नवरात्री मध्ये कधीही जर दिसले हे पाच संकेत; तर समजून जा देवी प्रसन्न आहे तुमच्यावर..हे संकेत महालक्ष्मीचा आशीर्वाद दर्शवत असतात..

अध्यात्म

नवरात्र सुरू आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण घ’टस्थापना केली असेलच. नवरात्रीतील नऊ दिवस आपण देवीची मनोभावे पूजा करतो. देवीच्या नऊ रुपांना पूजतो. आपली ही नवरात्री पूजा सफल होत आहे का देवी आपल्यावर प्रसन्न आहे का हे जाणून जर घ्यायच असेल तर काही सूक्ष्म संकेत आपल्याला मिळत असतात.

काही स्वप्न अशी पडतात किंवा आपल्या समोर असे काही प्राणी, पक्षी येतात. जर आपण बारकाईने पाहिले आणि हे संकेत समजून घेतले. तर आपली नवरात्रीची पूजा सफल झालेली आहे का माता राणीचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत आहे का हे आपण सहज सहजी ओळखू शकता. हे संकेत कोणते आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत.

नवरात्रीत सर्वात मोठा संकेत म्हणजे नवरात्रीतील नऊ दिवसात अगदी कोणत्याही दिवशी जर स्वप्नात तुम्हाला घुबड दिसलं. तर हा माता लक्ष्मीचा तुमच्या घरात आगमन होणार आहे याचा खूप मोठा संकेत आहे. आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सुसज्ज व्हा व आपल्या घरादाराची परिसराची स्वच्छता करा. सकाळ संध्याकाळ दिवा, बत्ती करा. हा संकेत सांगतो की तुमच्या घरात तुमच्या जीवनात धन संपदा हा नक्की येणार आहे. तुम्ही जे व्रत, पूजा करत आहात ती सफल होत आहे त्यामुळे पूजेत खंड पडू देऊ नका.

हे वाचा:   एकवेळ जीव द्या पण शनिवारी या गोष्टी अजिबात विकत घेऊ नका; अन्यथा घरात येईल कायमची कंगाली.!

दुसरा संकेत आहे जर नवरात्रीच्या पूजेमध्ये जर एखादी सोळा शृंगार केलेली एखादी महिला दिसली. तर प्रत्येक्ष माता लक्ष्मीने तुम्हाला दर्शन दिलेले आहे. आणि मग तुमच्या जीवनात अगदी कोणतेही प्रकारची समस्या असेल. पैश्यांची असेल एखादी सामाजिक समस्या आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारची तर ती समस्या असेल. तर ती लवकरच दूर होणार आहे याचा हा संकेत असतो.

आणि म्हणून नवरात्रीची पूजा अगदी योग्य प्रकारे विधी पूर्वक आपण चालू ठेवा.  तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे नारळ, हंस पक्षी किंवा कमळाच फुल हे जर सकाळ सकाळी या नवरात्रीत नऊ दिवसात कधीही दिसले. तर लक्षात घ्या हे माता अंबेची तुमच्यावर कृपा दृष्टी आहे. कारण मातेच्या पूजेमध्ये आपण नारळ, कमळ यांना एक विशेष महत्व आहे आणि हंस हा माता सरस्वतीचे वाहन आहे.

हे वाचा:   देवघरात एकापेक्षा जास्त देव असतील तर कोणत्या देवाची आरती.? ९९% लोकांना माहित नाही.!

या गोष्टी सकाळी दिसणे ही सुद्धा तुमची पूजा सफल होत आहे याचा संकेत आहे. पुढील संकेत जर तुम्ही घरातून बाहेर पडताच तुम्हाला गाईचे दर्शन झाले. तर हे अत्यंत शुभ गोष्ट आहे. कारण नवरात्रीच्या दिवसात आपल्या घरातून किंवा एखाद्या मंदिरातून बाहेर पडताना गाईचे दर्शन होणे. आणि त्यातल्या त्यात पांढऱ्या रंगाची गाय दिसणं यामुळे तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे याचा हा संकेत आहे.

पाचवा संकेत असा आहे की नवरात्रीतील नऊ दिवसात जर तुम्ही कुठे कामानिमित्त बाहेर पडलात. आणि त्यावेळी तुमच्या उजव्या हाताला जर तुम्हाला साप दिसला किंवा एखादा माकड दिसला. किंवा स्वप्नात तुम्हाला पांढऱ्या रंगाचा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला. तर हे सर्व संकेत देवीची कृपा तुमच्यावर होत आहे याकडे संदेश करतात.

तर अश्या प्रकारचे काही संकेत नवरात्रीमध्ये देवी मातेकडून आपल्याला मिळत असतात. त्याचा योग्य तो अर्थ घेऊन आपण कष्ट, मेहनत, परिश्रम याकडे अधिक लक्ष करावे. आणि आपली देव भक्ती दिवसेन दिवस वाढवत जावी..