हा अनुभव अंकिता चव्हाण या स्वामी सेवेकरी ताईचा आहे ते अंधेरी इथे राहतात. ताई सांगतात मला आलेला स्वामींचा अनुभव आपल्या सोबत सांगत आहे. माझा एकुलता एक मुलगा आता तो 20 वर्षाचा आहे तो चौदाविला आहे तो गेले 15 दिवस कमी जेवत होता म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो.
दिनांक 24/10/20 रोजी आम्हीच डॉक्टरला सांगितलं की याच ब्लड आणि युरिन चेक करा दुपारी 11 वाजता रक्त चेक केल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून आम्हाला सारखा लॅब मधून फोन येण्यास सुरुवात झाली की तुमचा मुलगा कसा आहे त्याला काही त्रास होत आहे का, तर मी त्यांना म्हणाली की त्याला काहीच त्रास होत नाही.
तरी लॅब मधून सारखा फोन येत होता तुम्ही रिपोर्ट घेऊन जा मी थोडी घाबरली आणि स्वामींचा जप चालू ठेवला माझ्या मिस्टरानी रिपोर्ट डॉक्टरला दाखवला तेव्हा डॉक्टर आम्हाला म्हणले की याच ब्लड खूप कमी झाला आहे हिमोग्लोबिन 3.7 झाला आहे. त्याला कावीळ आहे आणि पांढऱ्या पेशी देखील कमी झाल्या आहेत.
ताबडतोब ऍडमिट करा माझा स्वामी जप चालूच होता आणि को-रोनामुळे दवाखाना मिळत नव्हता शेवटी रात्री 12 वाजता ऍडमिट केले. त्याला आय.सी.यू मध्ये ठेवण्यात आल डॉ-क्टरांनी 6 बॅग ब्लड आणण्यास सांगितल मिस्टर रक्त आणण्यास गेले रात्रीचे 1.30 वाजून गेले होते नामस्मरण चालू होते.
अचानक व्हाट्सएपला पाहिल की अंजली ताई आणि प्रदीप दादा ऑनलाइन होते तेव्हा ताईला मॅसेज केला की कॉल करू का ताई त्यांनी सांगितले की अर्जंट असेल तर फोन करा तर मी हो म्हणाली कॉल केला आणि कॉल केल्याबरोबर ताईंनी मला दादा सोबत बोलणं करून दिल.
रात्रीचे 2 वाजले होते दादा म्हणाले घाबरू नका ताई मी एक सेवा देईल ते करा. सेवा दिली आणि 51 वेळा तारकमंत्र म्हणायला सांगितले मी सेवा चालू केली 4 वाजून 30 मिनिटांनी ब्लड बॅग घेऊन मिस्टर आले आणि उपचार चालू केले सर्व डॉक्टरांना व सिस्टरांना आश्चर्य वाटले की याला चक्कर कशी आली नाही.
हे सर्व स्वामींची आणि दादांची कृपा आता तो चांगला आहे अंजली ताई रोज मुलाची विचारपूस करत होत्या या सर्वांना माझा व कुटुंबाचा मानाचा मुजरा असेच आशीर्वाद राहू द्या “श्री स्वामी समर्थ.” असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव. कमेंट मध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थ लिहा.