मी एक शिक्षक आहे. आज मी माझ्या एका विध्यार्थिनी बद्दल आपणास सांगणार आहे. ती तशी खुप हुशार होती, तिचे वावरणे, तिचा अभ्यास तसेच पाठांतर सगळे काही उत्तम होते. तिच्या घरच्यांना जाणवत असेल की नाही माहीत नाही पण ती खूप नीटनेटकेपणाने राहत होती. त्यामुळे तिचा बर्यापैकी वेळ आरशासमोर जात असणार.
काही काळाने ती पास होऊन पुढील शिक्षणासाठी कोठेतरी बाहेरगावी गेली, मी त्या माझ्या विद्यार्थिनींला विसरूनच गेलो होतो आणि कालच ती मला अचानक भेटली. ही आमची भेट जवळपास बारा-तेरा वर्षांनी झाली होती. तीने रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली आणि हाक मा-रली क्षणभर मी तिला ओळखलेच नाही.
तिने मला ओळख पटवून दिल्यानंतर तेव्हा आठवले, मी म्हणालो तुझ्यात सॉलिड बदल झाला आहे ,आता काय करतेस विचारल्यावर ती म्हणाली मी येथे नसते अब्रॉड ला असते. माझा नवरा तिथेच असतो. आता आईकडे आली आहे महिनाभरासाठी. तिने माझा नंबर घेतला आणि भेटून गप्पा मारू असे सांगुन निघून गेली.
माझा शिक्षकीपेशा असल्यामुळे असे अनेक वेळा मला माझे विद्यार्थी भेटत असतात. काही फोन करतात तर काही विसरतात. पुढच्या 4 ते 5 दिवसांनी तिचा फोन आला तिने भेटणार का म्हणून विचारले. आम्ही हॉटेलमध्ये भेटायचे ठरले. संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये भेटलो, शाळेतील अनेकजणांच्या चौ-कशा झाल्या. तेवढ्यात ती अचानक म्हणाली की सर माझा प्रॉब्लेम झाला आहे.
मला धमाल लाईफ जगायची होती, मला कुठल्याही बंधनात जगायचे नाही. ती म्हणाली सर माझ्याकडे पैसे आहेत त्याचबरोबर सर्व काय आहे पण जगणे कुठेतरी राहून गेले आहे असे मला वाटते. नवऱ्याला मला द्यायला वेळ नसतो, त्याचे तिथे दोन मोठे बिझनेस आहेत त्याचे प्रायव्हेट लाइफ वेगळे आहे.
मी विचारले की तू काही लफडे तर केले नाहीस ना? त्यावर ती म्हणाली तिथे एक मुलगा आहे 22 वर्षाचा त्याच्याबरोबर. मी नेहमीप्रमाणे तिला बोललो असे काही करू नकोस. ती म्हणाली तो कॉलेजमध्ये जातो असाच भेटला होता तो तिथेच ओळख झाली. तीने मला विचारले की पुढे काय करू? काय उत्तर द्यायचे मला काहीच समजत नव्हते.
त्या मुलाचे म्हणणे काय आहे असे मी विचारले? तेवढ्यात ती म्हणाली तो लग्नासाठी तयार आहे. शेवटी तिला म्हणालो खऱ्या जीवनात फार वेगळेपण असते. तू लग्न वगैरेच्या भानगडीत पडू नकोस. त्या विषयावर आमची बरीच चर्चा झाली ती पटकन म्हणाली की सर असे कधी तुमच्या आयुष्यात घडले आहे का? मी तसा अवाक होऊन स्वतः विचार करू लागलो.
मी तिला समजवले की जे नाते तू जोडण्याचा प्रयन्त करत आहेस त्याला हा समाज कधीच तो हक्क देणार नाही. तुझ्याकडे इतका पैसा आहे त्यासोबत जो मान सन्मान आहे तो तू फक्त एका चुकीमुळे पूर्ण घालवून बसशील. त्यानंतर मात्र तुझ्याकडे फक्त पश्चाताप करण्याचे सोडून काही उरणार नाही.
आणि जो तू मुलगा म्हणत आहेस तो फक्त २२ वर्षाचा आहे. तो तुला कसे बरे सांभाळू शकेल. आणि तू त्याला? त्यावर ती जोर जोरात हसू लागली आणि म्हणाली अस काही नाहीये..सर तुम्ही इतक्या वर्षांनी भेटला म्हणून मी तुमची गंमत करत होते. माझे बाहेर कुठेही स-बंध नाहीयेत.
पण आम्ही वर्गात असताना तुम्ही आम्हाला जीवनाच्या गोष्टीबद्दल जे काही शिकवत असायचा, समजवत असायचा, आम्हाला चांगल्या मार्गाने दिशा दाखवयचा. याचे आजही मला खुप कौतुक वाटते, मला तुम्हाला आज परत त्याच शिक्षकाच्या भूमिकेत बघायचे होते. म्हणून थोडी गंमत केली..मी तिला कॉलेज मध्ये रागावत होतो तश्या शि’व्या घालयला सुरवात केली..ती देखील सॉरी सर म्हणत हसू लागली..