चुकूनही खाऊ नका ‘हे’ अन्नपदार्थ गरम करून; अन्यथा होईल अन्नातून वि’षबाधा..खूप जणांचा यामुळे जीव गेला आहे..महत्वाची माहिती !

आरोग्य

कामातून वेळ मिळत नसल्याने, खाण्यामध्ये लक्ष न दिल्यास, स्वयंपाक करायचा कंटाळा आल्यास आपण काही वेळेस फ्रीज मधील अन्न गरम करून खातो. परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न पुन्हा गरम करून खाणे योग्य नसते. यामुळे तुम्ही केवळ त्या जेवणाचा स्वादच गमावत नाहीत तर पोषणमूल्यही गमावता. तसेच त्या व्यक्तीला विविध आ-जारांचा धो का निर्माण होतो. कारण आपल्याच काही सवयी आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. आपल्या आरोग्यासाठी ही धो-क्याची घंटा आहे.

मशरूम:- मशरूम प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. तसेच त्यात खनिजेही असतात. मात्र जेव्हा ही भाजी तुम्ही पुन्हा गरम करता तेव्हा यातील प्रोटीन्स नष्ट होतात. मशरूम हे शिजल्या शिजल्या लगेच खायला हवेत असंच म्हटलं जातं. कारण मशरूम कापल्यानंतर एक तासाच्या आत त्यातील प्रोटीन कमी होऊ लागतं.

त्यामुळे मशरूम कधीही पुन्हा गरम करून खाऊ नये. तसं केल्यास, तुम्हाला पोटदुखीचा त्रास सुरु होऊन तुम्ही आ-जारी पडू शकता. त्यामुळे कधीही मशरूमची भाजी खाताना या गोष्टीची काळजी घ्यावी. तुम्ही ही भाजी एकवेळ खाऊन संपेल अशीच बनवावी.

भात:- रोज भात बऱ्यापैकी सर्वच लोक खातात, मग तो शिजवल्यावर 3 ते 4 तासांपर्यंत ठीक आहे, पण बरेच लोक रात्रीचा उरलेला भात पुन्हा गरम करून खातात. मात्र तुम्हाला ध क्का बसेल की असे करून तुम्ही तुमच आरोग्य बिघडत आहात. फूड्स स्टँडर्ड एजन्सी (एफएसए)नुसार शिळा भात पुन्हा गरम केल्याने ती व्यक्ती फूड पॉईझनिंगची शिकार ठरू शकते.

हे वाचा:   २ मिनिटांतच दूर करेल घशाचा प्रॉब्लेम; घसा दुखणे, सूज येणे कायमचे होईल नाहीसे.!

असे केल्याने भातामध्ये बॅसिलस सेरेस नावाचे अत्याधिक बॅक्टेरिया तयार होतात. भात शिजवताना हे बॅक्टेरिया नष्ट होतात मात्र भात थंड होताच पुन्हा जिवंत होतात. त्यामुळे भात पुन्हा गरम केल्यास त्या व्यक्तीला फूड पॉईजनिंग होऊ शकते. त्यामुळे शिळा भात हा आरोग्यासाठी अजिबातच चांगला नाही. त्यामुळे असा भात खाल्ल्यास तुम्हाला उल्टी अथवा जंतासारखे आजार होतात. पोट फुगू लागते.

चिकन:- चिकन हे प्रोटीनयुक्त असतं. पण कधीही चिकन पुन्हा गरम करून खाऊ नये. कारण तसं केल्यास, चिकनमध्ये असणारं प्रोटीनचं कम्पोझिशन पूर्णपणे बदलून जातं. त्यामुळे असं चिकन खाल्ल्यास, तुमची पचनक्रिया बिघडते आणि त्याशिवाय चिकन पचायलादेखील जड जातं.

बटाटा:- बटाटा जवळपास सर्वांच्या घरी असतोच, पण शिजलेला बटाटा हा जास्त वेळ ठेवणं योग्य नाही. तसंच बटाटा पुन्हा गरम करून खाऊ नये. बटाट्यामध्ये व्हिटामिन बी6, पोटॅशियम आणि व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. मात्र याची भाजी वारंवार गरम केल्यास यात क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरिया तयार होतात.

हे वाचा:   अशाप्रकारे अंघोळ केल्याने ११ रोग रोग होतील लगेच बरे; जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत.!

इतकंच नव्हे तर ही भाजी जेव्हा पुन्हा गरम केली जाते तेव्हा त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. तसेच शिजलेला बटाटा जास्त वेळ ठेवल्यास आणि पुन्हा गरम करून खाल्ल्याने तुम्हाला पचनक्रियेसंबंधी तक्रार होऊ शकते. पोटात दुखू शकतं. पित्ताचा देखील त्रास संभवतो.

पालक:- पालक आपल्या आरोग्यासाठी जितका हितकारक आहे तितकाच तो पुन्हा गरम केल्यास नुकसानदायी देखील आहे. पालक अथवा हिरव्या भाज्या , गाजर, ओवा यामध्ये नायट्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मायक्रोव्हेवमध्ये ते गरम केल्यास त्यातील नायट्रोजन नायट्राईट आणि त्यानंतर नायट्रोजमीन्समध्ये बदलतात.

जे पुढे कॅन्सरसारखा आ-जार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे कधीही पालक पुन्हा गरम करून खाऊ नये. तसे करणे स्वतःच रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.