भाज्या बारीक करण्याची ही जादुई पद्धत तुम्हाला पण चकित करेल; महिलांनी अवश्य वापरा की ट्रिक.!

ट्रेंडिंग

नमस्कार, घरातील काम करत असताना आपल्याला भरपूर अडचणी येतात आणि या अडचणी सोडवायच्या असतील तर आपल्याकडे नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स असायलाच हव्यात त्यामुळे असाच हा लेख आम्ही मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर इथे आपली पहिली टिप आहे त्यासाठी इथे मी कांदा आणि लसूणचा थोडासा पाचोळा घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्ता. तेजपत्त्याची छान वाळलेली पान आपल्याला घ्यायची आहेत. इथे मी एक खराब स्टीलची प्लेट घेतलेली आहे.

तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मातीच एखाद भांड घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन- चार लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे कापूर. कापूर लवंगच्या बाजूलाच ठेवा आणि त्यानंतर आपण याला पेटवणार आहोत. घरामध्ये जर लहान मुलं असतील, वृद्ध माणस असतील तर अजिबात घरामध्ये कोणतही केमिकल वापरलं नाही पाहिजे कारण की त्याचा दुष्परिणाम लवकर त्यांच्या शरीरावर होतो.

तर त्यामुळे इथे मच्छर घालवण्यासाठी हा घरगुती उपाय आहे. संध्याकाळच्या वेळी एकदा करा घरामध्ये, अजिबात एकही मच्छर दिसणार नाही, त्यासोबतच घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल, घरामधील जो कुबट दमट वास आहे तो निघून जातो. नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर फ्रेश वाटेल आणि एकही मच्छर चावणार नाही

आपली पुढची टिप आहे पिलोसाठी. एखादं कुशन असो किंवा पिलो त्याचं जे कव्हर असतं ते थोडं फार मोठं झालं की ते दिसायला व्यवस्थित असं दिसत नाही आणि आपल्याकडे जर शिलाई मशीन नसेल तर अशा वेळेस काय करायचं, त्यासाठी खूप छान ही ट्रिक मी सांगणार आहे, जेणेकरून एक डिझायनर असं पिलो कव्हर देखील तयार होईल. प्लेन जरी असेल तरीही छान दिसेल. यासाठी इथे आपल्याला बांगडी वापरायची आहे आणि पिलो कव्हरच्या आतमध्ये आपण ही बांगडी अशी टाकणार आहोत. अगदी सेंटरला ही बांगडी लावणार आहोत.

तुम्हाला जर समोरून ही अशी डिझाईन करायची नसेल आणि पिलो कव्हर टाईट करायचा असेल तर तुम्ही पिलोच्या मागच्या बाजूलाही डिझाईन करू शकता. जेणेरून दिसणारही नाही आणि आपलं पिलो कव्हर खूप छान टाईट बसेल. तर बांगडी व्यवस्थित ठेवून तिथे रबर लावायचा आहे. यामुळे खूप सुंदर असं छान डिझायनर पिलो कव्हर तयार होतं आणि खूप छान असं टाईट देखील बसत.

हे वाचा:   चाणक्य म्हणतात अशा स्त्रीसोबत चुकुनही लग्न करू नका..नाहीतर बरबाद व्हाल..कारण या स्त्रिया पतीसोबत अशाप्रकारे..

यानंतरची आपली टिप आहे आय ड्रॉपच्या बॉटलसाठी किंवा कानामध्ये ज्या ड्रॉपसाठी बॉटल दिल्या जातात त्या बॉटलसाठी. या बॉटलला छिद्र नसतं आपण ते घरी आल्यानंतर यावरती छिद्र पाडायचं असतं कारण की यामधून दोन तीन थेंब आपल्याला कानामध्ये किंवा डोळ्यामध्ये सोडायचे असतात. तर बरेच जण यामध्ये खूप मोठी चूक करतात की आपल्याकडे असणारी एखादी टोकदार वस्तू जस की काटेपीन म्हणा सुई म्हणा त्याने यावरती छिद्र पाडतात आणि या वस्तू स्वच्छ नसतात.

