एखादी इच्छा बोलून दिव्यात टाका हि १ वस्तू; कोणतीही इच्छा व मनोकामना लगेचच होईल पूर्ण..!

अध्यात्म

पूजा करताना दिव्याद्वारे आपण भगवंतांपर्यंत पोहोचतो, दिवा लावल्याने आपली प्रार्थनाही लवकर स्वीकारली जाते. ज्यावेळी आपण देवीची आराधना आणि पूजन करीत असतो अशावेळी दिव्यात तिळाचे तेल टाकावे व लाल रंगाचा डोरा वात म्हणून वापरावा.

देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा लावावा व शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी राईच्या तेलाचा दिवा लावावा व त्या दिव्यात लवंग तसेच काळीमिरी टाकावी. सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी एक किंवा सात वातींचा दिवा लावला जातो. जर सूर्यदेवांना प्रसन्न करायचे असेल तर एक वातीचा किंवा सात वातींचा दिवा लावावा.

परंतु जर देवीला प्रसन्न करायचे असेल तर ९ वातींचा दिवा लावावा किंवा एकाच दिव्यात ९ वाती टाकाव्यात. हनुमानांना व महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पाच वातींचा दिवा लावावा. अनुष्ठानात पाच वातींचा दिवा लावणे म्हणजे खूप महत्व आहे. तसे तर आपण विविध धातूंच्या दिव्यांचा वापर आपल्या पूजेत करतो.

जसे सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड किंवा मातीचा दिवा हा कोणताही दिवा लावताना आपण त्या दिव्याखाली थोडेसे धान्य टाकले तर आपल्याला आपल्या सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते. दिवा लावताना जर दिव्याखाली थोडे गहू टाकले तर आपल्या धनधान्यात वृद्धी होते. दिव्याखाली तांदूळ टाकल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळते.

काळे तीळ व उडीद दिव्याखाली ठेवल्यास काल भैरव व शनिदेव क्षेत्रपाल आपले रक्षण करतात. दिव्यात जर गुलाबाची पाकळी व लवंग टाकले तर आपल्या जीवनातील सर्व कष्टांचा नाश होऊन आपले जीवन सुगंधाने भरून जाते. दिवे वेगवेगळ्या धातूंचे असतील तर त्यांचेही वेगवेगळे महत्व आहे. आणि दिव्यांमार्फत आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात.

हे वाचा:   जर तुळशीमध्ये उगवले हे रोप तर लपवून ठेवा; धनाला चुंबकासारखे खेचते हा उपाय.!

जर आपण सोन्याचा दिवा लावत असाल तर चौरंगाच्या मधोमध गव्हाचे आसण करावे व त्याच्या आसपास कमळाची फुले व कमळाच्या पाकळ्या पसरवाव्यात व मधोमध हा दिवा गव्हाच्या आसनावर ठेवावा. हा दिवा गाईच्या शुद्ध तुपाचाच असावा तसेच त्यात लाल रंगाच्या दोऱ्याची वात घ्यावी. या दिव्याची ज्योत पूर्वेकडे असावी. अशाप्रकारे आपण जर सोन्याचा दिवा प्रज्वलित केला तर आपल्या धनात वाढ होते व वाईट शक्तींपासून आपल्याला सुरक्षा मिळते.

जर आपण चांदीचा दिवा पूजनासाठी वापरत असाल तर तांदळाचे आसन टाकून त्यावर पांढरे गुलाब किंवा इतर कोणत्याही फुलाच्या पाकळ्या पसरवाव्यात. या दिव्यताही गाईच्या शुद्ध तुपाचा वापर करावा तसेच लाल दोऱ्याची वात प्रज्वलित करावी. हा दिवाही पूर्वेकडे प्रज्वलित करावा, यामुळे आपल्या धनधान्यात वृद्धी होते.

ज्यावेळी आपण तांब्याचा दिवा लावतो त्यावेळी त्या दिव्याखाली लाल रंगाची मसुराची डाळ टाकावी. व त्याच्या आजूबाजूला लाल फुलाच्या पाकळ्या पसरवाव्यात. दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करावा. या दिव्यात तिळाचे तेल टाकावे आणि कापसाची वात टाकावी. तांब्याचा दिवा लावल्याने आपल्या मनाची शक्ती वाढते व वाईट शक्ती व शत्रूंपासून आपले संरक्षण होते.

हे वाचा:   एक बेलपत्र बनवेल तुम्हाला श्रीमंत, सर्व इच्छा होतील पूर्ण; फक्त करा हा उपाय.!

काशाच्या दिव्याखाली जर हरभरा डाळीचे आसण करून तिळाचे तेल टाकून हा दिवा प्रज्वलित केला तर आपल्याला स्थिर मनाची प्राप्ती होते. लोखंडी दिव्याला काळ्या उडदाचे आसन देऊन राईच्या तेलात कापसाची वात टाकून हा दिवा प्रज्वलित केल्यास अपघातापासून आपले रक्षण होते. पूजेमध्ये आपण ९ ग्रहांचे पूजन करतो.

सोन्याच्या दिव्यामध्ये सुयंदेवांचे वास्तव्य असते. अशाच प्रकारे वेगवेगळ्या धातूंच्या दिव्यांमध्ये वेगवेगळ्या ग्रहांचे वास्तव्य असते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा असा प्रयत्न करा कि दिव्यातील वात संपूर्ण जळून जाणार नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या धातूंचे दिवे लावून आपण आपल्या इच्छा व मनोकामनांची पूर्ती करू शकतो.

जर आपल्याला जीवनात भरपूर लक्ष्मीची प्राप्ती करायची असेल तर विशेष सण उस्तवांच्या दिवशी घरात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा व त्या दिव्यात केसरच्या २-३ काड्या टाकाव्यात. जर केसर नसेल तर गुलाबाच्या १-२ पाकळ्याही आपण दिव्यात टाकू शकतो. यामुळे आपल्या जीवनात धनाची व यशाची प्राप्ती होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.