सर्वात उत्तम प्रकारचा व्यायाम कोणता तर अजून पर्यंत तरी चालणे हात सर्वात उत्तम व्यायाम मानला जातो आणि ते खरे देखील आहे चालण्याचे माणसाला अनेक फायदे मिळत असतात. भरपूर चालणारा माणूस हा नेहमीच निरोगी राहत असतो.
चालणे हे आपल्याला अगदी साधे वाटत असले तरी हा अतिशय साधा आणि सोपा व्यायामप्रकार आहे. ठराविक वेळ नियमितपणे चालल्याने शरीराची एका लयीत हालचाल होते आणि शरीराला व्यायाम होतो. सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी चालणे हा एक चांगला व्यायाम ठरु शकतो.
केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर आपल्यातील उत्साह, ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी हा व्यायाम अतिशय चांगला ठरतो. ३० मिनीटे ते १ तास दररोज नियमितपणे चालणे आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरते. चालण्याच्या व्यायामामुळे पचक्रिया तर सुधारतेच पण रक्तप्रवाह सुरळीत होण्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि दिवसभरासाठी तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच रात्री शांत झोप लागण्यासही चालण्याच्या व्यायामाचा फायदा होतो.
बरेच लोक आपल्या सोयीने चालण्याची वेळ ठरवत असतात. पण हे चुकीचे आहे. कोणत्याही वेळेत चालून शरीराला त्याचे मिळावे तितके फायदे मिळणार नाहीत उलटपक्षी काही वेळा त्याचे तोटे सहन करावे लागतील.
आकाशात सूर्य नसताना चालायला जाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण यावेळी वातावरणातील प्रदूषणाची पातळी जास्त असते. काही जण व्यायाम करायचा म्हणून भल्या पहाटे उठून बाहेर चालायला जातात. पण यावेळी प्रदूषण हे जमिनीच्या स्तरावर असते ज्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळे श्वासाचे किंवा फुफ्फुसाशी निगडीत तक्रारी उद्भवू शकतात.
सकाळी ७ ते १० ही चालायला जाण्यासाठी अतिशय योग्य वेळ आहे. या वेळातील ऊन हे कोवळे असते. असे कोवळे ऊन अंगावर घेणे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते. त्यामुळे भल्या पहाटे उठून जाण्यापेक्षा ७ नंतर चालायला जाणे केव्हाही चांगले. तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळीही तुम्ही घराबाहेर जाऊल चालण्याचा किंवा इतर प्रकारचा व्यायाम करु शकता. तुम्ही दिवसभराचे काम करुन थकले असाल तर सूर्यास्तापूर्वी चालण्याने तुम्हाला नक्कीच उत्साही वाटेल.
महिलावर्ग आपली सर्व कामे आवरल्यानंतर चालण्यासाठी घराबाहेर पडत असतो पण सकाळी ११ ते ४ या वेळात सूर्य आपल्या डोक्यावर असतो, अशावेळी व्यायाम म्हणून चालणे आरोग्यासाठी चांगले नाही. या तीव्र उन्हामुळे केवळ थकवाच येत नाही तर तुम्हाला त्वचेच्याही तक्रारी उद्भवू शकतात. तसेच सूर्यास्तानंतर चालणेही आरोग्यासाठी फारसे चांगले नसते. रात्रीच्या जेवणानंतर संथ गतीने शतपावली अवश्य करावी पण त्याहून जास्त चालण्याचा व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नाही. कारण रात्रीच्या वेळी चालण्याचे दृष्टीवरही वाईट परिणाम होऊ शकतात. रात्री उशीरा चलल्यामुळे पचनशक्ती क्षीण होते.
तेव्हा मित्रांनो भरपूर चाला पण चालण्याची योग्य वेळ निवडा. आमचा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा लाईक करा. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद.