नमस्कार मित्रांनो,
आचार्य चाणक्य हे महान ज्ञानी असण्यासोबत एक चांगले नीती कार होते. आचार्य चाणक्य यांनी मनुष्य जीवन सुखकर करण्यासाठी आपल्या निती मध्ये खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही जर जीवनामध्ये धोका खाऊ इच्छित नसाल, कोणाच्या छळ कपटीचे शिकार होऊ इच्छित नसाल,
कोणालाही वश होऊ इच्छित नसाल तर चाणक्यनीति तुम्ही अभ्यासली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी मनुष्याच्या जीवनाच्या अशा पहिलुवरती भाष्य केले आहे ज्यावर सर्व सामान्य व्यक्ती विचारही करू शकत नाही. मित्रांनो आपल्या हातून कळत नकळत अशी चूक होते की, जी भविष्यात आपल्याला उध्वस्त करू शकते. अशा चुकांपासून वाचण्यासाठी,
चाणक्य नीतिचा अभ्यास असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टींविषयी सांगणार आहोत. यामुळे स्त्रियांची भूक कधीच मिटत नाही. स्त्रीने कितीही पूजापाठ केला, वनामध्ये जाऊन राहिली मनावर कितीही ताबा ठेवला तरी ही तिची ही भूक कधीच शांत होऊ शकत नाही. तुम्ही याचे उदाहरण साक्षात आपल्या डोळ्याने पाहिले देखील असेल.
स्त्रियांमध्ये या चार गोष्टींची भूक अशा रीतीने वाढत जाते की, त्या आपल्या मान मर्यादा देखील विसरून जातात. शास्त्र, मान, दंड, अपमान यापैकी कशालाच ती घाबरत नाही. इतकेच काय तर ती आपल्या प्राणांची देखील चिंता करत नाही. तर जाणून घेऊयात आचार्य चाणक्य यांनी अशा कोणत्या चार गोष्टींविषयी सांगितले आहे, ज्यांची महिलांची भूक कधीच मिटत नाही.
तर चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती.. १) सुंदर आणी आकर्षक दिसण्याची भूक :- प्रत्येक स्त्री स्वतःला सुंदर आणी आकर्षक ठेवण्यासाठी अथक प्रयत्नांमध्ये पूर्ण आयुष्य व्यतीत करते. यासाठी वय महत्वाचे नसते. हो उतारवयाकडे झूकू लागल्यावर याची तीव्रता कमी होते. स्वतःचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी स्त्रिया अनेक प्रकारचे सौंदर्य प्रसाधन,
शृंगार, दागदागिने याप्रकारे सोबत ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मदत घेतात. स्त्रियांची शॉपिंग करण्याची पद्धत फेमस आहे. स्त्रियांना नखशिखांत शृंगार करणे अधिक पसंत असते. अधिक करून महिला आपल्या आयुष्यातील जास्त वेळ स्वतःला सुंदर बनवण्यात घालवतात. कारण त्यांना सर्वांचे लक्ष स्वतःकडे आकर्षून घ्यायचे असते.
२) सतत बडबड करण्याची भूक :- कोणत्याही स्त्रीमध्ये जास्त बोलण्याची वाईट सवय असते. त्यासाठी त्यांना वेळ काळ आणि जागेचे देखील भान राहत नाही. कोठेही असतील, कोणासोबतही असतील, कोणीही मिळाल्यास गप्पा मारण्याची त्यांची सवय जात नाही. बोलण्यापासून त्या थांबत नाहीत. आणि बोलता बोलता आपले सर्व रहस्य त्या दुसऱ्यांना सांगून बसतात.
बोलण्याच्या नादात आपण काय बोललो हे देखील त्यांना नंतर आठवत नाही. गप्पा मारताना यांचं डोकं यांच्या नियंत्रणात नसते. या सवयीमुळे त्या अनेकदा संकटात सापडतात. समोरचा व्यक्ती कोण आहे आपला किंवा परका आहे त्यांना समजत नाही. सोबतच दुसऱ्यांविषयी वाईट बोलणे त्यांना आवडते. दुसऱ्यांना वाईट-साईट बोलल्याशिवाय त्यांची भूक शांत होत नाही.
३) प्रेमाची भूक :- मित्रांनो हा गुण प्रत्येक स्त्रीमध्ये नैसर्गिकत: कुटून कुटून भरलेला असतो. स्त्री हे प्रेमाचे प्रतीक आहे. प्रेमाला अनेक प्रकारच्या छटा असतात. यातील प्रत्येक छटा स्त्री मध्ये पहायला मिळतात. दाम्पत्य जीवनात त्यांच्या प्रेमाचा रंग गहिरा असतो. परंतु प्रेमामध्ये समर्पण भाव नसेल तर प्रेम हे प्रेम राहत नाही. परिवारामध्ये पती-पत्नी हे दोन स्तंभ असतात.
त्यावरच पूर्ण परिवार टिकून असतो. परिवारामध्ये पती-पत्नी दरम्यानचे प्रेमच सर्वाधिक चर्चेत असते. स्त्रिया ज्यांच्यावर प्रेम करतात बदल्यात त्यांच्याकडून स्वाभाविकपणे प्रेम अपेक्षित करतात. ४) ईश्वरा प्रती अनावश्यक आस्था :- या गोष्टींमध्ये महिलांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी पुरुषांपेक्षा जास्त पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये ईश्वराप्रती अनावश्यक आस्था इतकी जबरदस्त असते कि,
कोणत्याही भोंदू, साधू बाबांच्या कचाट्यात अगदी सहज महिला सापडतात. या अंधश्रद्धे मध्ये अंगावरील दागिने उतरवून देखील देतात. स्त्रियांमध्ये चुकीच्या रूढी परंपरा यांचे प्रमाण जास्त पाहायला मिळते. जास्त लालची स्वभावामुळे भोंदू बाबांच्या चक्र व्यूव्हात सापडतात. तर मित्रांनो या होत्या त्या चार गोष्टी या गोष्टींनी महिलांची भूक कधीच मिटत नाही.
तुम्ही जर महिला असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी मनापासून पटतील आणि पुरुष असाल तर आजूबाजूला तुम्ही निरीक्षण केले असेल ते या गोष्टींशी जुळेल. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत देखील नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.