नमस्कार वाचक मित्रानो तुमच्या सर्वांचे मनापासून आपल्या पेजवर मनापसून खूप स्वागत आहे. आजकाल प्रदुषणामुळे वातावरण खूप दुषित झाले आहे. बदलत्या ऋतुमानानुसार वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर खूप जलद गतीने होते.आपल्या घरी जर लहान बाळ असेल आणि त्याला सर्दी खोकल्यामुळे कफ झाला असेल तर त्या बाळाला होणारा त्रास आपल्याला समजून येतो.
यामुळे आपण आपल्या बाळाला उत्तम डॉक्टरांकडे घेवून जातो. काहीवेळा वैद्यकीय उपचार लहान मुलांवर दिसून येत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय नक्की करून बघितले पाहिजे.या घरगुती आयुर्वेदिक उपायामुळे बाळाचा कफ लवकरात लवकर कमी होईल.जर आपल्या घरामधील सहा महिन्याच्या वरील मुलांना छातीत कफ झाला असेल तर आपण घरगुती उपाय नक्की करू शकतो.
यामुळे कफ,सर्दी आणि खोकला देखील कमी होण्यास मदत होईल. जायफळ हे खूप गुणकारी जिन्नस आहे.जायफळ घेवून ते उगळायचे आहे. त्याची पेस्ट करून तयार करायची आहे. ही पेस्ट थोडी कोमट करून बाळाच्या छातीला रात्री झोपण्याच्या आधी लावायची आहे.त्यानंतर बाळाची छाती व्यवस्थित कापडाने झाकून ठेवायचे आहे. यामुळे छातीतील कफ पूर्णपणे रिकामा होईल. डॉक्टर नेहमी लहान मुलांना सर्दी आणि खोकला झाल्यास वाफ देतात.
आपल्या लहान मुलांना ओव्याची वाफ नाकाद्वारे द्यायचे आहे. यामुळे मुलांची सर्दी, खोकला आणि कफ एका रात्रीमध्ये कमी होतो.लहान बाळांना ओव्याची वाफ देणे शक्य नसल्यास एका तव्यामध्ये ओवा आणि लसून भाजून घेवून याचे मिश्रण मिसळून घ्या. हे मिश्रण बाळ ज्या ठिकाणी झोपते त्या साईडला ठेवा.यामुळे नक्की फरक होईल.
सर्दी कमी होण्यास मदत होईल. जे मुल आपल्या आईचे दुध पीत असेल त्या मुलाच्या आईने आपल्या आहारामध्ये नियमित तुळशीच्या पानांचे सेवन करायचे आहे. यामुळे लहान मुलांची सर्दी कमी होते. याबरोबर आपल्या आहारामध्ये हळद,मध,ओवा, लसून यांचा देखील जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे.
यामुळे आपल्या लहान मुलांचे सर्दी, खोकला होण्यापासून रक्षण होते.यामुळे आपल्या बाळच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होते. आपल्या घरामध्ये असलेली बारीक मोहरी घ्यायची आहे. एक चमचा मोहरी घेवून त्यामध्ये तुम्हाला पाव चमचा मध एकजीव करायचे आहे.मोहरी खलबत्यात घालून बारीक चेचून घ्यायची आहे.
त्यांतर त्यामध्ये मध मिसळून घ्य्यायचे आहे. एका डब्यामध्ये हे मिश्रण ठेवायचे आहे. बाळाच्या नाकापाशी त्याचा वास द्यायचा आहे. यामुळे नक्की बाळाला योग्य आराम मिळेल.वरील सर्व माहिती उत्तम घरगुती आणि आयुर्वेदिक आहे. माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. हे उपाय नक्की करून पहा.या पेजला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद आहे.