केस गळणार नाहीत, तु’टणार नाहीत..केस घनदाट वाढण्यासाठी हे घरगुती उपाय..केस गळतीचे खरे कारणे जाणून घ्या !

आरोग्य

मित्रांनो, काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही त णा व पूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या स-मस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते , काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धो क्या ची घंटा आहे, अशावेळी काही घरगुती उपाय तसेच केसांची निगा कशी राखावी या टिप्स आपल्या मदतीला धावून येतात.

कशामुळे आपल्या केसांची वाढ का खुंटते याचा सर्वात आधी विचार करायला हवा. केसांना पोषक तत्वे न भेटणं हे सर्वात प्रमुख कारण आहे. जर आपल्या शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा झाला नाही, तर आपल्याला प्रथिनेच्या कमतरतेच्या दोन ते तीन महिन्यांनंतर केस गळण्याचे परिणाम जाणवतात.

त्यासाठी केसाच्या मुळांना ही पोषक तत्वे एक म्हणजे तेलातून व दुसरी म्हणजे अन्नातून जातात, व ती त्यांना मिळण्यासाठी आपण आठवड्यातून एक ते दोन दिवस तेलाने मसाज करावी. त्यामुळे केसांची हलकी मुळे मजबूत होतात. आपण जे अन्न खातो ते पौष्टिक हवं, तसेच आपली पचनशक्ती चांगली हवी,

हे वाचा:   दृष्टी इतकी वाढेल की तुम्ही तुमचा नंबरचा चष्मा फेकून द्याल; लाख मोलाचा उपाय..डोळ्यांच्या समस्येसाठी जरूर करून पहा..

त्यामुळे आपल्या केसांना योग्य व पूरक पोषक द्रव्ये मिळतील. तसेच रक्तप्रवाह सुरळीत हवा, कारण केसांच्या मुळांना पुरेसा रक्तपुरवठा व ऑक्सिजन मिळणं फार गरजेचे आहे. त्यासाठी आपलं आरोग्य, व्यायाम फार महत्वाचा आहे. तसेच केसांच्या आरोग्यासाठी तुम्ही हे उपाय करून पहा. केसांना मुलतानी माती लावून पहा, केस मजबूत होतील व चमकतात सुद्धा.

कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद , प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तु-टण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.

तसेच केस जेव्हा धुवाल तेव्हा ओले केस जास्त ओढू नका, ते ड्रायर ने न सुकवता नैसर्गिकरित्या सुखवा व तसेच ओल्या केसांना विंचरू नये. केसातील गुंता हळुवार नीट काढावा, शक्यतो बाहेर जाताना रुमाल वापरा ज्यामुळे प्रदूषणामुळे केस खराब देखील होणार नाहीत व केसांत गुंता देखील होणार नाही.

हे वाचा:   मान अवघडली असेल तर करा 'हे' ४ घरगुती उपाय..मानदुखी, कंबरदुखी त्वरित थांबेल..आजच जाणून घ्या

जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात. केस गळणे नियंत्रित करणे केवळ आपल्या डोक्यावर तेल लावण्यासारखे नाही, तर आपल्याकडे असलेल्या केसांची काळजी घेणे देखील आहे.

म्हणून झोपायच्या आधी गरम तेलाने नियमितपणे आपल्या टाळूची मालिश करा आणि दुसर्‍या दिवशी सकाळी शैम्पू करा. हे आपल्या केसांना अगदी मुळांपासून मजबूत करेल. परंतु जर का आपल्याला डोक्यातील कोंड्याची स-मस्या असल्यास आपल्या केसांना गरम तेल लावण्यास टाळावे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.