हणजे मोहरीचे मोहरीचे तेल आणि मीठ हे सर्वांच्या घरी मिळतं. ते हे तयार करण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा तेल घ्यावे आणि एक चमचा मीठ घ्यावे व ते चांगले मिसळून घ्या. हे मिश्रण ब्रश वर लावून दातांवर घासा. यामुळे दात सफेद म्हणजेच पांढरे होऊन चमकदार सुद्धा दिसतील.

हे वाचा:   7 दिवसात 5 किलो वजन कमी होईल; फक्त प्रामाणिकपणे हे उपाय करा, थायरॉईडच्या गोळ्या होतील बंद.!

आणि तिसरा शेवटचा उपाय आहे तो म्हणजे संत्र्याची साल आणि तुळस. संत्र्याची साल आणि तुळशीची पाने उन्हात वाळवून घ्यावीत. आणि चांगली कुटून बारीक पावडर बनवावी. हि पावडर ब्रश वर लावून रोज त्याने दात घासावेत. थोड्याच दिवसात तुमचे दात दुधासारखे पांढरे दिसतील.

तर मित्रांनो हे घरगुती उपाय एकदा नक्की करून पहा. यामुळे तुमचे दात नक्कीच चमकदार आणि सुदंर दिसतील. हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.