तं’बाखूमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तं’बाखूच्या पॅकेट्सवर, जाहिराती, प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला आपण हे पाहतो, वाचतो. पण दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष करतो. मजा म्हणून, टाइमपास म्हणून कित्येक तरुण मुलं-मुली ह्यांच्या आहारी जातात. आणि त्यातून अनेक समस्या उद्भवतात.
तं’बाखू, सि’गारेट आणि त्याच्या समस्या म्हणलं की आधी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो त्यामुळे होणारा तोंडाचा कॅन्सर किंवा लंग कॅन्सर. खरंच तं’बाखूमुळे कॅन्सर होतो का? आज आपण जाणून घेऊया नक्की कसा होतो तं’बाखूमुळे कॅन्सर. तं’बाखूमध्ये आढळणारी घा’तक 70 रसायने ही कारसिनोजनीक म्हणजेच कॅन्सरसाठी कारणीभूत असतात. त्यात प्रामुख्याने निकोटिन, फॉर्मलडिहाईड, टार ह्यांसारखी रसायनं असतात. टार आणि फॉर्मलडिहाईड हे शरीरातील पेशींना छिद्र पाडतात आणि ज्यापासून सजीव बनतात त्या आपल्या DNA ना कमजोर बनवतात.
मानवी शरीरात जर शरीराबाहेरील एखादा हा’निकारक घटक शरीरात गेला तर शरीरातील पेशी काही प्रमाणात वाढतात आणि त्यांचा आकार वाढवून त्या घटकाला त्यांच्यात सामावून घेऊन नष्ट करतात. ह्या प्रक्रियेला इंफ्लामेशन असे म्हणतात. जेव्हा व्यक्ती धूम्रपान करते किंवा तंबाखू सेवन करते तेव्हा ही प्रक्रिया सतत होत राहते.
त्यामुळे फुफ्फुसातील पेशींवर ता’ण येतो आणि त्या अगणिक रित्या वाढतात. त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग अर्थात लंग कॅन्सर होतो. ह्याशिवाय म्यु’टेशन हे सुद्धा एक कारण आहे. आपल्या शरीरात प्रत्येक गोष्टीसाठी एक जीन असते. हे जीन शरीरातील प्रत्येक घटना ठरवतात अगदी आपली वागणुक देखील. फुफ्फुसातदेखील त्यांचे कार्य सुरळीत होण्यासाठी असे अनेक जी’न्स असतात.
त्यातील KRAS ह्या जीन वर अचानक न बदलता येणाऱ्या बदलामुळे (म्यु’टेशन) देखील लंग कॅन्सर होतो. ह्या म्यु’टेशनसाठी तंबाखूची रसायने कारणीभूत ठरतात. तं’बाखूमुळे होणारे कर्करोग : तं’बाखूमुळे फक्त तोंडाचा किंवा फुफ्फुसाचाच कर्करोग होती असे नाही. ह्यामुळे यकृत, रक्त, अन्ननलिका ह्यांचे कर्करोगदेखील होऊ शकतात.
ध-क्कादायक म्हणजे तं’बाखू किंवा धूम्रपान करणाऱ्यालाच कर्करोग होतो असे नाही तर धूम्रपान करणाऱ्या माणसाच्या सतत आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तीला ही हा धूर शरीरात गेल्याने कर्करोग होऊ शकतो. ह्याला पॅसिव्ह स्मोकिंग असे म्हणतात. या गोष्टी टाळायच्या असतील तर ह्यावर एकमेव उपाय आहे तं’बाखू सेवन, धू’म्रपान, म-द्यपान कायमचे बंद करणे.
आज तरूणांनी ही गोष्ट प्रामुख्याने मनावर घेतली पाहिजे आणि स्वतःला तं’बाखू आणि तं’बाखूजन्य पदार्थांच्या व्य-सनापासून दूर ठेवले पाहिजे. त्याच बरोबर अशी व्य-सने आपल्या बरोबरीच्या इतर लोकांनी करू नये यासाठी सुद्धा तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत. माता-भगिनी मिसरीचे व्य-सन करतात हेही तितकेच वाईट आहे. त्यांचीही या बाबतीत प्रबोधन केले पाहिजे व त्यांना या व्य-सनापासून दूर ठेवले पाहिजे.
या गोष्टींच्या सेवनाने क्षणाचे सुख मिळते पण श-रीराची कधीही भरून न निघणारी हानी होते. तेव्हा वेळीच स्वतःला ह्या साऱ्या मोहतून सावरा आणि आपल्या अमूल्य अशा शरीराची काळजी घ्या..
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.