शनिवार हा शनी देव यांना समर्पित केलेला वार आहे. शनिवारी केलेले छोटे मोठे उपाय शनीदेवाना प्रसन्न करतात. शनिदेवाचे वाहन काळा रंगाचा कुत्रा आहे .तुम्ही जर शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्यास तुम्हाला चमत्कारिक फायदा होईल आणि शनी देव तुमच्यावर प्रसन्न होतील.
कुंडलीमध्ये कधी कधी काही ग्रह अशुभ स्थानी असतात आणि हे अशुभ स्थानी असलेले ग्रह आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न करतात. विशेष करून तुमच्या कुंडलीत शनी ग्रह अशुभ स्थानी असेल तर घरात वारंवार आजारपण निर्माण होणे, नोकरी उद्योगधंदे बंद पडणेे आणि घरात हळूहळू दारिद्र्य येणे अशा प्रकारच्या समस्या दिसून येतात.
काळया रंगाच्या कुत्र्याला शनिवारी खाऊ घातलेली ही छोटीशी वस्तू तुमचे जीवन बदलू शकते चला तर मग जाणून घेऊया या बद्दल. लेखामध्ये सांगितलेले उपचार जर केल्यास खूप सारे फायदे होतात जसे कि, आपल्या कुंडलीतील शनीची गती वाढवतो आणि खूप लवकर शनीची साडेसाती असेल ,महादशा असेल यापासून आपल्याला मुक्ती मिळते. घरातील आजारपण दूर करते आणि घरामध्ये सुख शांती निर्माण होते.
ज्योतिष शास्त्रातील हा उपाय जरी साधा सोपा असला तरी हा अत्यंत प्रभाव शाली आहे. शनिवार च्या दिवशी पहिली भाकरी किंवा पहिली चपाती जी आपल्या किचन मध्ये तयार होईल ती गो मातेसाठी काढून ठेवा आणि शेवटी ची जी काही भाकरी व चपाती असेल ती तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे.
तसेच मोहरीचे तेल हे भाकरी किंवा चपातीला थोडेसे लावायचे आहे कारण जास्त तेल लावल्यास कुत्रा भाकर खाण्यास नकार देईल म्हणून हि भाकरी शनिवारी कोणत्याही काळ्या रंगाच्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. जेव्हा कुत्रा हि भाकरी खाऊ लागेल तेव्हा एक छोटासा मंत्र तुम्हाला सांगत आहोत तो तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे
ओम भ्रं कालभैरवाय नमः
हा लघु स्वरूपातील मंत्र तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळी तो जप करावा आणि घरी परत यावे. ज्या लोकांना या मंत्राचे दीर्घ रूप म्हणायचे असल्यास त्यांनी पुढील मंत्र म्हणू शकता.
ओम कालभैरवाय नमः
ओम भयहरण च भैरवं
ओम ऱ्हीम बटुकाय आप दुद्धरणाय नमः
कुरकुरु बटुकाय ऱ्हीम|
ओम भ्रं कालभैरवाय फट्
जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने दर शनिवारी या मंत्राचा न विसरता जप केल्यास तुम्हाला इच्छित फळ लवकरच लाभेल आणि शनी देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.