शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाली तर कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे..कमतरता जाणवल्यास करा हे उपाय..

आरोग्य

आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर याचा परिणाम आपल्या आ-रोग्यावर होतो. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यामागचे कारण अनेकदा प्रदूषण असते. प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनचा स्तर कमी होऊ लागतो. इतकंच नव्हे तर दमा, एलर्जी, मायग्रेन, फुफ्फुसांमध्ये इ-न्फेक्शन, खोकला आणि डोळ्यांचा थकवा हे आ-जार प्रदूषणामुळे होतात.

यामागचे कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होय. यासाठी आपल्याला रोजचा सकस आहार घ्यायला हवा. शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण व्यवस्थित असणं खुप गरजेचं आहे. जर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता असेल किंवा त्याचप्रमाणे कमी झालं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कुठेतरी कमकुवत होऊ शकते.

आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनच प्रमाण कमी असेल तर आपल्याला श्वास घेण्यास त्रा स होतो तसेच थोडं जरी चाललं तरी दम लागतो. शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास किंवा ऑक्सिजनची कमतरता असल्यास त्याची काही ठराविक लक्षणे आढळतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जरी आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली असली तरी रुग्ण सामान्य दिसतो.

शिवाय ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यास हृदविकाराचा धो-काही निर्माण होतो. तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता असल्यास त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते तसेच रक्तदाबावर याचा परिणाम होतो. आपल्या शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्यास थायरॉईडची स-मस्यादेखील निर्माण होते.

हे वाचा:   कितीही चष्म्याचा नंबर कमी होईल; डोळ्यांची जळजळ,डोळ्यातून पाणी येणे यासाठी करा हा रामबाण उपाय.!

त्याची लक्षणे म्हणजे जे लोक जास्तीत जास्त एका जागी बसून राहतात किंवा कमी हालचाली करतात त्यांच्यात ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होणं ही स-मस्या उद्भवू शकते. त्यामुळे जर आपल्या कामाचे स्वरूप बसून असेल तर किंवा ऑफिसमध्ये असेल तर थोडा वेळ सुट्टी घेऊन मोकळ्या हवेत फिरले पाहिजे.

तसेच अनेक जण खूप कष्टा ची कामे करतात पण त्यामानाने आहार व्यवस्थित घेत नाहीत त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास सुद्धा ऑक्सिजन लेवल कमी होण्याची शक्यता असते. कारण आपल्या शरीरातील फुफ्फुसाला हवा पोहोचण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असते.

त्यामुळे बीट, टोमॅटो, गाजर, हिरव्या पालेभाज्या, काही डाळी, सुकामेवा, खजूर ,नाचणी ,पोहे ,राजगिरा या पदार्थांमधून शरीराला लोह मिळते. त्यामुळे याचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या रोजच्या जीवनात व्यायाम किंवा योगा केल्याने देखील शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. यासोबतच चांगला आहार घेतल्यास आपली फुफ्फुसे निरोगी राहतात.

त्यामुळे परिणामी आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून निघण्यास मदत होते. डाळी, ताज्या भाज्या, अंडी, दूध, पनीर यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात व्हि’टॅमिन मिळतात. श्वसनाचा व्यायाम रोज करावा, त्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होतो.

हे वाचा:   शरीरातील उष्णता चुटकीत कमी करा..पित्त, छातीत जळजळ, तोंड येणे, पोटाच्या सर्व तक्रारी..आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीत !

तसेच हा व्यायाम करताना आधी चार सेकंदांपर्यंत श्वास रोखून मग नंतर चार सेकंदानंतर श्वास सोडुन द्या. यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो. असे चार ते पाच वेळा करू शकता. तसेच आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी चांगली राहण्यासाठी झोप खुप महत्वाची मानली जाते. त्यामुळे रोज सात ते आठ तास झोपल्याने निरोगी राहण्यास मदत होते.

झोप पूर्ण न झाल्यास आळस आणि शारीरिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोज उत्साह राहण्यासाठी झोप आपल्या शरीराला आवश्यक आहे. समतोल आहार आणि व्यायाम केल्याने आपण आपल्या शरीरात ऑक्सिजनचे योग्य प्रमाण ठेवू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.