लग्नाच्या पहिल्याच रात्री बायको म्हणाली “माझं दुसरीकडे प्रेम प्रकरण चालू आहे” त्यानंतर जे घडले….

ट्रेंडिंग

लग्न एक असे अतूट बंधन आहे ज्यामध्ये विश्वास प्रेम व माया नसली तर नात्याला अर्थ राहत नाही आपण जेवढे प्रेम आपल्या आपल्या जोडीदारावर करतो तेवढेच प्रेम त्या जोडीदारचे देखील आपल्यावर असणे गरजेचे आहे आणि असे नसल्यास या नात्याला काही गोडी काही अर्थ उरत नाही मग हे नाते फक्त नावापुरते राहते. अशीच एक कहाणी आज आम्ही या लेखाद्वारे तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत लेख शेवट पर्यंत वाचा.

सुधीर एक उच्च शिक्षित चांगली नोकरी चांगल्या घरातील मुलगा होता त्याचे लग्न माधुरी नावाच्या एका गरीब घरातील अनाथ मुलीशी झाले. लग्न अगदी धुम धडाक्यात झाले. माधुरीचे आई वडिल दोघेही माधुरी लहान असतानाच एका दुर्घटनेत दगावले त्यामुळे माधुरी आपल्या काका-काकींकडे लहानाची मोठी झाली. लहानपणा पासूनच तिचे काका आणि काकी तिला अंतर देत असत.

खाण्या पिण्याच्या बाबतीत देखील माधुरी खूप मन मारुन असायची त्यामुळे ती सुद्धा हा घरातून कधी सुटका मिळतेय याची वाटच पाहत होती. माधुरीचे लग्न सुधीरशी झाले सगळे अगदी खुश होते माधुरीची सासू देखील खूप प्रेमळ होती. लग्नाला तीन दिवस झाले सत्यनारायणाची पूजा झाली व आता रात्र आली ती मधू-चंद्राची. सुधीर माधुरी सारखी देखणी व रुपवान बायको मिळाली म्हणून अगदी आनंदी झाला होता.

हे वाचा:   रायबा तान्हाजी मालुसरे यांचे पुढे काय झाले.? ९९% लोकांना माहित नसलेला इतिहास.!

त्याची लग्नानंतरची पहिली रात्र या बद्दल तो मनोमन विचार करत होता. त्याला वाटले होते की बेड वर माधुरी त्याचे स्वागत करेल मात्र असे काहीच झाले नाही या उलट माधुरी खुर्चीवर बसून सुधीरची वाट पहात होती जेव्हा सुधीर आत आला तेव्हा माधुरीने सत्य परिस्थिती काय आहे ते सुधीरला सांगण्यास सुरवात केली.

माधुरी सुधीरला म्हणाली ‘ मला तू आवडत नाहिस माझे तुझ्यावर मुळीच प्रेम नाही आहे. मी तुझ्याशी लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध केले आहे मी तुला माझा पती मानतच नाही. ‘ हे सर्व ऐकून सुधीरच्या पाया खालची जमीन सरकली आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री असे काही होईल याचा विचार त्याने आपल्या स्वप्नात देखील केला नव्हता. सुधीर संतापून तीव्र स्वरात म्हणाल ‘ जर तुला मी आवडत नाही तुझे माझ्यावर प्रेम नव्हते तर का लग्नाचे नाटक केलेस आधीच नकार द्यायचा ना एवढं सगळ नसत करव लागल.

हे वाचा:   नवरा-बायकोत जर भांडणे होत असतील तर हा लेख एकदा नक्की वाचा.!

यावर माधुरी म्हणाली ‘ माझे एका मुलावर खूप प्रेम आहे आणि मी त्यालाच माझा पती मानला आहे मी त्याच्या शिवाय एक क्षण सुद्धा जगू शकत नाही मी तुझ्याशी लग्न केले कारण मी माझ्या काका-काकीच्या त्रासाला कंटाळले होते आणि मला त्या घरातून सुटका हवी होती. आपण जरी नात्याने पती-पत्नी असलो तरी ही मी तुला मनापासून कधीच माझा पती मानणार नाही.

हे सगळे ऐकून सुधीर माधुरीची परिस्थिति समजून गेला व त्याने पुढाकार घेऊन आपल्या घरच्यांना माधुरीचा सगळा प्रकार समजून सांगितला. सुधीरचे घरचे ही समजूद्दार होते. त्यांनी माधुरी व तिचा प्रेमी रमेश यांचे लग्न कोर्टात लावून दिले. आता सुधीरने ही लग्न केले आहे व तो आपल्या आयुष्यात सुखी आहे माधुरी ही आपल्या पती सोबत खूष आहे. सुधीर सारखी समजूद्दार माणसे जर या समाजात असतील तर या जगात प्रेम विवाहाला न्याय मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.