कसल्याही प्रकारची टाच दुखी असो कायमची बंद होते..सोपा आणि प्रभावी असा घरगुती उपाय..

आरोग्य

मित्रांनो, टाच दुखी ही आता एक बहुसंख्य लोकांना असणारी समस्या होऊन बसली आहे. सर्वसाधारणपणे चाळिशीनंतर आणि महिलांना हा त्रास जास्त प्रमाणात होत असतो. मात्र आता अगदी तरुण वयात कोणालाही टाच दुखी चा त्रास होऊ शकतो. काय आहे टाच दुखी? कशामुळे होते? काय केल्याने आपल्याला या पासून आराम मिळणार आहे?

कोणती गोष्ट यासाठी आपल्याला टाळावी लागणार आहे? हे आजच्या लेखात आम्ही आपणास सांगत आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया टाच का दुखते किंवा पायाचे तळवे हे का दुखतात. मित्रानो निसर्गाने आपल्या पायाची रचना हि वक्राकार केलेली आहे जेणेकरून आपण पळणे, चालणे, उडी मारणे ही कामे सहजासहजी करू शकतो अशा प्रकारची रचना आपल्या तळपायांची ही केलेली आहे.

आपल्या शरीराचा बहुतांश भार टाच सहन करत असते. या टाचे मध्ये प्लॅन्टर फेशिया नावाचा एक स्नायू चा पडदा असतो हा पडदा स्प्रिंग प्रमाणे काम करत असतो. म्हणजे चालताना जे कमी अधिक वजन आपल्या शरीराचे पडत असते ते हा स्प्रिंग सारखे तोलून धरतो. ज्यावेळी याच्यावर अतिरिक्त वजन सतत पडत राहते त्या वेळी या प्लॅन्टर फेशिया ला क्रॅक पडतात, तडे जातात आणि त्यामुळे टाच ही दुखते.

हे वाचा:   मु'तखडा कसा ही असुद्या, केव्हढा ही असुद्या.. 20mm असुदे पडणारच.. प्रो'स्टेट, क्रिएटिन सम'स्या गायब.. फक्त ३ दिवस हा उपाय करा..

म्हणून टाच दुखी चे मुख्य कारण हे वाढलेले वजन हे समजले जाते. आपण जर आपले वजन कमी केले तर टाच दुखी चा त्रास आपणास कमी होईल. आता दुसरे कारण पाहू बऱ्याच भगिनी उंच टाचेचे सॅंडल, चप्पल वापरतात यामुळे आपला पाय हा तिरपा राहतो त्यामुळे प्लॅन्टर फेशीयावर दबाव पडत असतो आणि तिथे त्या स्नायूला तडे पडले जाण्याचा संभव जास्त असतो.

तिसरं कारण असं सतत उभे राहण्याची सवय. काही लोकांना सतत उभे राहून काम असते त्या लोकांना टाच दुखी चा त्रास हा नेहमी जाणवतो. जीवनसत्वाचा अभाव हे एक महत्त्वाचे कारण टाच दुखी साठी असू शकते. आपल्या मध्ये काही विटॅमिनची कमी असल्यास आपणास टाच दुखी ही हमखास होते.

आता पाहूया आपण टाच दुखी वरचे उपाय. पहिला उपाय आम्ही आपणास सांगत आहोत तो अत्यंत सोपा असा आहे. एका बाटलीमध्ये पाणी भरावे आणि ती फ्रीजमध्ये ठेवावी अशी की तिचे बर्फ झाले पाहिजे. यानंतर रोज सकाळी ही बाटली काढून त्याच्यावर आपला पाय मुख्यत्वे टाच ही ५/६ मिनिटे रोल करायची आहे. यामुळे असे होते की आपल्या तचेचेर जे स्नायू आखडलेले असतात ते ठीक होतात आणि आपणास आराम पडतो. अगदी पहिल्या दिवसापासून याचा फरक आपल्याला जाणवू लागेल. पाच-सहा दिवसात आपल्याला चांगला फरक पडलेला दिसतो.

हे वाचा:   मूतखडा, किडनी निरोगी, पोट साफ यासाठी करा हे घरगुती उपचार; मरेपर्यंत होणार नाही पित्त.!

हा उपाय जर शक्य नसेल तर रोज सकाळी भिंती जवळ दोन्ही हात वर करून उभे राहावे आणि आपल्या पायाच्या बोटाचा जवळचा भाग ज्याला चवडे म्हणतात त्यावर उभे राहावे. यामुळे टाचेचे स्नायू ताणले जातात आणि आपणास टाच दुखी पासून आराम मिळतो.

याशिवाय चप्पल ही नेहमी कमीत कमी टाच असलेली अशीच वापरावी. चप्पल हि मऊ वापरावी जेणेकरून आपल्याला त्रास कमी होईल.

अजून एक उपाय म्हणजे रोज सकाळी गरम पाणी करून त्यात आपली टाच, संपूर्ण तळपाय काही मिनिटे बुडवून ठेवावे यामुळे टाचेचे स्नायू वार्म अप होतात आणि आपल्याला टाच दुखी पासून आराम होतो.

मित्रांनो आपल्याला जर टाच दुखी चा त्रास असेल तर हे उपाय तुम्ही अवश्य करून पहा. आमचा लेख कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.