नमस्कार मित्रानो,
तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे.उन्हाळा हा ऋतू आपल्या सर्वांसाठी गर्मीचा ऋतू म्हणून मानला जातो. हे तर सर्वाना माहित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरात व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे आहे.आपण आपली शा-रीरिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.उन्हाळ्यात सगळ्यांना खूप तहान लागते.
नेहमीच थंड प्यावस वाटत. उन्हाळ्यात लोकांना जास्त प्रमाणात फ्रीजमधून थंड पाणी पिण्यास आवडते.आपण जर सतत कुलर आणि एसी मध्ये खूप वेळ बसत असाल तर लगेच उन्हात बाहेर गेल्याने किंवा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणिन पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना उन्हाळी लागण्याचे प्रमाण जास्त असते.
पूर्वी काळात फ्रीज नव्हते,तेव्हा लोक मातीच्या माठातले पाणी पीत होते.तसेच हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर होते.हे पाणी नैसर्गिकरीत्या थंड झालेल्या पाण्याची गोडी वेगळीच असते.खेड्यात अजूनही मातीच्या भांड्यांना खूप महत्व आहे.
आजकालच्या या युगात भांड्यातून पाणी पिण्याचे महत्व खूप कमी झाले आहे. या भांड्यातून पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.मातीमध्ये अनेक रोगांशी लढण्याची क्षमता असते. ज्येव्हा आपण या मातीच्या भांड्यातून पाणी पितो तेव्हा आपल्या शरीराला खूप फायदे मिळतात.
मातीच्या भांड्यातून झिरपत बाहेर आलेल्या पाण्याच्या थेंबाच्या बाष्पीभवणासाठी या भांड्यातील पाण्यातून उर्जा घेतली जाते. त्यामुळे भांड्यातील पाणी थंड होत जाते. जेवढे बाष्पीभवन जास्त होते तितके पाणी जास्त थंड होते. म्हणूनच माठाच्या तळाला पाणी सतत झिरपत असते.
नैसर्गिकरीत्या थंड झालेले मातीच्या माठातील पाणी चांगल्या पद्धतीने आणि बऱ्याच काळासाठी तुमच्या शरीराला थंडावा देण्यास समर्थ असते.निसर्ग आपल्या सर्वांची खूप काळजी घेतो. मातीचा सुगंध सगळ्यांना खूप आवडतो. मातीचा सुवास मनाला नेहमी तृप्त करतो. याभांड्यातील पाणी मिल्यामुळे आपले मन खूप प्रसन्न राहते.
योग्य पाणी पिल्यामुळे नियमितपणे आपल्या शरीराची प्रतिकारकशक्ती वाढते.यामुळे आपले शरीर निरोगी आणिउत्तम राहते. उत्तम पाणी पिल्यामुळे आपली पचनक्रिया उत्तम राहते. पिण्यायोग्य पाणी पिल्यामुळे आपली पचन क्रिया देखील मजबूत होते.
पिण्यायोग्य पाणी पिण्यामुळे तुमचे वजन संतुलित होते म्हणून आपण माठाच्या पाण्याने तुमचे वजन उत्तम राहते.आपल्या नियमित जीवनात दररोज तीन ते चार लिटर पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील टाकावू पदार्थ बाहेर पडते. मातीचे माठ हे आपल्या सर्वासाठी वरदान आहे.
मातीच्या माठात साठवून ठेवलेले पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा आहे. हे पाणी पोटाशी खूप निगडीत आहे. पित्त, पोटात पडलेले मुरड दूर करण्यासाठी हे पाणी उपयोगी आहे. कारण हे माठातले थंड पाणी म्हणजेच जीवन आहे.
वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा,आमच्या पेजला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.