हिंदू ध-र्मातील अनेक तत्वे अनेक लोक पाळतात व हिंदू पुराण आपल्याला जीवनभूत अनेक गोष्टी शिकवते. त्यामुळे जीवन जगत असताना अनेक आशा गोष्टी आहेत ज्यांचे परिणाम जे आपल्या आयुष्यावर होतात ते जाणून घेणे आवश्यक आहे. असे काही सत्य जे ध-र्माच्या अनुसार आपण समजून घेऊन वेळीच सावध राहायला हवे.
आपल्या हिंदू शास्त्रानुसार आपण अशा 3 लोकांच्या कधीही पाया पडू नका, अन्यथा तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. तसेच तुम्ही अशा चुका मुळीच करू नका ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नुकसान तुमच्या स्वतःमुळे येईल. असे काही लोक जे खूपच नकारात्मक विचारांचे असतात, जे लोक दुसऱ्याचं वाईट चिंतीत असतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहायला हवे.
चरणस्पर्श म्हणजे समोरच्या व्यक्तीला मन देऊन, त्यांचा आदर करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण पाया पडतो. संत महात्मा, आई वडील, शिक्षक यांचे आपण आशीर्वाद घेतो. आपण जेव्हा त्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा आपले हात व त्यांचे चरण यांच्यात स्पर्श होतो व एक ऊर्जा वहन होते.
या स्पर्शाद्वारे त्यांच्या मनात असणारे सकारात्मक भाव, सुविचार, निर्मल भावना व आशीर्वाद आपल्या श-रीरात मनात प्रवेश करतात. आणि म्हणूनच सकाळी स्नान झाल्यावर आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींचे चरणस्पर्श करणे आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीने शिकवले आहे. त्यामुळे आपण आपल्या जेष्ठांकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन जीवनात वाटचाल करायला हवी.
सर्वात पहिल्या व्यक्ती म्हणजे आपले शत्रू होय. आपले शत्रू हे नेहमी बारीक लक्ष ठेऊन असतात व त्यांना नेहमी आपली अधोगती हवी असते, त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी आपलेच कुविचार सुरू असतात व जर आपण त्यांच्या पाया पडलो तर त्यांची नकारात्मकता आपल्यात येते व आपले मन कामात रमत नाही, आपल्याला फारसे काही सुचत नाही, गोष्टी करण्यासाठी लागणारी ऊर्जा संपल्यासारखं वाटतं.
जे लोक अनोळखी असतात त्यांच्या पाया पडू नका,कारण हे लोक कोणती भावना, ऊर्जा घेऊन फिरतात हे आपल्याला ठाऊक नसते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यामध्ये अनपेक्षित बदल होऊ शकतात ज्यामुळे आपलं जीवन बदलू शकत, काही वेळेस खूप नुकसान होते व आपल्या आयुष्यातील आपला इं ट रे स्ट नाहीस होतो.
त्यामुळे चुकूनही त्यांच्या पाया पडू नका, पण याचा अर्थ त्यांच्याशी गैरव्यवहार करू नका तसेच त्यांचा अपमान देखील करू नका. त्यांच्याशी योग्य व सभ्य वर्तणूक करा. जे लोक पापी, दुराचारी, चारित्र्यहीन असतात त्यांच्याशी बोलू नका, त्यांच्या संगतीत राहू नका व त्यांच्या पाया अजिबात पडू नका.
असे लोक अधार्मिक, नास्तिक असतात, समाजात त्यांना किंमत नसते, त्यांचे आयुष्य अर्थहीन असते, अशा लोकांच्या चरण स्पर्शाने आपले आयुष्य बरबाद होते, आयुष्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक गोष्टी आकर्षित होते व असलेला मान, सन्मान आपण घालवून बसतो, संपत्ती, आपली माणसं गमावून बसतो.
आपल्याला व्यसनी, दुराचारी, अर्थहीन मनुष्य म्हणून जगण्याची वेळ येते ती फक्त अशा दुष्ट लोकांमुळे. त्यामुळे अशा पापी लोकांना आयुष्यात स्थान देऊ नका.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे बेस्ट मराठी फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.