मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात चेहऱ्यावरची त्वचा ही ढिली होऊ लागते त्यावेळेला आपल्याला वाटते की आपण वृ’द्धत्वाकडे झु’कू लागलो आहे त्याच बरोबर डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार होतात याने आपला चेहरा चांगला दिसत नाही व आपला आ’त्मविश्वास होतो.
परंतु आयुर्वेदामध्ये डोळ्यांच्या आजूबाजूची जी त्वचा असते त्याला घट्ट करण्यासाठी तसेच आ’रोग्यविषयक टिप्स सुद्धा सांगण्यात आल्या आहेत. ज्यांचा आपण सारे सहज उपाय म्हणून उपयोग करू शकतो. खोबरेल तेलामध्ये थोडेसे बेसन, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध घालून हे मिश्रण डोळ्यांच्या भोवती लावावे आणि हलक्या हाताने काही मिनिटे मालिश करावी.
आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. खोबरेल तेल आणि बदामाचे तेल सारख्या प्रमाणार घेऊन डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करावी . हे तेल रात्रभर चेहयावर राहू द्यावे. टोमॅटोच्या रसामध्ये लिंबाचा रस चिमूटभर बेसन आणि हळद मिसळून घ्यावी. ही पेस्ट आपल्या डोळ्यांच्या सर्व बाजूंना लावा आणि २० मिनिटानंतर चेहरा धुवून टाका.
असे आठवड्यातुन तीनदा करा. असे केल्याने डार्क सर्कल हळू हळू कमी होतील. बंद डोळ्यांवर गुलाब जलमध्ये कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा. असे १०मिनिटे करा. असे केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा चमकदार होते काळ्या डागांपासून मुक्तता मिळवायची असल्यास बदामाचे तेल खूप उपयुक्त आहे.
बदाम तेल डोळ्यांच्या आजूबाजूला लावून काही वेळ तसेच सोडा. नंतर बोटानी हलके मसाज करा त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. पुदीनाच्या पानांना बारीक वाटून घ्या आणि डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. या पेस्टला काही काळ असेच ठेवून द्या आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे तुम्हाला काळ्या डागांपासून लवकर मुक्तता मिळेल.
आयुर्वेद मध्ये काकडी बद्दल खूप सांगितले आहे. काकडी त्वचेला घट्ट करण्याचे काम करते. तुम्ही सकाळी उठून काकडीचा मसाज चेहऱ्यावर करू शकता. रोज सकाळी संध्याकाळी दोन वेळा म्हणजे अंघोळी नंतर आणि झोपायच्या आधी कोरफड रस चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा घट्ट होईल.
संत्र्याच्या रसात जीवनसत्व क भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेसाठी लाभदायक असते. संत्रीच्या रसात काही ग्लिसरीन चे थेंब मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा व या पेस्ट ला डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. यामुळे डार्क सर्कल पासून मुक्तता मिळेल.
अशी बनवा नैसर्गिक पेस्ट:- एक चमचा बेसन ,एक चमचा मध, एक चमचा दूध , अर्धा चमचा तिळाचे तेल यांना एकत्रित करून पेस्ट बनवून घ्या आणि या पेस्टला सातत्याने चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट साधारणतः चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा नंतर हलक्या कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या यामुळे डोळ्याखालील काळे डाग नष्ट होतात तसेच त्वचा सुद्धा घट्ट होते.
याच बरोबरीने आपले जीवन ताणतणाव मुक्त ठेवणे, जास्तीत जास्त आनंदी ठेवणे, टीव्ही मोबाईल कॉम्प्युटर वर जास्त काळ न राहणे असेही उपाय आपणास करावे लागतील जेणेकरून या काळी वर्तुळ यांची आणि त्वचेला सुरकुत्या पडण्याची समस्या आपली नष्ट होईल.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.