कन्या राशीच्या लोकांचे जीवन असे असते..स्वभाव, भविष्य, विवाह, करियर बघा कसे असते..या राशीचे लोक म्हणजे लाखात एक !

अध्यात्म ट्रेंडिंग

आपल्या ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशीच्या पैकी एक म्हणजे कन्या राशी होय, यांच्याबद्दल जाणून घेणं अधिक कुतुहल जागृत करेल कारण या राशींचे व्यक्तिमत्व अगदीच निराळे असते. कन्या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी असतात. भावुकही असतात आणि विचार न करता मनाला पटेल ते काम करतात. या राशीच्या अधिक व्यक्ती संकुचित, लाजऱ्या आणि झिडकारून टाकणाऱ्या असतात.

ज्या लोकांच्या नावाचे पाहिले अक्षर हे टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, या, पो पासून सुरू होते त्यांची रास ही कन्या असते. जोतिष शास्त्रामध्ये राशीचक्रातील सहावी राशी आहे ती कन्या आणि या राशीचे चिन्ह हे हातामध्ये फुल घेतलेली मुलगी अशा प्रकारचे आहे. कन्या राशींचे जातक घर, जमीन आणि सेवा क्षेत्रात बहुतांश कार्यरत असतात.

जसे की दलाली, वकील पेशा इ. तसेच या राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत, पचनक्रिया तसेच पोटासं-बंधी आ’जार पाहायला मिळतात. पायाचे आजार या राशीच्या व्यक्तींमध्ये जास्त असतात. महत्वकांक्षी असल्यामुळे हे व्यक्ती आपल्या योग्यतेच्या बळावर उच्चपदापर्यंत पोहचतात.

प्रतिकूल परिस्थितीसुद्धा यांना कुणी घाबरवू शकत नाही आणि हे चातुर्याने पुढे जात राहतात. कारण ते निडर असतात. बुध ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो. चांगले गुण, विचारपूर्ण जीवन, बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये पाहण्यास मिळते. उत्तम जीवनशैलीने या व्यक्ती आपला समाजात वेगळाच ठसा उमटवतात.

हे वाचा:   घरामध्ये चुकूनही या दिशेस घड्याळ लावू नका, होऊ शकते खूप मोठं नुकसान! या दिशेस घड्याळ म्हणजे अशुभ वेळ घरात येणे..

लहानसहान बाबतीत या व्यक्ती खूपच सावधानता बाळगतात. फिटनेसच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत सतर्क असतात. ऐकतात सर्वांचे पण करतात मात्र आपल्या मनाचे. आपल्या साधेपणामुळे या व्यक्ती कोणालाही आपलंसं करून घेतात. या व्यक्तींना अनेक व्यक्ती आदर्श मानतात. कन्या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींबरोबर सामावून जायला वेळ लागतो.

अधिक काळापासून जवळ असणाऱ्या व्यक्तींसह या व्यक्ती अतिशय मजेशीर असतात. पण ओळख नसलेल्या व्यक्तींशी या व्यक्तींना बोलायला त्रास होतो या व्यक्ती काही अंशी कंटाळवाण्या देखील असतात. पण जवळच्या मित्रमैत्रिणी असलेल्यांसाठी मात्र या व्यक्ती अप्रतिम असतात. यांना फिट राहण्याचा आणि उत्तम दिसण्याचा नाद असतो.

बाकी गोष्टींमध्ये या व्यक्तींचा कमी रस असतो.प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत नॉटी आणि खोडकर असतात. आपल्या जोडीदारांकडून या व्यक्तींना खूपच अपेक्षा असते. त्यामुळेच यांना जोडीदार जरा उशीराने सापडतात आणि लग्नही बरेच उशीरा होते.

हे वाचा:   आश्चर्यकारक ! तुमच्यापासून लपवलेली तिरुपती बालाजी मंदिराचे १० अद्भुत रहस्य..शास्त्रज्ञ सुद्धा हैराण.."ही एक जिवंत मूर्ती"

कन्या राशीच्या व्यक्तींचे हे वैशिष्ट्य आहे की, त्या व्यक्ती कोणताही निर्णय हा स्वतःच्या विचारानेच घेतता आणि आपल्या मेहनतीने नाव कमावतात. कोणतेही काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय या व्यक्तींना चैन पडत नाही. कन्या राशीसाठी मकर राशीच्या व्यक्ती या परफेक्ट मॅच आहेत.

या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे दोन्ही राशींच्या स्वभावात समानता असते. या दोन्ही राशीच्या व्यक्ती अत्यंत जबाबदार असतात. एकमेकांमध्ये कोणतेही वाद विवाद असतील तर ते सोडवणं या दोन्ही व्यक्तींना सहज सोपे असते. भावनिक, रोमँटिक आणि प्रॅक्टिकल या तिन्ही गोष्टी या मकर आणि कन्या राशीमध्ये असतात. त्यामुळे एकमेकांना या राशी कायम साथ देतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.