श्रीकृष्ण सांगतात ज्या घरात मला प्रिय असणाऱ्या या वस्तू असतात, त्यांच्यापासून गरिबी नेहमी लांब राहते..

अध्यात्म

वास्तुशास्त्रनुसार आपल्या घरात अशा काही वस्तु ठेवल्यास आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या आपोआप नष्ट होऊ लागतात. घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते. हिंदु ध-र्मात ज्योतिष शास्त्र आणि वास्तू शास्त्र याला खुप महत्त्व आहे. कारण घरातील सर्व प्रकारच्या समस्या या गृहदोष निर्माण झाल्यामुळे होतात. हा दोष दूर करण्यासाठी काही वस्तू आपल्या घरात ठेवल्याने हे दोष दूर होणास मदत होते.

यामध्ये सर्वप्रथम पाण्याने भरलेला घडा घराच्या उत्तर दिशेला नक्की ठेवावा. यामुळे घरात कधीच पैशाची चणचण भासत नाही. परंतु हा घडा रिकामा होऊ देऊ नये. तसेच हनुमानाची मूर्ती घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजे नैऋत्य दिशेला हनुमानाची पंचमुखी मूर्ती ठेवावी आणि नियमितपणे त्यांचे पूजन करावे.

देवी लक्ष्मी व भगवान कुबेराचा फोटो घराच्या मुख्य दारावर लावावा यामुळे घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. घरात वास्तू देवांची मूर्ती ठेवल्यास घरातील सर्व दोष नाहीसे होतात आणि घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. तसेच घरातील ज्या भागात घरातील सदस्य जास्तीत जास्त वावर करतात त्या भागात चांदीचे, तांब्याचे किंवा पितळेचे पिरॅमिड ठेवावे यामुळे घरातील सदस्यांच्या उत्पन्नात वाढ होते.

हे वाचा:   विवाहित स्त्रीयांनी बांगड्या घालतांना या गोष्टी विशेष पाळाव्यात; नाहीतर होईल खूप पच्छाताप.!

धातूपासून बनवलेले कासव किंवा मासा घरात ठेवणे शुभ मानले जाते असे केल्याने घराशी निगडित सर्व संकटे व समस्या दुर होतात. प्रत्येक घरात गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा असतेच ही गणपतीची मूर्ती घराच्या उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात ईशान्य कोपऱ्यात गणपतीची मूर्ती ठेवावी. यामुळे सर्व अडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होते.

हिंदू ध-र्म शास्त्रामध्ये तुळशीला पूजनीय मानले गेले आहे . तुळशीचे रोप नेहमी घराच्या ईशान्य दिशेस असल्यास शुभ समजले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेस लावलेली तुळस घरात सुख आणण्याचे काम करते. घराच्या हॉलमध्ये उडणार्‍या पक्षांचा आवाज लावणे शुभ मानले जाते. उडणार्‍या पक्षांचा फोटो घरच्या सदस्यांना ऊर्जा देण्याबरोबरच सफलता व प्रसिद्धी मिळवून देतो.

तसेच घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्य देवांचा फोटो पुर्व दिशेला लावावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर काही कारणामुळे धनप्राप्त करण्यात काही अडचणी येत असतील तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी देवपूजेत अक्षताचा वापर नक्की करावा. यात हळद,कुंकू,गुलाल या सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर अक्षता अर्पण केल्या जातात.

हे वाचा:   पतीचा वाईट काळ येण्याआधी पत्नी करतात ही काही वाईट कामे; कडू आहे पण सत्य आहे.!

पूजा पाठ मध्ये तांदळाचा वापर करणे अनिवार्य मानले जाते. देवी-देवतांना अक्षता समर्पित केल्या जातात. देवी लक्ष्मी घरात निवास करण्यासाठी एका लाल कापडात पिवळ्या रंगाचे तांदळाचे 21 दाणे बांधून धनाची देवी लक्ष्मी आईचे विधीपूर्वक पूजन करावे. त्यानंतर हे लाल गाठोडे आपल्या पर्स किंवा पाकिटात लपवून ठेवावे यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचे नित्य वास्तव्य असते.

आर्थिक अडचणी नष्ट होतात पर्स किंवा पाकिटात कोणतीही अधार्मिक वस्तू ठेवू नये. शास्त्रनुसार हळद टाकून पिवळ्या केलेल्या तांदळामुळे देवी-देवतांची कृपा आपल्यावर खूप लवकर होते.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.