१४ मे अक्षय्य तृतीया: नक्की खरेदी करा यापैकी एखादी वस्तू..लक्ष्मी धावत येईल घरी..वर्षभर पैसा थांबेल

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

अक्षय सुख देते ती अक्षय्य तृतीया होय, साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया होय. ही अक्षय तृतीया यावर्षी 14 मे 2021 रोजी आली आहे, हा दिवस खूपच महत्वाचा असतो, यादिवशी सर्व शुभ कामे केली जातात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी दैवी शक्ती सुद्धा खूप कार्यरत असतात ज्या यादिवशी धरतीवर उतरतात.

आपल्याला आशीर्वाद मिळतो व आपण जर यादिवशी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भाग्यात वृद्धी होते व अडचणी दूर होतात. वैशाख महिन्याची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते.

कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे होय. सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय्य मानली गेली आहे. त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय्य मानली गेली आहेत.

यादिवशी माता लक्ष्मी पूजन महत्वपूर्ण मानले जाते त्यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धनलाभ होतो. या दिवशी सर्व शुभ कार्ये केली जातात. तसेच नव्या व्यापाराची सुरुवात, लग्न आणि सर्व मंगल कार्ये या दिवशी पार पाडली जातात. तर यंदा 15 वर्षानंतर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य, शुक्र, चंद्र आणि राहू आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

हे वाचा:   एकवेळ जीव द्या पण शनिवारी या गोष्टी अजिबात विकत घेऊ नका; अन्यथा घरात येईल कायमची कंगाली.!

तुम्ही सोने अथवा सोन्याऐवजी या गोष्टी सुद्धा या शुभ मुहूर्तावर खरेदी करु शकता. त्यामुळे आयुष्यात धनसंपत्ती आणि सुख-शांती लाभेल. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्र-पूर्वजनांना आनंदित ठेवण्यासाठी पाण्याचा कलश, पंखा, काकडी, खरबूज, साखर आणि तूप या वस्तूंचे दान करा.

लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी या दिवशी 11 कवड्या खरेदी करुन त्या लाल रंगाच्या कपड्यात लपेटून देव्हाऱ्यात ठेवा. त्यामुळे घरात धनसंपत्ती लाभेल. सोने खरेदी करणे तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही लक्ष्मीच्या पादुका खरेदी करुन त्याची दररोज पूजा करा. यामुळे तुम्हाला सुख-शांती लाभेल.

श्रीहरी विष्णूंना प्रिय असे, शांततेचे, सुखाचे प्रतीक मानले जाणारे असे कासव खरेदी करा व देवघरात त्याची स्थापना करा. तसेच दक्षिणावर्ती शंख खरेदी करा व तो देवघरात स्थापन करा, त्यामुळे धनाची कमी कधीही भासत नाही. तसेच एक डोळा असलेला नारळ जो खूपच दुर्मिळ असतो असा नारळ जर मिळाला तर खूपच भाग्यवान होय.

हे वाचा:   महिलांनी रविवार च्या दिवशी करा या फळाचे दान; घर राहील नेहमी पैश्यानी भरलेले.!

असा नारळ तुम्ही तुमच्या देवघरात कलश स्थापन करून रोज पूजन करू शकता. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती जी देवघरात असणे खूपच शुभ मानली जाते. अशी मूर्ती या दिवशी खरेदी करून स्थापन केल्याने घरात अक्षय्य सुख नांदते. धनाची वृद्धी होते. पारद मूर्ती म्हणजेच पाऱ्याची लक्ष्मी मूर्ती जी बाजारात किंवा ऑनलाइन मागवता येते ती तुम्ही स्थापन करा.

तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते, तसेच शास्त्राप्रमाणे श्रीयंत्र खरेदी करून स्थापना करायला हवी, लक्ष्मी यंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र खरेदी करून त्याची योग्य पूजा करून स्थापना करा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.