प्रवासात उलट्या होतात, मग करा हे उपाय…यामुळे परत प्रवासात कधी उलट्या मळमळ चा त्रास होणार नाही..

आरोग्य

आपण बऱ्याचदा लांबच्या प्रवासाला जातो, तेव्हा आपण नेहमीच बाहेरचं खाणं खातो. कधी गाड्यांमधील, कधी कॅन्टीनमधून, कधी छोट्या दुकानातून, तर कधी ढाब्यांवर. परंतु या सर्व ठिकाणी आपण स्वच्छतेच्या दृष्टीने फारच कमी प्राधान्य देतो आणि आपल्या चवीनुसार खातो. मग जेव्हा हे अन्न आपल्या पोटात जाते, तेव्हा मात्र लोकांना समस्यांना सामोरं जावं लागतं आणि मग अनेकांना पश्चाताप होतो.

त्याच वेळी, जर तुम्ही गाडी किंवा बसमधून प्रवास केला तर तुम्हाला उलटी झाल्यासारखे वाटू लागते. उलटी होण्याआधी बऱ्याचदा लोकांना मळमळ आणि आम्लपित्तासारखे वाटते. परंतु आपण खालील उपाय कराल तर नक्कीच, उलट्या थांबवू शकता.

उलट्या थांबवण्यासाठी टिप्स:-

आलं खाल्ल्याने उलटी बंद होण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही आलं पाण्यात हलके गरम करूनही पिऊ शकता. बऱ्याच लोकांना लिंबू चोखल्याने उलट्या थांबण्यास मदत होते. एक कप गरम पाण्यात एक चमचा लवंग उकळून गाळून प्या. त्यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यांपासून आराम मिळतो.

हे वाचा:   औषधांसोबत या पाच गोष्टी कधीच घेऊ नका; तुमची हि १ चूक पडू शकते खूपच महागात.!

उलट्या होत असल्यास पाणी किंवा लिंबूपाणी प्या. परंतु हे पाणी थोडे-थोडे करुन प्या, एकावेळी भरपूर पाणी प्यायल्याने उलट्या वाढू शकतात. मोठा श्वास घ्या आणि काही चांगल्या क्षणांचा विचार करण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान मळमळ होत असल्यास ही पद्धत खूप प्रभावी आहे.

संत्र्याचा रस पिल्याने किंवा संत्री खाल्ल्याने उलट्या थांबतात. एक चमचा बडीशेप एक कप पाण्यात 10 मिनिटे उकळल्यानेही उलट्या थांबतात.
मीठ आणि साखरेचे पाणी प्यायल्याने आराम मिळेल.

वेलदोडे या पदार्थाला मळमळीसाठी फार गुणकारी औ’षध मानलं जातं. प्रवासात मळमळू लागल्यावर वेलदोड्याचे दाणे तोंडात ठेवल्यास मळमळीचा त्रास लगेच कमी होतो. मसाला वेलदोडे म्हणजे काळे वेलदोडे आणि पिवळे वेलदोडे दोन्ही कफ, पित्त आणि वातशामक औ’षधांनी परिपूर्ण आहेत. प्रवासाला निघताना वेलदोडे सोबत ठेवावे.

हे वाचा:   रात्री झोपण्यापूर्वी गुळासोबत गरम पाणी पियाल्यास मुळापासून दूर होतील हे ३ रोग..!

सर्वात प्रथम प्रवासाला निघताना हलका आहार घ्यावा. तिखट, मसालेदार, जळजळीत पदार्थ खाणं टाळावं. कारण हे अन्न पचायला जड तर असतंच, पण मळमळीला हे पदार्थ आमंत्रण देतात. उलट्यांनी घशाची ज’ळज’ळ होते तसेच घाट रस्ता असेल तर अधिक त्रास होतो आणि यामुळे प्रवासाचा फज्जा उडतो.

जड अन्न पचायला त्रास होतोच, पण पोटात ते टिकतही नाही. म्हणून शक्यतो सरबत सोबत ठेवावे. आलेपाकाची वडी तर आजीबाईचा बटवा सुचवतोच, पण त्याशिवाय काही उपाय आहेत ते पण करावेत.