इकडे तिकडे अशाच पडलेल्या असतात आणि कान म्हणा किंवा जसं नाक डोळे खूप नाजूक हे अवयव आहेत आणि यांना जर इन्फेक्शन झालं तर खूप जास्त ते महागात पडू शकत. तर यासाठी या बॉटलच जे झाकण असत यामध्येचे एक छोटासा टोकदार भाग दिलेला असतो यामुळे या बॉटलला छिद्र पाडल जात. त्यानंतर आपण यावरती झाकण लावायच आहे तेव्हा यावरती खूप छान अशापकारे छिद्र पड्तं आणि वेगळी अशी आपल्याला वस्तू वापरायची गरज पडत नाही.

यानंतरची आपली टिप आहे यासाठी मी घेतलेली आहे प्लास्टिकची बॉटल जी की सर्वांच्याच घरी अशीच पडलेली असते. तर या प्लास्टिकच्या बॉटलचा फक्त हा वरचा भाग थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी थोडासा भाग आपण इथे कट करून, घेणार आहोत, आणि मोजमाप असं काही घ्यायची गरज नाही. छोटं झालं तरी काहीच हरकत नाही. तर याला याला मी असं कट केलेल आहे.

हे वाचा:   फक्त एका प्लॅस्टिक बॅग ने बनवा झाडू फक्त 2 मिनिटांत.. यानंतर झाडू घेण्याची गरजच पडणार नाही.!

यानंतर आता आपल्याला यावरती दोन छिद्र पाडायचे आहेत. त्यासाठी मी एक टोकदार वस्तू गरम करून घेतलेली आहे आणि अगदी छोटे छोटे छिद्र आपण यावरती असे दोन्ही बाजूंनी पाडलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक रबर आणि या रबरला आपण असं मधोमत कट करून घेणार आहोत. एखादी दोरी जरी वापरली तरी चालेल. त्यानंतर इथे आपण हे रबर असं जे छिद्र पाडलेल आहे त्यामध्ये टाकून एक गाठ मारणार आहोत दोन्ही बाजूनी आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे.

तर इथे व्यवस्थित मी असं रबर दोन्ही बाजूनी, एकच रबर आपल्याला कट करून असं दोन्ही बाजूंना लावून गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आतमध्ये हे नीट तयार होतं. यानंतर हे आपल टूल तयार आहे. याला तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकणार आहात. किचनमध्ये अगदी छोट्या जागेत बसेल आणि यामध्ये आपला काहीही खर्च होत नाही. याला बनवण्यासाठी तर पाहू शकता हे असं काहीसं तयार झालेल आहे. यानंतर चला तर मग पाहूया इथे जर तुम्हाला हे चार बोटांवरती लावायचं असेल तर साईजमध्ये थोडसं मोठं कट करा, कारण की प्रत्येकाची पद्धत किंवा हाताच्यी साईजनुसार हे तुम्हाला कमी येईल आणि आपण घरामध्ये एवढी काम करतो त्यातच भाज्या चिरण्याच काम कांदा कापण्याच काम आपलं असतच.

तर घाई गडबडीत आपण पटापट हे काम करायला जातो आणि कधी कधी आपला चाकू जो आहे तो आपल्या बोटाला लागतो. कारण की अगदी आपल्या बोटांच्या समोरच हा चाकू असतो. तर असं होऊ नये यासाठी आपण हे सेफ्टीसाठी हे टूल बनवलेल आहे. कितीही घाई गडबडीत भाज्या चिरल्या तरीही अजिबात तुमच्या बोटांना चाकू लागणार नाही. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमचा आजचा हा लेख आवडला असेल लाईक करा, शेअर करा.