घराजवळील ही वस्तू वापरा..फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील, पुन्हा धान्यात किडे कधीच होणार नाही..

सामान्य ज्ञान

शेतकरी शेतात भरपूर कष्ट करतो व धान्य पिकवतो. हे धान्य तो 2 कारणांसाठी साठवून ठेवतो ते म्हणजे जर सध्या धान्याला भाव नसेल तर योग्य दर लागल्यावर बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी तोपर्यंत साठवणूक करतो व दुसरी गोष्ट म्हणजे वर्षभर घरी खाण्यासाठी तो धान्य साठवून ठेवतो.

पण हे धान्य साठवताना एक गोष्ट घडतेच ती म्हणजे या धान्यात किडे, आळ्या, मुंग्या होतात व धान्याची नासधूस करतात. त्यामुळे घरातील धान्य खाण्या लायक राहत नाही कारण त्याचे पीठ झालेले असते. कीडीचा प्रादुर्भाव, मुंग्या व अळ्यांना कायमच पळवून लावण्यासाठी आपण काही केमिकल्स वापरतो, पण जर आपण नैसर्गिकरित्या धान्य साठवणूक केली तर जास्त फा-यदेशीर होते व त्याचे साईड ई फे क्ट होत नाहीत.

त्यासाठी तुम्ही हा एक उपाय नक्की करा ज्यामुळे तुमचं धान्य चांगलं राहील. आपण साठवलेल्या धान्यात सुमारे 12 प्रकारचे किडे होतात, यामध्ये अळी, भुंगेरा, खापरा किडा, तांदळातील पतंगा, लुशी, नूशी, उशी होते. जर का एकदा यांचा शिरकाव झाला तर बाहेर काढणे कठीण होते. हे किडे जास्त पावसाळ्यात आढळतात कारण पावसाळ्यात असणारी आद्रता व कमी तापमान किड्यांना पोषक ठरते.

हे वाचा:   लग्नात मुलीकडून हुंडा घेताय..? सावधान..; भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

कीटकांचा जीवनक्रम 15 दिवसांचा असल्याने त्यांची प्रजनन क्षमता खूप जास्त असते. कृषितज्ञांच्या नुसार धान्यात प्राथमिकता किडे शेतातच लागतात, पीक फुलत असतानाच त्यावर ते अंडी घालतात व त्यांची आपोआप वाढ होत राहते. तसेच ही अंडी पुढे जाऊन ज-न्माला येतात तोवर धान्य घरी येऊन गोणपाट मध्ये ठेवले जाते व त्यात हे किटक आसरा शोधत राहतात.

सुरुवातीला जरी कमी असले तरी त्यांचा प्रादुर्भाव वाढायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगणे चांगले आहे. तसेच जर तुम्ही घरात गोणपाट किंवा पोत्यात धान्य साठवत असाल तर तुम्ही ही खबरदारी घ्यायलाच हवी. पहिली खबरदारी म्हणजे धान्य कडक उन्हात स्वच्छ ठिकाणी व स्वच्छ कपड्यांवर वाळवून घ्या, तसेच जर हे धान्य भरताना धान्याची पोती स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे प्रादुर्भाव वाढणार नाही.

हे वाचा:   ढेकणांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा सोपा उपाय..१०० टक्के खात्रीशीर घरगुती उपाय..परत कधी घरात ढेकुण दिसून येणार नाही !

धान्य साठवताना ती जागा स्वच्छ व हवा खेळेल अशी हवी कारण हवेशीर जागा नसल्यास प्रादुर्भाव वाढतो व आळ्या होतात. तसेच धान्य साठवताना थेट जमिनीवर पोती न ठेवता खाली पॉलीथिन कागद, बांबू अथवा वासे असतील तरी चालते. ज्यामुळे जमिनीतील किडे धान्यात प्रवेश करणार नाहीत..तसेच ओलावा लागत नाही.

यामध्ये जी वनस्पती घालून ठेवायची आहे ती म्हणजे गुळवेल. ज्यामुळे तुमचं धान्य वर्षभर किडे मुक्त राहील. गुळवेल ही जंतुनाशक आहे. त्यामुळे तिचे बारीक बारीक तुकडे तुम्ही धान्यात टाक. किडे , मुंग्या, अळ्या होणार नाहीत, धान्य सुरक्षित राहील. दुसरी अजून एक वनस्पती म्हणजे जी आयुर्वेदात अतिशय गुणकारी मानली जाते ती म्हणजे कडुलिंबाची पाने अथवा पाला. हा कडुलिंबाचा पाला तुम्ही धान्यात जरी घालून ठेवला तरी धान्य सुरक्षित राहील.