हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देत असते ही लक्षणे. ही लक्षणे जर आपल्याला लवकर समजली तर आपण आपल्या मृत्यू येण्यापासून वाचवू शकतो. फक्त छातीत दुखण म्हणजे हार्ट अटॅक असु शकत नाही. आज कालच्या बदलत्या लाइफ स्टाईल मुळे कित्येकदा अचानक काही कारण नसताना कोणतेही लक्षणे न दाखवता अचानक देखील हार्ट अटॅक येऊ शकतो.
हार्ट अटॅक आला तर तो कसा ओळखायचा किंवा ती येण्यापूर्वी काय लक्षणे आहेत हे जाणून घेणार आहोत. प्राथमिक लक्षणे छातीत दुखणे, सौम्य वे द ना किंवा ठरावीक प्रकारच दुखन, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर दुखणे. उदा: चालण, जिना चढणे, सायकल, अंघोळ, जेवण करताना जर छातीमध्ये दुखत असेल तर हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहेत.
उलटी किंवा मळमळ बऱ्याच वेळा आपण पित्ताचा त्रा स म्हणतो पण तो हृदया पासून असू शकतो एसिडिटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळी कडे दुर्लक्ष करू नका. चक्कर येण काही कारण नसताना काही सेकंद साठी चक्कर येणे हे हार्ट अटॅक चे लक्षण आहे.
हार्ट अटॅक वेळी रक्त प्रवाह बंद होतो आणि त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा न झाल्याने चक्कर येते त्यामुळे जर ती व्यक्ती पडली तर समजावी की तिला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता आहे.
छातीत जड वाटण, छातीवर दाब येण ते आवळ्यासारखे वाटणे, वे-दना जबडा मानेवर किंवा डाव्या हातावर जाणे. दम लागणे, श्वास घेण्यात अडथळे निर्माण होणे श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न कराव लागण. जर तुमच्या जवळ नसलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत असतील तर हार्ट अटॅक येऊ शकतो याचे लक्षण आहेत.
घाम येणे काही श्रमाचा काम न करता घाम येत असेल, कोरडा खोकला, खोकला कोणत्याही कारणामुळे येत नाही. अस्वस्थता, चेहरा फिका पडण कस तरी वाटण खुप भिती वाटणे, श्वास कोंडल्या सारख वाटण डोक भणभणण करणे.
अचानक डोक घणाचे घाव घातल्यासारखे दुखणे तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता बळावते ही जर लक्षणे आपल्याला दिसली तर आपण लगेच लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.