श्रीमंत लोक करतात गुरवारी ही ३ कामे ! तुम्ही देखील करा..यामुळे घरात धनसुख, यश, लक्ष्मी येते..

अध्यात्म

मित्रांनो, कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात, त्यामध्ये घरातील काही वास्तू दोष, कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी गुरुवारी हे उपाय तुम्ही करा. तसेच जर तुमच्या जीवनात वारंवार अडचणी येत असतील, वारंवार अपयश येत असेल, कितीही कष्ट करून देखील इच्छित फलप्राप्ती होत नसेल तर हे उपाय करा.

हे उपाय जे लोक करतील त्यांच्यावर गुरू ग्रहाची कृपा बरसेल, गुरुवार हा गुरू ग्रहाला व जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू यांना समर्पित असून या दिवशी जर तुम्ही हे उपाय केलेत तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अडचणी दूर होऊन जीवनात धनसंपदा येईल.

गुरू ग्रह हा आपल्या जीवनातील अडचणी कमी करतो, विवाहित जीवनातील पती पत्नीतील भांडण दूर होण्यासाठी सुद्धा गुरुची उपासना केली जाते, गुरूंची कृपा यासाठी गुरूवारी उपवास देखील ठेवतात. गुरुवार च्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, किंवा कोणतेही फिक्या रंगाचे, तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ सेवन करणे शास्त्रा नुसार योग्य मानले जाते.

जसे की वरण, बेसन लाडू, आंबा बर्फी, आंबे, पपई इ. तसेच या दिवशी हळदीचे उपाय विशेष करून केले जातात, आयुर्वेदिक रित्या जशी हळद खूप गुणकारी आहे तशीच ती आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यासाठी सुद्धा आहे. हळदीमध्ये दैवी शक्ती, पावित्र्य मोठ्या प्रमाणावर असल्याने ती आपल्या जीवनात सुखासाठी उपायकारी ठरते.

हे वाचा:   हे ३ गुण असणारी व्यक्ती घरात नेहमीच आणते धन; तुमच्या घरात सुद्धा अशी स्त्री आहे का.?

हळदीमुळे नजरदोष नाहीसे होतात, म्हणून तर लग्नात लग्न होण्या अगोदर नवरा नवरीला हळद लावली जाते, त्यामुळे त्यांना बाधा होत नाही. तुमच्या घरात जर खूप नकारात्मक ऊर्जा भरली आहे किंवा सतत काहीतरी वाईट घडतंय अस वाटतं असेल तर तुम्ही हे उपाय गुरुवारी अवश्य करा.

गुरुवारच्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने विशेष लाभ मिळतो. जर तुम्हाला अस वाटत असेल की तुम्हाला कोणती तरी बाधा झाली आहे किंवा नजरदोष तुमच्यावर झाला आहे तर अशा वेळी नक्कीच तुम्ही हा उपाय करा कारण शंका खूपच त्रास देते. गुरुवारी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तुम्ही चिमूटभर हळद टाका व त्याने अंघोळ करा, तुम्हाला प्रसन्न वाटेल व सर्व दोष निघून जातील.

हे वाचा:   कोणी मागता मागता मेले तरी घरातील ही वस्तू देऊ नका..नाहीतर खूप पश्चाताप होईल ! आजच जाणून घ्या

तसेच घरातील दोष, नजरदोष, वास्तू दोष नाहीसे होतील जर अजून एक उपाय केल्यास याचे फळ मिळते. गुरुवारी स्नान करून झाल्यावर तुम्हाला सूर्याला जल द्यायचे आहे. हे अर्घ्य देतेवेळी ज्या कलशातून तुम्ही अर्घ्य द्याल त्या शुद्ध जलामध्ये चिमूटभर हळद घाला व जल द्या व सुर्यदेवाला प्रार्थना करा.

यामुळे तुमचं जीवन सुमार्गावर जाईल, भाग्य जागे होईल. तसेच तुमच्या अडचणी दूर होतील. यानंतर त्याच कलशात दुसरे शुद्ध जल घेऊन ईश्वराचे नाम घेत चिमूटभर हळद त्यात टाका व घरातून सर्वत्र ते पाणी शिंपडा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. घरात सुख, संपत्ती समृद्धी येईल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा बेस्ट मराठीचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे बेस्ट मराठी फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.