या पानांचे हे आहेत औषधी गुणधर्म; मिळतील इतके फायदे कि तुम्हीसुद्धा व्हाल आश्चर्यचकित.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अनेक अश्या काही औषधी वनस्पती पाहायला मिळतात परंतु आपल्याला त्या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. या वनस्पती आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत याची आपल्याला कल्पना नसते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण नेहमी वापरत असलेल्या एका वनस्पती बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ही वनस्पती आपण फक्त खाण्यापिण्याच्या दृष्टिकोनातून वापरत असतो परंतु या वनस्पतीचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा खूपच महत्त्व सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर या वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते आणि अनेक शुभ मंगल प्रसंगी आपण या वनस्पतीचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवत असतो, चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल..

या वनस्पतीचे नाव आहे अळू. अळू चे पान बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि हे पान आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते. ही वनस्पती आपण घरच्या घरी सुद्धा उगवू शकतो. अळूच्या पानांची भाजी व भजी सुद्धा बनवली जाते. या भाजीमध्ये वळूच्या पानांमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात आणि हे पोषक तत्व आपल्या आरोग्याच्या पालन पोषणासाठी आवश्यक ठरतात.

हे वाचा:   आता आणखी केस गळणार नाही फक्त करा हा एक उपाय; रखरखीत केस देखील होतील मऊ.!

या वनस्पतींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्वही उपलब्ध असते आणि म्हणूनच आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल तर तो लगेच दूर करतो. या वनस्पतीचे सेवन केल्याने आपली नजर सुद्धा चांगली राहते. जर आपल्याला कोणताही प्राणी, साप, विंचू, कीटक चावला असेल तर अशा वेळी आपण या वनस्पतींच्या पानांची पेस्ट बनवून प्रभावित जागेवर लावल्यास विषाचे प्रमाण कमी होते असे म्हटले जाते.

जर शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल ती जखम जर भरत नसेल तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांची बारीक पावडर बनवून जखम असलेल्या भागावर लावले तर जखम तर भरतेच पण र”क्त स्त्राव सुद्धा थांबतो. या वनस्पतीमध्ये जीवनसत्व क सुद्धा भरपूर असते त्यामुळे अनेकदा आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते.

ही वनस्पती फक्त खाण्यापिण्यासाठी वापरले जात नाही तर या वनस्पतीचा औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहेत. जर तुम्हाला कानदुखी ची समस्या उद्भवत असेल तर अशा वेळी आपण या पानांचा रस एक थेंब कानामध्ये टाकला तर कान दुखी सुद्धा थांबते. ज्या व्यक्तींना को”ले”स्ट्रॉल व हृ”द्य संबंधित आजार आहे अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये या भाजीचा समावेश अवश्‍य करायला पाहिजे व त्याचबरोबर ज्या व्यक्तींना उच्च र”क्त”दाबाची समस्या वारंवार उद्भवते ,अशा व्यक्तीने सुद्धा आपल्या आहारामध्ये या वनस्पतीची भाजी व वेगवेगळे पदार्थ सुद्धा समावेश करायला हवे.

हे वाचा:   हे ३ पदार्थ रोज सकाळी एकत्र खा..चरबी मेणासारखी वितळेल ! ७ दिवसांत ७ किलो वजन कमी घरगुती उपाय

अळूच्या पानामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असल्याने आपल्या शरीरावर जर कोणत्याही प्रकारचे त्वचाविकार म्हणजेच खाज, खरूज, नायटा ,गजकर्ण झाला असेल तर अशावेळी ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला या पानांची पेस्ट बनवायची आहे आणि प्रभावित जागेवर लावायची आहे. या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियमची मात्र असल्याने जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी ही समस्या असेल तर ती समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.